गुंतवणूकदारांना चुना लावून शेअर ट्रेडिंग व्यावसायिक पसार

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील आणखी एक शेअर ट्रेडिंग व्यावसायिक पळून गेल्याची घटना घडली असून, या प्रकाराने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक गुंतवणुकदारांना चुना लावत पूर्व भागातील एका शेअर ट्रेडिंग व्यावसायिकाने बुधवार (दि. १०) रोजी मध्यरात्री पलायन केल्याची घटना घडली होती, ही घटना ताजी असतानाच गुरुवार (दि.११) रोजी पुन्हा घोटण परिसरातील एका गावातील शेअर व्यावसायिकाने … Read more

Ahmednagar News : चारा-पाण्याअभावी पशुधनावर संकट ! जनावरांच्या किमती घटल्या, करावी लागतेय बेभाव विक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा अत्यल्प पाऊस अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्यामुळे आता उन्हाळ्यात पाणी पुरणार नाही असे चित्र आहे. कमी पाण्यामुळे अनेक ठिकाणी चारा व पाणीटंचाई निर्माण झालीये. शेवगाव तालुक्यातही दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत नाईलाजाने शेतकरी व पशुपालकांना चारा-पाण्याअभावी गोठ्यातील जनावरे बेभाव … Read more

अहमदनगर जिल्ह्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! शेअर मार्केट व्यावसायिकाने पलायन केल्याने गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील लाडजळगावसह परिसरातील अनेक गुंतवणुकदारांना चुना लावत एका शेअर मार्केट व्यावसायिकाने पलायन केल्याने गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. संतप्त गुंतवणुकदारांनी सदर व्यावसायिकाच्या कार्यालयाची फोडतोड केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात अनेकांनी शेअर ट्रेडिंग व्यवसायाची कार्यालये थाटली आहेत. भरघोस व्याजाच्या अभिलाषाने अनेकांनी आपले सोने, जमिनी, आदी मालमत्ता गहाण ठेवून तर काहींनी आपली मालमत्ता … Read more

Ahmednagar News : करंजीच्या जंगलाला भीषण आग

Ahmednagar News

Ahmednagar News : बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाअंतर्गत येणाऱ्या करंजी येथील डोंगराला आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेसह पशुपक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. करंजी येथील जंगलाला दरवर्षीच आग लागून जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी तर मार्च आणि एप्रिल दोन महिन्यात दोन वेळेस जंगलाला आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक … Read more

शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील तलाव व बंधारे भरून द्यावेत : माजी आ. घुले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या वर्षी पाऊस अतिअल्प झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पिकाची दैनीय अवस्था झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भभव कोरडे पडल्यामुळे नागरीकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून जनावरांचा चारा देखील सुकु लागला आहे. सध्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना उभ्या पिकासाठी … Read more

अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील रेणुकावाडी गावाजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहीती अशी की, महालक्ष्मी हिवरे येथुन गेल्या काही दिवसापासुन व्यवसाया निमित्त तिसगाव येथे स्थायीक झालेले दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (वय ३७ … Read more

विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तरुणाने सातवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित मुलीला शुक्रवारी (दि.५) मध्यरात्री अंबरनाथ येथून ताब्यात घेतले असून, मुलीला पळवणारा रोहित संजय राक्षे (रा. तिसगाव) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित मुलीची मेडिकल करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिसगाव येथे … Read more

‘त्यांनी’ निष्ठेच्या गप्पा मारू नयेत : लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही, अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत, असे प्रत्युत्तर आ. नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले. लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू असून, पाचव्या दिवशी करंजी येथे झालेल्या सभेत … Read more

चाळीस वर्षानतर उतरला महिलांच्या डोक्यावरील हंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कान्होबावाडी येथील महिलांना मागील ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती; परंतु करंजी ग्रामपंचायतने येथील ३० कुटुंबांना सार्वजनिक पाईपलाईन करून प्रत्येक घरी स्वतंत्र नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने कान्होबावाडी येथील महिलांचा चाळीस वर्षानंतर डोक्यावरील हंडा उतरला, अशी भावना येथील महिलांनी व्यक्त केली आहे. … Read more

युवतींची छेड काढणाऱ्यावर कारवाईसाठी मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील दोन युवतींची भरचौकात छेड काढणाऱ्या माथेफिरू व तथाकथित मनोरुग्णाविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज (दि.१) रोजी सकल हिंदू समाज शेवगाव यांच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शेवगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एका तथाकथित मनोरुग्ण माथेफिरू नशेच्या धुंदीत महिला व युवतींची … Read more

कॉपी प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर धुडगूस घालणाऱ्या कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना प्रशासनाने तत्काळ अटक करावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या शनिवारी (दि. ३०) रोजी शेवगाव तहसीलदारांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता दहावीच्या भूगोलच्या … Read more

तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : तिसगाव परिसरातील पारेवाडी, सोमठाणे, तिसगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळ व अवकाळी पावसाचा मढी यात्रेतील व्यावसायिकांना देखील अटक बसला. जोरदार आलेल्या वाऱ्यने येथील अनेक व्यावसायिकांचे तंब उडाले, साहित्याचे देखील नुकसान झाले त्यामुळे काही काळ यात्रा विस्कळीत झाली. भटक्यांची पंढरी … Read more

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने साखर गाठयांच्या दरात वाढ

Ahmednagar News

Ahmednagar News : होळीचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्यांना मागणी आहे. दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने यावर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे होळीच्या अगोदर पंधरा दिवसांपासून गाठ्या तयार करण्यास सुरुवात होते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांना मागणी असते. पूर्वी शिवरात्रीपासून पाडव्यापर्यंत महिनाभर हा व्यवसाय चालायचा, अगोदर मालाची … Read more

Mobile Blast : पॅटच्या खिशातून धूर निघू लागला आणि… मोबाईल खिशातून बाहेर काढताच घेतला पेट

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य यांच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य हे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दुकानात बसले होते, … Read more

शेवगाव : शेतकऱ्यांच्या विहीरीतून पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकऱ्यांच्या विहीरीतून ५ एचपीच्या दोन पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. प्रकाश कल्याण साळवे, ऋषीकेश लक्ष्मण साळवे अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून यांचा एक साथीदार पसार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील संजय रंगनाथ उगले, शुभम संजय उगले … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात २०२३/२४ या वर्षात अत्यंत अल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतमालाचे संपूर्ण नुकसान झाल्याने शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. शेवगाव तालुक्यातील ११३ गावांपैकी खरिपाच्या ३४ गावांमध्ये या आधीच ५० टक्क्यांच्या आत आणेवारी जाहीर झालेली असताना अद्याप अनुदान वाटपाचा जीआर आलेला नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात … Read more

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदाच्या हंगामात शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात जेमतेमच पाऊस झाल्यामुळे जमिनीवरील बहुतांश पाणीसाठे पूर्णक्षमतेने भरू शकले नाहीत, त्यामुळे भूजल पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकली नसल्याने मार्च महिन्याच्या सुरवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. परिसरातील तलाव, बंधारे कोरडे पडल्याने पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कत्तलखाना चालकांचा गोरक्षकांवर हल्ला

गोहत्या रोखण्याच्या उद्देशाने अमरापूर, ता. शेवगाव येथे गेलेल्या गोरक्षकांवर कत्तलखाना चालकांनी केलेल्या हल्ल्यात एक गोरक्षक जबर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्यात दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. सोमवार (दि.११) रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल … Read more