Ahmednagar News : नगर अर्बनच्या संचालकांची धरपकड ! गांधीं कुटुंबीय नगरमधून गायब ? चर्चांना उधाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहराप्रकरणी आता तपासला वेग आला आहे. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आता विविध प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. या प्रकरणी एसआयटी देखील स्थापन केलेली असून पोलिसांकडून सध्या धरपकड सुरु आहे.

सुरवातीला दोन अधिकारी त्यानंतर दोन संचालक याना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता सध्या बँकेचे माजी अध्यक्ष अशोकलाल कटारिया याना अटक केलेली असून नगरच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या धरपकडीमुळे बँकेच्या संचालकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संचालक हे नगरमधून गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आजपर्यंत यांना घेतले आहे ताब्यात !

सोमवारी पहाटे आळेफाटा येथून अटक करण्यात आलेले बँकेचे माजी चेअरमन अशोकलाल माधवलाल कटारिया यांना नगरच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गेल्या काही महिन्यांपासून अर्बन बँकेतील गैरव्यवहार गाजत असून गैरव्यवहाराप्रकरणी पोलीसांनी २६ जानेवारी रोजी बँकेचे माजी उपाध्यक्ष अनिल कोठारी व माजी संचालक मनेश साठे यांना अटक केली. २ फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, मा. खा. स्व. दिलीप गांधी यांच्या कुटूंबियांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून सध्या गांधी कुटूंबिय नगरमध्ये नसल्याची माहीती आहे. या गैरव्यवहार प्रकरणी सुरूवातीस बँकेचे अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र लुनिया यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

माजी पदाधिकारी व संचालकांमध्ये खळबळ

या गुन्हयाची पोलीसांकडून चौकशी सुरू असताना या गुन्ह्याची एकंदरीत व्याप्ती मोठी असल्याचे समोर आल्याने याचे फॉरेन्सिक ऑडीट केले गेले. त्यानंतर या गैरव्यवहारात कोणाचा सहभाग आहे या बाबी पुढे आल्या व तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

फॉरेन्सीक ऑडीट नंतर बँकेतील घोटाळा २९१ कोटी २५ लाख रूपयांचा असल्याची तसेच त्यात १०२ आरोपींचा सहभाग असल्याची माहीती पोलीसांच्या हाती आली आहे.

गांधी कुटुंबीय कुठे आहेत?

पोलीसांनी धरपकड सुरू केल्याने माजी पदाधिकारी व संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून बहुतांश संचालक फरार झाले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी आणखी काही संचालकांना ताब्यात घेतले जाऊ शकते असे म्हटले जात आहे. दरम्यान या प्रकरणामुळे गांधी कुटूंबिय नगरमध्ये नसल्याची चर्चा आहे.

ठेवीदारांत समाधानाचे वातावरण

सध्या पोलिसांकडून कारवाई जोरात सुरु असल्याने ठेविदारांच्या पैसे मिळण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांच्यात सध्या समाधानाचे वातावरण दिसते.