ब्रेकिंग ! ‘या’ सरकारी बँकेचा मोठा निर्णय, FD व्याजदर वाढवण्याचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking FD Scheme : अलीकडे अनेकजण गुंतवणुकीसाठी एफडी चा पर्याय स्वीकारत आहेत. बँकेतील एफडी ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने अलीकडे एफडी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक या बँकेने एफडी वरील व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे. यामुळे पंजाब नॅशनल बँकेत एफडी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर वित्तीय जाणकार लोकांनी एफडी करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचा दावा केला आहे.

कारण की, वाढीव व्याजदराचा जर फायदा घ्यायचा असेल तर गुंतवणूकदारांनी आत्ता एफडी मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. जाणकार लोकांनी येत्या काही महिन्यात आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकते.

रेपो रेट आता कमी होतील असा अंदाज आहे. यामुळे जर रेपोरेट मध्ये कपात करण्यात आली तर साहजिकच एफडीचे देखील व्याजदर कमी होतील या शंकाच नाही. दरम्यान गेल्या दीड वर्षात रेपोरेट जिथे अडीच टक्क्यांच्या आसपास वाढले आहेत तिथे एफडी चे व्याजदर एवढे वाढलेले नाही.

यामुळे रेपो रेटमध्ये जरी कपात झाली तरी देखील एफडीच्या व्याजदरात लवकरच कपात होईल अशी शक्यता नसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. अशातच मात्र पंजाब नॅशनल बँकेने एफडी व्याज दरात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता आपण सदर बँकेच्या माध्यमातून FD चे व्याजदर किती टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

किती वाढवले FD व्याजदर

PNB बँकेने 180 ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदरात 50 bps ने वाढ केली आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना या ठेवींवर ६ टक्के व्याज मिळणार आहे. PNB ने 271 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी FD दर 45 bps ने वाढवले ​​आहेत.

आता सर्वसामान्य नागरिकांना या FD वर ७.२५% व्याज मिळणार आहे. PNB ने 400 दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीवर व्याजदर 45 bps ने वाढवले ​​आहेत. हा व्याजदर 6.80% वरून 7.25% झाला आहे. PNB सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.5% ते 7.25% व्याज देते.

तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 4% ते 7.75% पर्यंत व्याजदर देत आहे. मात्र सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी, व्याज 4.3% ते 8.05% पर्यंत व्याज दिले जात आहे. अर्थातच बँकेच्या माध्यमातून जेष्ठ आणि सुपर जेष्ठ नागरिकांना विशेष सवलत या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे.