तीन दिवसांत साई संस्थानच्या दानपेटीत सव्वासहा कोटी रुपयांचे दान प्राप्त : गोरक्ष गाडीलकर

sai baba

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शनिवार २० ते सोमवार २२ जुलै या कालावधीत आयोजित श्री गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये ६ कोटी २५ लाख ९८ हजार ३४४ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. याबाबत पत्रकात गाडीलकर यांनी म्हटले, की देणगीमध्ये रोख स्वरुपात २ कोटी ५३ लाख २९ हजार ५७५ रुपयांची दक्षिणा … Read more

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी, बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचे मूल्यांकन करावे !

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असलेला सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावाच्या शिवारातून जात असल्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गाच्या कामात जात आहेत. हा महामार्ग जात असलेल्या भागाचा सर्व्हे करताना परिसरातील बधित शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे या भागातील बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच जमिनीचे मूल्यांकन करावे, अन्यथा करू नये, अशी मागणी … Read more

शहरात घाणीचे साम्राज्यामुळे शेवगाव शहर बनले आहे बकाल, नगरपालिकेचे होत आहे दुर्लक्ष !

kachara

शहरात ठिकठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे शहर बकाल होत असल्याचे दिसून येत असून, मुख्य बाजारपेठेतील रस्ते तसेच नागरी वस्तीतील परिसर, ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांनी गटाराचे रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आंदोलनाला उधाण आलेले असून, फक्त देखाव्या पुरतेच आंदोलने सुरू असून, नागरिकांचे … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरातील ८५ हजार शेतकऱ्यांना १२९ कोटींचा पीकविमा मंजूर !

rhorat

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले की, आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी पाठपुरावा … Read more

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेतील बैठकीनंतर महसूल संघटनेचा निर्णय !

radhakrushn vikhe

महसूल खात्याच्या विविध विभागातील कर्मचारी. महसूल कर्मचाऱ्यांच्या संप आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संप थांबवण्याचे आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री … Read more

साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करीता ४० कोटीचा निधी मंजूर, मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेला येणार मूर्त स्वरूप!

laser show

शिर्डी शहरामध्ये साकार होणार्या श्री साईबाबांच्या जीवनावरील थीम पार्कसाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.शहराच्या विकासासाठी नगरपरीषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी दिला जातो. शिर्डी नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरात येणार्या लाखो भाविकांसाठी लेझर शो आणि थिम पार्क निर्माण करण्याची संकल्पना महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यान्वित केली आहे.यासाठी राज्य सरकार … Read more

आंदोलन थांबविण्यासाठी पाच कोटींची ऑफर !  दरमहा पाकीट देण्याचेही आमिष; खा. लंके यांचा गौप्यस्फोट,आंदोलनाचा दुसरा दिवस

Ahmednagar News  :   मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आले. पाच कोटी रूपये देतो, महिन्यालाही पाकीट ठरवून देतो अशी ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट खा. नीलेश लंके यांनी केला. जर हे लोक पाच कोटी रूपये देत असतील तर हे पैसे कुठून आले ? वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पध्दतीने … Read more

नागरिकांच्या घरात शिरले गटारीचे पाणी; संतप्त महिलांनी पालिका कार्यालयात जात केले असे काही.. !

Ahmednagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे असे आजार पसरू नयेत यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते. मात्र अशी मोहीम तर दूरच पण पाथर्डी नगरपालिका हद्दीत असलेल्या साईनाथ नगर विभागात नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत, या विभागात राहणाऱ्या महिलांनी पालिका कार्यालयात धरणे … Read more

सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड : नगर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शरद पवार आक्रमक; दिला ‘हा’ इशारा…!

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत १ हजार २७१ किलाेमीटरचा सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्यात येत आहे. राज्यात नाशिक, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांतून हा महामार्ग जात आहे. केंद्र सरकारचा महत्वपूर्ण सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावाच्या शिवारातून जात आहे. त्यामुळे येथील अनेक शेतकरी बाधित होत आहेत. … Read more

स्व.मा.खा. दिलीप गांधींचा मुलगा सुवेंद्र गांधींबाबत न्यायालयाचे मोठे आदेश, ‘ते’ पैसे नाहाटांनी घेतले?

nyayalay

Ahmednagar News :  नगर अर्बन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी व नवी दिल्ली येथील खटल्यातील कलम १३८ अन्वये आरोपी असलेल्या सुवेंद्र गांधी यांना ५० लाख रुपये ६० दिवसाच्या आत भरण्याचे नवी दिल्ली न्यायालयाने आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दिल्लीतील गणपती ट्रेडर्स संस्थेकडून घेतलेल्या १८ कोटीच्या रकमेची परतफेड करताना ८ कोटीचा दिलेला धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने … Read more

शेअर मार्केट ट्रेडिंगचा फंडा; दोन एजंटांनी ‘या’ तालुक्यातील अनेकांना घातला दोन कोटींचा गंडा ..?

