‘मुळा’त दोन महिने पुरेल एवढेच पाणी; गेल्या वर्षापेक्षा ७७९६ दलघफू कमी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होतानाचे चित्र आहे, नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात मागीलवर्षी (मे २०२३) १४ हजार ६६५ दशलक्ष घनफूट पाणी होते. यंदा मात्र धरणात अवघा ६ हजार ८६९ दलघफू एकुण जलसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त जलसाठा हैपाणी अवघे दोन महिने पुरेल एवढेच असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची … Read more

तरुणाच्या खूनप्रकरणी एका आरोपीला सुनावली ७ दिवसांची पोलिस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विजय अण्णासाहेब जाधव, वय ३०, रा. आरडगाव, बिरोबानगर असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत विजय जाधव, वय ३० या तरुणाचा … Read more

Ahmednagar News : कुकडी आवर्तनाने मारले, अवकाळीने तारले ! पावसाने फळबागा, पिके तरली..

Maharashtra Rain

Ahmednagar News  : श्रीगोंदे तालुक्यातील शेती पूर्णपणे कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु नेते मंडळींची उदासीनता, कुकडी प्रकल्प अधिकाऱ्यांचा नियोजनातील हलगर्जीपणा, आवर्तन काळात राजकीय नेत्यांचा होणारा हस्तक्षेप, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदारांसह समितीच्या सदस्यांचे मौन बाळगणे यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुकडीच्या पाण्याबाबत नेहमीच अन्याय होतो. काही दिवसांपूर्वीच सुटलेल्या आवर्तनात फक्त सहा दिवसच पाणी श्रीगोंद्याच्या वाट्याला आल्यामुळे … Read more

Ahmednagar Breaking : गोठ्यात करंट शिरून ९ म्हशींचा मृत्यू, पत्नीही टाकत होती चारा.. शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सगळं संपलं..

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. म्हशींच्या धारी व इतर कामे उरकून शेतकरी कुटुंब बाहेर बसले. शेतकऱ्याची पत्नी मात्र गोठ्यात बांधलेल्या म्हशींना पाणी पाजून शेजारीच असलेल्या कडबाकुट्टीतील चारा टाकत होत्या. तितक्यात घराच्या विद्युत मीटरची वायर तुटून तिचा स्पर्श पत्र्याच्या गोठ्याला झाला. क्षणातच गोठ्यातील नऊ म्हशींचा विजेच्या झटक्याने जागीच … Read more

श्रीरामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस ! मोठी झाडे रस्त्यावर

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील वडाळा महादेव परीसरात काल गुरूवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यावेळी सुसाट वादळी वारे वाहत असताना अनेक लहान मोठे झाडे पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वादळामुळे पडल्या असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले होते. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीज चोरी प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : वीजपुरवठा करणाऱ्या सर्व्हस वायरला टॅपिंग करून हॉटेलमधील उपकरणांना डायरेक्ट वीजपुरवठा केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील नगर- औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल दीपकच्या मालकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की प्रवरासंगम येथे दीपक दिलीप अगले (वय ४५) याचे हॉटेल दीपक नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी … Read more

Rahuri Railway Station : राहुरी रेल्वे स्टेशनचे स्वरूप बदलणार!

Rahuri Railway Station

Rahuri Railway Station : राहुरी तालुक्याच्या विकासाचा महत्वाचा घटक असलेले राहुरी रेल्वे स्टेशन विकसित केले जात असून प्रवासी व नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन कात टाकणार असून त्यामुळे पुढील काळात नक्कीच वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या … Read more

आदिवासी भागामध्ये बोगस डॉक्टरांचे बस्तान ! अघोरी उपचार करून जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोलेच्या आदिवासी भागामध्ये बंगाली डॉक्टरांचे आदिवासी बांधवांवर अघोरी उपचार सुरु आहेत. आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर वेळीच पायबंध घातला गेला नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आदिवासी भागामध्ये निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला आदिवासी बांधवांचे वस्तीस्थान असून याच आदिवासी बांधवांच्या वस्तीस्थानामध्ये बंगाली डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. मुळातच कोणत्याही … Read more

अहमदनगर कोपरगाव रस्त्यावरील बेकायदा होर्डिंग्ज ! दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची

Ahmednagar News

Ahmednagar News : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. तर ७५ जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर नगर- कोपरगाव रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे होर्डिंग्ज सुरक्षित उभारलेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेची आहे. येथेही अशी दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची आहे. मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा व पावसाने होर्डिंग कोसळले. यात … Read more

