नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाला पावसाने झोडपले : जामखेड तालुक्यातील ‘हे’ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Ahmednagar News : जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळत असलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हा पाऊस जिल्ह्याच्या दक्षिणेतील जवळपास सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पावसाने अनेक भागातील खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, पाणीटंचाईचा प्रश्न शंभर टक्के मिटला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले होते. आता मात्र हे संकट टळले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या व्यवहारातून वाद, तिघांचा खून करण्याचा प्रयत्न

crime

Ahmednagar News : लाकडी दांडे, रॉड, पाईपने हल्ला करत तिघा जणांचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. वाहन व पैशाच्या व्यवहारातून हा राडा झाला असल्याचे बोलले जात आहे. ही हाणामारीची घटना रेल्वे स्टेशन गेट समोर घडली. प्रकाश राजू लोखंडे, चंद्रकांत अशोक सातपुते, अमोल किशोर खोमणे हे तिघे यामध्ये जखमी झाल्याची माहिती समजली आहे. … Read more

रोडरोमिओंची मस्ती; शाळकरी मुलींच्या जीवावर बेतली: अहमदनगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : सध्या शाळा महाविद्यालयातील रोडरोमिओंमुळे शाळा महाविद्यालय प्रशासनासह पालक देखील चांगलेच वैतागले आहेत.महाविद्यालयासह अनेक पर्यटन स्थळी देखील यांचा त्रास वाढला आहे. रस्त्यावर चालताना मोटारसायकलचा स्टंट करणे, आरडाओरडा गोंधळ असे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र संगमनेर तालुक्यात रोडरोमिओंची मस्ती दोन शाळकरी मुलींच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. संगमनेर शहरानजिक असलेल्या कासारवाडी गावाच्या परिसरात पुणे-नाशिक … Read more

अहमदनगरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा भेदून चंदन चोरांनी जे केलं ते ऐकून थक्क व्हाल !

chandan chor

Ahmednagar News :  चोरी, दरोडे, छोट्यामोठ्या चोऱ्या आदींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. तसेच जिल्ह्यात अनके ठिकाणी चंदनचोरी होत असल्याच्याही घटना घडत असल्याचे दिसते. परंतु आता चंदनचोरांनी थेट श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा भेदून जे केलंय ते पाहून आता सर्वसामान्य डोक्याला हात लावतायेत. त्याच झालं असं की, … Read more

अहमदनगर भाजपामध्ये भूकंप ! युवा नेते विवेक कोल्हे शरद पवार गटात सामील होणार ?

Ahmednagar Politics Vivek Kolhe

Ahmednagar Politics Vivek Kolhe : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. खरंतर भारतीय जनता पक्षाचे नगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी कोल्हे समर्थकांनी त्यांना शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण सुद्धा दिले आहे. शिर्डी येथे आयोजित … Read more

आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आ.पंकजा मुंडे यांचे नाव; आमदार मोनिका राजळे यांचे मोठे वक्तव्य

Ahmednagar News : पूजा खेडकर प्रकरणावरुन आ.पंकजा मुंडे यांना ट्रोल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. खेडकर कुटुंबाने मुंडे यांना बारा लाख रुपये देणगी दिल्याचे निराधार वृत्त परविले जात आहे. प्रसार माध्यमांतून काही विघ्नसंतोषी व विरोधकांनी खोट्या बातम्या देवून मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी खटाटोप चालविलेला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट असल्याची टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा खून कसा झाला? २४ तासांत छडा, त्याच्या सहकाऱ्यांनी केले ‘असे’ काही अन सपसप खुपसवले..

murder

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील खून, महिलांवर अत्याचारासह अनेक गुन्हे असणाऱ्या राहाता तालुक्यातील लोणी येथील सराईत गुन्हेगार उमेश नागरे याची हत्या झाली. या सराईत गुन्हेगाराचा भयंकर अंत झाल्याची घटना घडली. धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आता या सराईत गुन्हेगार उमेश नागरे याची हत्या त्याच्या तीन साथीदारांनी पैशाच्या देवाण घेवाणीतून … Read more

गेली १२ वर्षे सगुना भातशेतीचा वापर करून हे कुटुंब मिळवत आहे, ३ पट अधिक उत्पन्न !

saguna sheti

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या पेंडशेत या गावातील काशिनाथ खोले व त्यांच्या पत्नी सुमन खोले यांचे कुटुंब हे शेतीमध्ये सगुना भातशेती या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. हे कुटुंब कमी खर्च व कमी मेहनत करत तीनपट भाताचे उत्पन्न घेत असून त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही शेतकरी खोले यांच्या शेतीला भेट देत … Read more

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत चार तिर्थक्षेत्रांच्या समावेशामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाला पाठबळ !

shirdi

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत जिल्ह्यातील चार तीर्थस्थानांचा समावेश झाल्याने जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी सुरू केलेल्या कामाला पाठबळ मिळाले आहे, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री विखे यांनी पहील्याच जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने आराखडा तयार करून रोजगार निर्मिती करण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने … Read more

वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शैक्षणिक दाखले मिळण्यास विलंब !

server down

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेमुळे ऑनलाईन कामांची संख्या अचानक वाढल्यामुळे सर्व्हर बंद पडत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळण्यास विलंब होत आहे. दिवसभरात अति कमी प्रमाणात दाखले निकाली निघत आहेत. अनेक दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्री उशीरापर्यंत काम करण्याची वेळ आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता … Read more

गाव पेटवून देण्याची धमकी, तलवार, गावठी कट्टा घेऊन ‘राडा’, अहमदनगरमधील प्रकार

hanamari

Ahmednagar News : ग्रामस्थांना जिवे मारण्याची धमकी देत गाव पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. हातात लाठ्या-काठ्या, तलवार, गावठी कट्टा घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथे घडला. हा प्रकार रविवारी (दि.१४) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी रवी डावखर (रा. आळेफाटा, ता. जुन्नर), तेजस रेपाळे, विशाल गोंधे, प्रदीप आवारी, … Read more

पोलिसांची पाथर्डीत छापेमारी ! आयएएस पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा शोध सुरू, कलेक्टरही ऍक्शन मोडवर..

khedkar

Ahmednagar News : विविध कारणामुळे सध्या राज्यभर चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे. पुणे पोलिसांनी पाथर्डी आणि मुंबईत छापेमारी केली आहे. पोलीस आयएएस पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांना मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांना शोधत आहेत. त्या अनुषंगानेच पुणे पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील फार्म हाऊसवर छापेमारी केली असल्याची माहिती … Read more

राहुरीच्या पूर्व भागात पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी आनंदित !

sheti

सोमवारी दुपारी राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, त्याचप्रमाणे ऊस, मका, कांदा, सहित घासासारख्या चारा पिकांना देखील जीवदान मिळाले आहे. या भागातील शेतकरी, कष्टकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर सोमवारी दुपारी सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्याची पुढील आठ ते पंधरा दिवस पिकांना पाणी देण्याची चिंता यामुळे मिटली आहे. … Read more

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यासह भंडारदऱ्याचा परिसर पर्यटकांनी गजबजला !

bhandardara

पर्यटनाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदऱ्याला वीक एंडच्या सुट्टीचे औचित्य साधत हजारो पर्यटकांनी भेट दिली असून भंडारदऱ्याच्या परिसरातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांनी गजबजलेले दिसून आले. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा संततधार पाऊस सुरू असल्याने चार टीएमसीच्या पुढे गेला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर निसर्ग पर्यटनासाठी ओळखला जातो. त्यातच पुणे जिल्ह्यातील पर्यटन बंद असल्याने भंडारदऱ्याला पर्यटकांची जत्रा भरलेली … Read more

अहमदनगरमध्ये २४ तासांत कोणत्या तालुक्यात किती पाऊस? १२ धरणांमध्ये किती टक्के झाला पाणीसाठा? पहा..

pavus

Ahmednagar News : मागील चार ते पाच दिवसांपासून केवळ आकाशात ढग येऊन निघून जात असताना रविवारी दुपारी व सोमवारी दिवसभर नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः झोडपले. नगर शहरात ठिकाठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. ग्रामीण भागात रविवारपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीनाले भरू वाहू लागले. काही ठिकाणी … Read more

स्वतःची निष्क्रियता झाकण्यासाठी लाभार्थी भगिनींमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे पाप भाजपवाल्यांनी करू नये !

rashtravadi

राहुरी मतदारसंघात माजी राज्यमंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांची यंत्रणा महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी झटून काम करीत आहे. या गोष्टीचा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांना पोटशूळ उठला आहे. यापेक्षा भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी सरकारने या अर्थ संकल्पात मतदारसंघाला एक रुपयाचाही निधी का दिला नाही, असा जाब शासनाला विचारायला पाहिजे होता. मात्र त्यांनी हे काम न करता … Read more

अहमदनगर जिल्ह्यात जोर’धार’ ! काही गावांत तलाव ओहरफ्लो, तर काही ठिकणी घरांत शिरले पाणी, रस्त्यांनाही नद्याचे स्वरूप

pavus

Ahmednagar News : सोमवारी (दि. १५) अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर शहरासह कर्जत, जामखेड, पाथर्डी, घोडेगाव, नगर तालुका आदींसह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्या नाले भरून वाहू लागले तर अनेक ठिकाणी तलावही भरले. रस्त्यांनाही ओढ्याचे स्वरूप आलेले पाहायला मिळाले. रविवारी (दि.१४), सोमवारी (दि.१५) जामखेड शहर, साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी … Read more

ज्यांनी आधी नवे ठेवली आता तेच लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत – कर्डीले !

kardile

राज्यातील गोरगरीब, गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील गोरगरीब गरजू पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेला राज्यभरातून सर्व महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र या योजनेला आधी नावे ठेवणारे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आता या योजनेचे श्रेय … Read more