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली आजपर्यंत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र अद्याप देखील या घटनांतून नागरिकांनी फारसा बोध घेतला नसल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सर्वात आधी व सर्वात जास्त शेवगाव तालुक्यातील नागरिकांची फसवणूक झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नुकतीच शेवगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या … Read more

शेतकरी है त्यो ! बिबट्याने घरातल्या कुत्र्याला उचलले, शेतकरी थेट बिबट्यालाच भिडला, अहमदनगरमधील थरार

bibatya

Ahmednagar News : सध्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत, हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी नेहमीच दहशतीखाली असतात. परंतु शेतकरी जर इरेला पेटला किंवा जवळच्या व्यक्तीला काही इजा झाली तर तो जीवाची पर्वा न करता बिबट्यालाही पळवून लावू शकतो. असेच काहीसे घडले आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात. अर्जुन वेताळ असे या शेतकऱ्याचे नाव असून ते कोपरगाव तालुक्यातील … Read more

रक्षाबंधनाच्या दिवशी ‘या’ महिलांच्या खात्यात येणार पैसे …!

Ahmednagar News : मागील पस्तीस वर्ष राजकारण, समाजकारण करीत असताना जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यावर्षी सादर केलेला अर्थसंकल्प गरीब आणि महिलांच्या विकासाला समोर ठेऊन करण्यात आला आहे. महिलांना मानसन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असून, रक्षाबंधनाच्या काळात लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते जमा करणार आहोत. या … Read more

खा. निलेश लंकेंसह उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, शुगर लेव्हल वाढली..

lanke

Ahmednagar News : खा. निलेश लंके यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. जिल्हा पोलिसांच्या चुकीच्या कारभाराविरोधात हे आंदोलन असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. सोमवारी दुपारपासून ते उपोषणाला बसले आहेत. दरम्यान आता उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल मधून डॉक्टरांची एक तीन या ठिकाणी आली होती. त्यांनी उपोषण कर्त्यांची तपासणी केली. या तपासणीत खासदार लंके … Read more

पिण्याचा प्रश्न मिटला ! जाणून घ्या कुकडी, दारणा, मुळासह सर्वच धरणातील पाणीसाठा

Mula Dam Water Stock

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्हयाला वरदान ठरणाऱ्या अनेक धरणात पाणीसाठा वाढत चालला आहे. याठिकाणी आपण सर्वच धरणातील पाणीसाठा जाणून घेणार आहोत. दारणा : दारणाच्या पाणलोटात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने दारणात काल सकाळ पर्यंत २८६ दलघफू पाणी २४ तासांत दाखल झाले. गेल्या दोन महिनाभरापासुन पावसाने दडी मारलेली आहे. सात टीएमसी … Read more

नगर अर्बन बँक प्रकरण; पोलिसांना गरज भासेल तेव्हा… ! ‘या’ अटीवर ‘त्या’ बंधूंना अटकपूर्व जामीन मंजूर

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे कर्जदार सुशील हनुमानदास सारडा व संजय हनुमानदास सारडा या बंधूंना नुकताच खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. पोलिसांना तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याच्या अटीवरन्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणात सारडा बंधूतर्फे ऍड .आशिष जाधवर यांनी काम पाहिले व त्यांना ऍड.अरविंद एस. काकाणी यांनी सहकार्य … Read more

लोकसभेवेळी मोबाइलचे सीडीआर तर काढलेच, लोकेशनही ट्रेस केले.. सराफांकडून अडीच कोटी घेतले.. खा. लंकेंचे भयंकर आरोप…

lanke

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांच्या कार्यकाळात अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. जिल्ह्यातील सराफांच्या तक्रारी असून, त्यांच्याकडून दोन महिन्यात अडीच कोटी वसूल केले गेले. कर्डिले नावाचा कर्मचारी तर जिल्हाभरात पोलिस ठाण्यात पीआय कोण बसवायचे हे ठरवतो, असा कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणूक काळात तर माझेच मोबाईल ट्रेस केले, सीडीआरही काढले, असा गंभीर आरोप … Read more

खरिपाची पिके जोमात; युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी कोमात, शेतकऱ्यांना सतावतेय ‘ही’ भीती..?

Ahmednagar News : यावर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्या शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिके आलेली आहेत. सध्या खरिपाच्या पिकांची मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. मात्र या मशागतीनंतर पिकांना युरियाची गरज आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही. काही दुकानांमध्ये युरिया घ्यायचा असेल तर त्याच्याबरोबर गरज नसताना इतर खते घ्यावी लागतात. काही दुकानात मोजक्या आणि मोठ्या … Read more