शेवगाव तालुक्यातील बसस्थानकामध्ये बसच्या चाकाखाली चिरडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शेवगाव- छत्रपती संभाजीनगरला नातवासोबत जाणाऱ्या एका महिलेचा राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी बसस्थानकाच्या आवारात घडली. या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव मथुराबाई मधुकर पटारे असं आहे. त्या पाथर्डी तालुक्यातल्या निंबेनांदूर गावच्या रहिवासी होत्या. त्या आपल्या नातवाला घेऊन छत्रपती संभाजीनगरला … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव लाखोंची वाहने मिळणार कमी किमतीत

शेवगाव तालुक्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसील कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेली काही वाहने तहसील कार्यालयात आणली गेली होती. मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंड भरून वाहने नेण्यास टाळाटाळ केल्याने, आता ही पाच वाहने जाहीर लिलावाद्वारे विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लिलाव बुधवार, २६ मार्च २०२५ रोजी … Read more

जिवंत सातबारा मोहीम आणि अहिल्यानगरच कनेक्शन ! शेवगावचा सुपुत्र, राज्यात हिरो

शेवगाव: शेवगाव तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले संतोष काकडे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू केलेली ‘जिवंत सातबारा’ मोहीम आता राज्यभर राबवली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाला यासंबंधी शासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांना होणारी ससेहोलपट संपुष्टात येण्यास मदत होणार असून, राज्यातील … Read more

पाथर्डी-शेवगाव महामार्गावर दुचाकीने घेतला महिलेचा जीव – नागरिकांमध्ये संताप!

पाथर्डी शहरात सायंकाळी वॉकिंगसाठी गेलेल्या एका महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मीना मधुकर नलवडे (वय ५७, रा. विजयनगर, पाथर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी वॉकिंग दरम्यान दुर्दैवी घटना पाथर्डी शहरातील विजयनगर भागातील काही महिला नेहमीप्रमाणे शुक्रवार, ८ मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या … Read more

शेअर बाजाराच्या नावाखाली लाखोंना गंडा

अहिल्यानगर : क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या संस्थेच्या नावाखाली गुतवणूक दारांना १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडले व त्यानंतर एक रुपयाही न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळेया संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात याच्यासह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच … Read more

जिल्ह्यातील तीन युवकांनी मोटारसायकलवर केली प्रयागराजची यात्रा

Ahilyanagar News : म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असाच अनुभव अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील तरुण घेत आहेत. येथील तीन तरुण मोटारसायकलवर थेट प्रयागराज यात्रा करून आले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने साधू संत तसेच सर्वसामान्य भाविक दाखल झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील … Read more

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने ‘हा’ रस्ता शेतकऱ्यांना खुला !

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ बालमटाकळी  शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बालमटाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित बंद केलेला रस्ता प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुन्हा खूला करण्यात आला.शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता येथीलच अमर गरड, भारत गरड, विष्णुदास रामावत यांनी चर खोदुन रस्ता हा बंद केल्याने वस्तीवर तसेच शेतामध्ये … Read more

विरोधात फिर्याद दिल्याचा राग डोक्यात शिरला अन् त्याने सेवेकऱ्याचे शीर धडावेगळे केले

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान याबाबत मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ भानुदास घोरतळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३० जानेवारी रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या मालकीच्या … Read more

शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले

शेवगाव तालुक्यातील जवळपास १० ते १२ गावांना वरदान ठणाऱ्या पैठण उजवा कालव्यातून बुधवार (दि. १६) रोजी कालवा समितीने ठरवून दिलेले चालू हंगामातील दुसरे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जायकवाडी पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव तालुक्यातील असंख्य गावांना विस्थापित व्हावे लागले असून तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीचे काळे भोर क्षेत्र धरणामध्ये गेले असून सुद्धा … Read more

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, दोघे अटकेत

शेवगाव : पैशांच्या व्यवहारावरून वरखेड (ता. शेवगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भुजंग शामराव मडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोनेसांगवी (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी योगीता भुजंग मडके (वय ३४) यांनी ३१ डिसेंबर … Read more

‘समस्या न सुटल्यास मुलाहिजा ठेवणार नाही’

३ जानेवारी २०२५ हातगाव : शेवगाव तहसील कार्यालयात गुरुवारी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तब्बल अडीच तास उशिराने बैठक सुरू झाली. तरीही तालुक्यातील अनेक नागरिक बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीत विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रांताधिकारी प्रसाद मते, राष्ट्रवादीच्या शरद … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

Ahmednagar Politics: शेवगाव- पाथर्डी मतदार संघात हर्षदा काकडे देणार आ.मोनिका राजळेंना धक्का? विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

harshada kakde

Ahmednagar Politics:- देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण शांत होत नाही तोपर्यंत आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार पद्धतीने वाहायला लागले आहेत व येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याचे संकेत देखील गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षाने आपापली मोर्चेबांधणी सुरू … Read more

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून १३ गावांचा प्रस्ताव सादर

Ahmednagar News : ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.०१ या बंद स्थितीत असलेल्या योजनेतून ९ ऐवजी १३ गावांना आता पाणी मिळू शकते. तसेच सदरची योजना ही तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असल्यामुळे तसेच जुन्या योजनेचे बहुतांशी कामे, साधने पुन्हा वापरात येणार असल्याने या योजनेवर शासनाचा खर्च व्यपगत न होता दुष्काळग्रस्त १३ गावांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न … Read more

चंद्रशेखर घुले यांना पुन्हा आमदार करा ! तालुक्याचे गतवैभव परत मिळवू शकतो…

आपण ठरवले तर तालुक्याचे गतवैभव परत मिळवू शकतो. ही खुणगाठ आपल्याला बांधायची आहे. चहुबाजूंनी केवळ तालुक्याचे लचके तोडण्याचे काम सुरू असतांना शिवबा घडवण्याची ताकद असलेली जिजाऊ शांत बसून कशी चालेल. म्हणून आपल्याला पुन्हा चंद्रशेखर घुले पाटील यांना आमदार केल्याशिवाय हे थांबलेले विकासाचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही. त्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या आणि तालुक्याच्या भविष्याची ही लढाई … Read more

शेवगावातील क्लासिक ब्रिजमनी सोल्युशनविरोधात तक्रार, ठेवीदारांची १० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप !

fraud

जादा पैशांचे आमिष दाखवून शेवगाव तालुक्यातील अनेक ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी क्लासिक ब्रिजमनी सोल्युशन या गुंतवणूकदार कंपनीविरोधात शेवगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत ठेवीदारांनी ६ ऑगस्ट रोजी कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दिली. सुमारे १० कोटी रुपयांना कंपनीने फसवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तक्रारीत म्हटले आहे की, क्लासिक ब्रिजमनी सोल्युशन कंपनीत गुंतवणूक केल्यास १० … Read more