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे

Ahmednagar News

Ahmednagar News : पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी कोहंडी येथे लहान मुलांसह संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला काल गुरूवारी (दि.१६) टाळे ठोकले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई भांगरे यांना हे समजताच त्यांनी तत्काळ गावात येत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्या कानावर महिला, ग्रामस्थांच्या भावना टाकल्या. ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची वणवण असून नागरिकांना विहिरीतील खराब पाणी … Read more

नेवासा तालुक्यातील पाईपलाईन फोडल्याने चार दिवसांपासून पाणीबाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीजवळील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. त्यामुळे गावाला चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणीपुरवठा होण्यास ग्रामपंचायतकडून विलंब होत आहे. एकाच महिन्यात जवळपास तीन वेळाही पाईपलाईन फोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी याच ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील शंभर फूट इलेक्ट्रिक केबल कापून चोरून नेली … Read more

Ahmednagar News : जीर्ण इमारतींनी नगरकरांचा जीव मुठीत, दाळमंडईत एक कोसळली ! एकूण किती इमारती धोकादायक? नागरिकांना किती धोका? पहा एक रिपोर्ट..

file photo

Ahmednagar News : नगर शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो. पण त्यावर काहीच उपाययोजना होताना दिसत नाहीत. नगर शहरात जवळपास शंभराहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, त्या कधीही कोसळण्याची भीती नगरकरांना आहे. दरम्यान नुकतीच काल (१५ मे) शहरातील दाळमंडईतील इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर आहे, त्यात एखादी … Read more

Ahmednagar News : दाळमंडईतील धोकादायक इमारतीचा भाग कोसळला ! ९० वर्ष जुनी इमारत..

Ahmednagar News

Ahmednagar News : शहातील दाळमंडई येथील जुन्या इमारतीचा एक भाग बुधवारी (दि. १५) रात्री अचानक कोसळला. ही घटना कळताच महापालिकेच्या बांधकाम आणि अग्निशामक विभागाने गुरुवारी (दि. १६) संयुक्त कार्यवाही करत सदरची धोकादायक इमारत उतरून घेण्यास सुरुवात केली आहे. दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक इमारत या पथकाने उतरून घेतली आहे. सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस चालू आहे. तसेच … Read more

Ahmednagar News : गावात दोन साधू आले, आशीर्वाद देतो म्हणत महिलेला लुटले, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी तुम्हाला आशीर्वाद देतो, असे म्हणून महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी टेलरिंग काम करणारी ३८ वर्षीय आशा राजेश बोरुडे (रा. वामनभाऊ नगर) या महिलेने पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दुपारी शेवगाव रस्त्यावरील एका दुकानात आशा बोरुडे असताना दोन इसम … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दीड महिना पुरेल एवढाच चारा ! ‘अशी’ आहे स्थिती व ‘असे’ आहे नियोजन

chara tanchai

Ahmednagar News : गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सध्या तरी जिल्ह्याला चारा टंचाई भारसणार नसली तरी पावसाळा लांबला तर पुढे जिल्ह्याला चाराटंचाईला तोंड द्यावे लागेल अशी परिस्थिती आहे. सध्या जिल्ह्यात पुढील … Read more

अहमदनगरकरांना इशारा ! वादळी वाऱ्यापासून सुरक्षितता बाळगा, चार दिवस वादळासह पावसाची शक्यता

Maharashtra Rain

भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. गुरुवारी (दि. १६) विजांच्या कडकडाटासह वादळवारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच अहमदनगरसह, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यात आगामी तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. वादळी वाऱ्यापासून सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वादळाचे धुमशान सुरूच ! ‘या’ तालुक्यात कानठाळ्या बसवणाऱ्या मेघगर्जना, वीज पडून गाय, बैल, मेंढ्या ठार, फळबागा झोपल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्याचा व सोबतच येणाऱ्या पावसाचा मोठा फटका अहमदनगर जिल्ह्याला बसत आहेत. पावसापेक्षा वादळी वारे जास्त असल्याने नुकसान जास्त होत आहे. मागील महिन्यातही मोठे नुकसान अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. आताही मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याचे धुमशान सुरूच आहे. काल मंगळवारी कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांत … Read more

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मानधनापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावलेल्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी चोख कर्तव्य बजावूनही त्यांना मानधनापासून वंचित ठेवल्याचा प्रकार घडल्याने केंद्रीय निवडणुक आयोगाचा समान नियम असतानाही जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना मानधनापासून वंचित ठेवल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. देशात सुरु … Read more