काकडवाडी येथील युवक अडीच महिन्यांपासून बेपत्ता

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील एक युवक तब्बल गेल्या अडीच महिन्यांपासून घरातून बेपत्ता आहे. सोमनाथ राजाराम गायकवाड (वय ३२ वर्ष) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. काकडवाडी येथील रहिवाशी सोमनाथ राजाराम गायकवाड हा युवक … Read more

नगर दक्षिणेत विखे की लंके ?

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेच्या निवडणुकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला असून, या निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे बाजी मारतात, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महाविकास आघाडीचे निलेश लंके हे बाजी मारतात, याबाबत शेवगाव तालुक्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दावे -प्रतिदावे केले जात आहेत. नुकत्याच … Read more

भर उन्हाळ्यात महावितरणच्या शॉक ट्रीटमेंटमुळे संताप, दिवस-रात्र वीज गायब

Ahmednagar News

Ahmednagar News : महावितरणच्या मनमानी कारभाराला चितळी ग्रामस्थ त्रस्त झाले असून रोजच रात्री व दिवसा गावठाण भागासह, वाड्या वस्त्यावर वीज गायब असल्याने भर उन्हाळ्यात महावितरणच्या शॉक ट्रीटमेंट मुळे संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिनाभरापासून चितळी येथे शेतीच्या व घरघुती विजेचा खेळखंडोबा झाला आहे. कधी भारनियमन तर कधी दुरुस्ती तर कधी रात्र-रात्र बत्ती गुल होत असल्याने … Read more

अखेर निळवंडेच्या उजव्या कालव्यात पाणी सोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : आग्रही मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात अखेर पाणी सोडण्यात आले. यापूर्वी २६ एप्रिल २०२४ रोजी निळवंडे उजवा कालव्याचे लाभार्थीस आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर काल बुधवारी (दि.१५) निळवंडे धरणातून उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले असून सदर पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचून त्याचे योग्य वाटप … Read more

अवकाळीचा फटका वाळवणीच्या पदार्थांनाही

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाळ्याच्या आधी वाळवण, मसाले तयार करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांमध्ये लगबग सुरू आहे. एकीकडे महिलावर्ग यासाठी साहित्याची जमवाजमव करून विविध पदार्थ बनविण्यात व्यग्र आहे. तर दुसरीकडे या वस्तूंना बाजार मागणी असल्याने बचतगटातर्फेही हे पदार्थ बाजारात विकण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने उन्हाळी पदार्थ बनवणाऱ्या महिला चिंतेत सापडल्या आहेत. … Read more

राहुरीत विनानंबर, फॅन्सीनंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील विनानंबर प्लेट तसेच फॅन्सीनंबर प्लेट असलेल्या ७६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. राहुरी पोलिसांनी काल बुधवारी (दि. १५) या कारवाईत ४६ हजाराचा दंड आकारला आहे. भविष्यात पुन्हा दंडात्मक कारवाई होऊ नये, यासाठी नागरिकांकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेतल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागीला वर्षी सन २०२३ मध्ये एकूण … Read more

काजवा महोत्सवाला यंदाही पर्यटकांची गर्दी होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल होणार आहे. या महोत्सवासाठी अगोदरच बुकींग फिक्स झाल्या आहे असून काजव्यांसाठी भंडारदरा सजला आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभायाण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या … Read more

अकोले तालुक्यात दोन गावांसह २० वाड्यावर टँकरने पाणी पुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणाच्या अकोले तालुक्यात सध्या पाणीटंचाई जाणवायला लागली असून तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या टँकरची गरज भासणाऱ्या गावे व वाड्यावस्त्यांची संख्याही वाढली आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मन्याळे, मुधाळणे या २ गावासह २० वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून … Read more

अखेर मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा धरणाच्या मुळा डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तीन दिवसांपासून मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्यात आल्याने या कालव्यावरील लाभार्थी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत. वाढत्या उन्हाळ्यात श्रीरामपूर विधानसभा मतदार संघांतर्गत राहुरी तालुक्यातील ३२ गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला … Read more

सावेडी उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

Ahmednagar News

Ahmednagar News : बाहेर गावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून रोकड सह सोन्याचे दागिने असा ५३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंट मध्ये घडली. गेल्या आठवडा भरात सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी बंद घरे फोडली असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले … Read more

शिलेगाव येथे तरुणाचा खून, विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याला मुळा नदीपात्रातील एका विहिरीत टाकून त्याचा खून केला आहे. काल बुधवारी (दि. १५) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळानदीच्या पात्रात असलेल्या एका … Read more

Ahmednagar News : ‘जरांगे साहेबांनी आता उपोषण करू नये, तर..’ अहमदनगरमधील मराठा समाजाचा चार जूनच्या उपोषणाबाबत वेगळाच सूर..

Manoj Jarange Patil

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आंदोलने केली तसेच या आंदोलनांना राज्यव्यापी बनवण्यात देखील त्यांना यश आले. त्यांच्या मागण्या मान्य केल्या असे एकीकडे सरकार म्हणत असतानाच दुसरीकडे सगेसोयरे बाबत मनोज जरांगे मात्र ठाम आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. ते येत्या ४ जूनला पुन्हा उपोषणाला बसणार असून … Read more

Ahmednagar News : वाढत्या उन्हाचा कहर कुक्कुटपालनाच्या जिवावर ! मरतुकीचे प्रमाण वाढले, चिकनचे दर वाढले, पण गणित जुळेना

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील सर्वच भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम कुक्कुट उद्योगावर झाला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोंबड्या जगवायच्या कशा, असा प्रश्न कुक्कुटपालन व्यावसायिकांना पडला आहे. अत्याधुनिक पोल्ट्री शेडमध्ये उष्णतेचा जास्त प्रभाव जाणवत नसला तरी खुल्या शेडमधील कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाणही वाढले व वजनात कमालीची घट जाणवत आहे. त्यामुळे बाजारात दर चांगला … Read more

Ahmednagar News : निवडणूक संपली आता पाणी द्या.. अहमदनगरमध्ये २९१ गावे १५४४ वाडीवस्त्यांवर पाणी नाही, सध्या सुरु आहेत ‘इतके’ टँकर

pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघात निवडणुका पार पडल्या. यामध्ये प्रशासन, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही बिझी होते. त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईकडे लक्ष द्यायला वेळच पुरला नही. परंतु आता ही निवडणूक संपल्याने तहानलेल्या लोकांना पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ … Read more

नगर दक्षिणमध्ये पुन्हा सुजयपर्व की निलेश लंके ? कार्यकर्त्यांत पैंजा लागल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र खा. डॉ. सुजय विखे हे पुन्हा एकदा भाजपा महायुतीकडून उमेदवार असल्याने मंत्री विखे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली असून, विरोधात असलेले शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार पारनेरचे आ. निलेश … Read more

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पाहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे. नागवडे यांनी म्हटले आहे … Read more

गळफास घेत एकाची आत्महत्या ! पंचक्रोशीत खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : तळेगाव दिघे येथील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात गळफास घेत एकाने आत्महत्या केली. भागवत बाळा दिघे (वय ४५), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दिघे येथील रहिवासी भागवत बाळा दिघे यांचा … Read more

मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसह वीट उत्पादकांचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहर व तालुक्यामध्ये काल मंगळवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. तब्बल दोन तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह तालुक्यातील वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये १५ तास वीज परवठा विस्कळीत झाला. संगमनेर शहर व परिसरातील गावांमध्ये मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अवकाळी पावसात प्रारंभ झाला. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन … Read more