हातगावच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह कालव्यात सापडला

Ahmednagar News

Ahmednagar News : बोधेगाव तालुक्यातील हातगाव येथून गायब झालेल्या नागेश बंडू गलांडे (वय २४) याचा मृतदेह शुक्रवारी (३ मे) दुपारी एक वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, हातगाव येथील नागेश बंडू गलांडे हा गुरुवारी (२ मे) सकाळी साडेसात वाजता घरातून निघून गेला होता. याबाबत त्याचे मामा शिवाजी तुकाराम घोलप यांनी … Read more

बस प्रवासादरम्यान महिलेचे चार लाखांचे दागिने लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर ते शेवगाव बस प्रवासादरम्यान महिलेच्या चार लाख चार हजार रूपये किंमतीच्या ६३ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता कल्याण पागर (रा. रेणुकानगर, केडगाव, मुळ रा. आंतरे ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्मिता या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी गुरूवारी सकाळी साडे … Read more

Ahmednagar Breaking : यात्रे दरम्यान भलतंच घडलं ! युवकाला गमवावा लागला जीव…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील लक्ष्मी माता यात्रे दरम्यान मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील शहरटाकळी येथे घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मृत युवकाच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून पाच युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरटाकळीत … Read more

पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खिर्डी, खामपिंप्री, पिंगेवाडी, हातगाव व कांबी, या ७ गावाच्या शिवेवरून गेलेल्या पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, चालू वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्रस्वरूप धारण करेल, अशी चिन्हे दिसून येत आहेत. पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव … Read more

यात्रेच्या कार्यक्रमात महिला सरपंचाचा विनयभंग

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील एका गावातील यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे श्रीफळ वाढवून मंचावरून खाली उतरत असताना एका महिला सरपंचाचा गावातीलच काही टारगटांनी विनयभंग करून सरपंच महिलेस व तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद महिला सरपंचाने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२५ ) रात्री पावणे दहाच्या दरम्यान घडली. याबाबत … Read more

महाविकास आघाडीच्या बॅनरवर राजीव राजळेंचा फोटो

Ahmednagar News

Ahmednagar News : स्व. राजीव राजळे यांचा फोटो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या बॅनरवर वापरला आहे. त्यासाठी राजळे कुटुंबाची परवानगी घेतलेली नाही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आमदार मोनिका राजळे यांचे विश्वासू सहकारी विष्णुपंत अकोलकर यांनी केली आहे. शेवगाव येथे महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची सभा रविवारी शरद पवार यांच्या … Read more

आरोग्य उपकेंद्र असून अडचण अन् नसून खोळंबा; आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ! निवासी डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील आरोग्य उपकेंद्रावर परिसरातील चार ते पाच गावांचा आरोग्याचा भार आहे. परंतु उपकेंद्राला अनेक समस्यांचा विळखा पडला असून, हे उपकेंद्रात निवासी पद रिक्त असल्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था असूनही येथे वर्षापासून कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे. दहिगावने आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील शहरटाकळी मोठे गाव असून, लहान … Read more

अहमदनगरला पावसाने पुन्हा झोडपले ! वादळासह जोरदार पाऊस, वीज यंत्रणा कोलमडली, बारा तास वीज खंडित

अहमदनगर शहरासह परिसरात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस यामुळे वीजयंत्रणा कोलमडून पडली. वादळी वारे सुरू झाल्यानंतर वीज खंडित झाली. ती अनेक भागात पहाटेपर्यंत बंद होती. तर काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळपर्यंतही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. बुधवारी रात्री सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातनंतर वाऱ्याचा वेग हळूहळू वाढला. रात्री पावणेअकरा वाजता विजांच्या … Read more

Ahmednagar News : पावसाने घेतला मजुराचा बळी ! दगड अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू

अंगावर दगड पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.२४) रोजी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. संदिप लहू खंडागळे (वय ३०), असे मयत मजुराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, बोधेगाव येथील संदिप लहू खंडागळे, राहुल भिमा कांबळे, सुभाष उत्तम वैरागळ व प्रविण रमेश खरात हे ४ तरुण दि.२४ रोजी लखमापुरी … Read more

वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात चापडगाव, मंगरुळ, बेलगाव, आंतरवाली, परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगोदरच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले असताना त्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या पदरी निराशा दिसून येत आहे. चैत्र पौर्णिमेला ग्रामीण भागात गावोगावी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव भरत आसतात, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Ahmadnagar breaking

Ahmednagar News : पैठण उजव्या कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय २२), रा. हातगाव, ता. शेवगाव, असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे यांनी कालव्यातून काढलेला मृतदेह शेवगावला उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्या नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देऊन मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला आहे. गरीब कुटुंबातील … Read more

तहान भागविणारे हातपंप ठरु लागले ‘बुजगावणे’

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह परिसरातील ग्रामस्थांची तहान भागविणारे हातपंप देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आज रोजी इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. कुपनलिकांचा वाढता वापर, सहज विकतचे उपलब्ध होणारे पाणी आणि पाणीपुरवठा योजनांचा विस्तार, यामुळे हातपंपांचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे. प्रशासनाने याची दखल घेत गावोगावी सर्वेक्षण करून नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर … Read more

कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेतकरी पाण्यापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : पैठण उजवा कालव्यात पाणी सुटून जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असून, कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेवगाव तालुक्यातील हातगाव व कांबी परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहात आहेत. दिवसाआड होणाऱ्या वीजपुवठ्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही तसेच वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.’ मुंगी, हातगाव व कांबी, या तीन गावांसाठी हातगाव … Read more

संतप्त गुंतवणूकदारांनी शेअर व्यावसायिकाचे कार्यालय फोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुका शेअर मार्केटचे हब म्हणून ओळखला जात असताना गेल्या महिन्यापासून यातील एक- एक शेअर मार्केटिंग व्यावसायिक कोट्यवधी रुपयांची माया घेऊन पलायन करताना दिसत आहे. लाडजळगाव येथील घटना ताजी असतानाच गदेवाडी येथील एका शेअर मोर्केटिंग व्यावसायिक रविवार (दि.१४) रोजी पहाटे कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून फरार झाला असताना आज (दि. १५) रोजी … Read more

दोन एकरात शेतकऱ्याने घेतले टरबुजाचे चार लाखांचे उत्पादन

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या दोन एकर मोसंबीच्या बागेत मैनुद्दीन शेख यांनी आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली, या पिकास ठिबक सिंचनाव्दारे पाणी देऊन तब्बल ४ लाखांचे विक्रमी उत्पादन घेतले. एका टरबुजाचे वजन १५ ते २० किलो भरत असून, व्यापारी शफीक भाई शेख व युसुफभाई पठाण … Read more

सात लाखांच्या खंडणीसाठी धमकावले, दोघांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शेअर मार्केट व्यावसायिकास चाकूचा धाक दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी देण्यासाठी धमकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव शिवारात २९ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. महेश मच्छिंद्र जगताप (रा. गेवराई, ता. नेवासे) व योगेश शिवाजी वावरे (रा. नजीक चिंचोली, ता. नेवासे) अशी आरोपींची नावे आहेत. व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे … Read more

अवकाळीच्या धास्तीने बळीराजा हवालदिल

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील चापडगाव, बोधेगाव कृषी मंडळामध्ये कांदा, ज्वारी, बाजरी, आदी पिकांची काढणी चालू असून, ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चालू वर्षी जेमतेमच पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत अपेक्षित एवढी वाढ न झाल्याने रब्बीसह उन्हाळी हंगामाला मोठा फटका बसला आहे. थोड्याफार पाण्यावर शेतकऱ्यांनी … Read more

शहरटाकळी परिसरात कांदा काढणीला वेग

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी व परिसरात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे; परंतु, मजुरांचा तुटवडा भासत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे. शहरटाकळी दहिगाव-ने हा बागायत पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अवकाळी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यात पेरणी व लागवड झालेल्या गहू, हरभरा, कांदा पिकांचे नुकसान झाले होते. सध्या कांद्याचे भाव कोलमडलेले असतानादेखील … Read more