पोल्ट्री व्यवसायाला ऊन व महागाईचा फटका ! पशुखाद्यासह औषधांचे भाव वाढले

Maharashtra News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंद्यांपैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता वाढते ऊन, पाणी टंचाई व महागाईमुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ब्रॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. महिनाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन सुरू असल्याने अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका … Read more

पाण्याअभावी पिके सुकू लागली ! शेतकरी हवालदिल

Agricultural News

 Agricultural News : उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे बोअरवेल व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाणीपातळी खाली गेल्याने तालुक्यासह तरवडी, कुकाणा, अंतरवाली, जेऊर, देवगाव, सुकळी, नांदूर, वडूले, चिलेखनवाडी, देवसडे आदी भागातील पिके सुकू लागली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील शेतात उभी असलेली मका, गहू, हरभरा हे पिके शेवटच्या पाण्यावर आली आहेत. परंतु पाणी पातळी खोल … Read more

Ahmednagar Crime : कामाला का गेला नाही असे विचारल्याने एकास मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : कामाचे पैसे देऊन तुम्ही कामाला का नाही गेला, येथे काय करता? असे विचारल्याचा राग आल्याने आरोपी साहेबराव जाधव याने अशोक दिवे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना दि. १८ मार्च रोजी राहुरी तालूक्यातील कणगर येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अशोक मच्छिद्र दिवे (वय ३५ वर्षे, रा. कणगर, … Read more

श्रीरामपूर च्या रिमांड होम मधील विद्यार्थी बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये राहून क.जे. सोमय्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला सागर अशोक चिलप या विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड होणे हि बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या येथील क.जे. सोमय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर … Read more

Anganwadi Bharti : अंगणवाडीस ठोकले टाळे ! मदतनीसाची भरती प्रक्रिया मान्य नसल्याचा आरोप

Anganwadi Bharti

Anganwadi Bharti :  संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावा अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळेपठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रीया मान्य नसल्याने संतप्त महिलांनी काल मंगळवारी (दि. १९) अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले आहे. जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नाही, असा इशारा महिलांनी दिला आहे. याप्रसंगी … Read more

संगमनेर तालुक्यातील रस्ता चार वर्षापासून प्रलंबित ! उपोषणाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील शिदोंडी ते वरवंडी या घाट रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहे. सुरूवातीला केलेले सर्व खडीकरण उखडून हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालवताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था खड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा … Read more

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने साखर गाठयांच्या दरात वाढ

Ahmednagar News

Ahmednagar News : होळीचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्यांना मागणी आहे. दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने यावर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे होळीच्या अगोदर पंधरा दिवसांपासून गाठ्या तयार करण्यास सुरुवात होते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांना मागणी असते. पूर्वी शिवरात्रीपासून पाडव्यापर्यंत महिनाभर हा व्यवसाय चालायचा, अगोदर मालाची … Read more

‘कुकडी’ तून विसापूर धरणात सोडणार पाणी ! पाणी सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीच्या आवर्तनातून विसापूर धरणातून २०० एमसीएफटी पाणी सोडून त्याखालील आठ गावांना आवर्तन सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांना दिल्या असल्याचे राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले. १ मार्चपासून सुरू असलेल्या कुकडीच्या आवर्तनातून विसापूर प्रकल्पात पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे … Read more

विसापूरखालील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी..

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे संपन्न झाली होती. या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसाच्या आवर्तनामध्ये विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे … Read more

Ahmednagar News : कंटेनरवर कार आदळल्याने चालक ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव आलेली मारुती ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला. ही घटना नगर सोलापूर महामार्गावर साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेलसमोर सोमवारी (दि.१८) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. मैनुद्दीन कलंदर शेख (वय ४५, रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड), असे मयताचे नाव … Read more

स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील करंडकाचे आयोजन

अहमदनगर: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित भौतिकोपचार महाविद्यालय अंतर्गत “राज्यस्तरीय स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील” करंडकाचे दि. २१ ते २३ मार्च २०२४ दरम्यान विळद घाट, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या करंडकात क्रीडा, निबंध, पोस्टर, सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून २०० पेक्षा जास्त स्पर्धक भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ … Read more

वो साल दूसरा था, ये साल दूसरा है !! गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात, पण यंदाच्या निवडणुकीसाठी सुजय विखे आणि संग्राम जगताप यांचा एकत्रित प्रचार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अखेरकार ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. पाच वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल पासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात पाच … Read more

अहमदनगरमध्ये आमदार राम शिंदे ठरणार किंगमेकर ! सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत होणार काटेदार ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची आणि नेत्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्ष आता आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. भारतीय जनता पक्षाने देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीतुन भाजपाने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. … Read more

Ahmednagar News : नगर शहरात ‘या’ कॉलेजच्या परिसरात बिबट्या ! नागरी वस्तीत भीती

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहर शासकीय तंत्रनिकेतन व भवानीनगर परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. भवानीनगर परिसरातील काही रहिवासी सोमवारी सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांमधील एका तरुणाला शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज) आवारात एक बिबट्या दिसला. या तरुणाने परिसरातील नागरिक व वन विभागाला ही … Read more

Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंचा माफीनामा, पाठोपाठ मंत्री राधाकृष्ण विखेंची आ. राम शिंदेंसोबत बंद दाराआड दीड तास चर्चा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच वेगाने फिरू लागले आहे. लोकसभेच्या अनुशंघाने खा. सुजय विखे यांना तिकीट मिळाले व चर्चा सुरु झाल्या त्यांना असणारा भाजपांतर्गत विरोध. यात आघाडीवर नाव होते आ. राम शिंदे यांचे. कारण त्यांनी तिकीट वाटपाच्या आधीपासूनच विखे यांना प्रखर विरोध केला होता. तसेच आ.निलेश लंके यांच्या स्टेजवर व त्यांच्यासोबाबत अनेकदा ते … Read more

Ahmednagar Crime : जबरदस्तीने गाडीवर बसवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून चालू गाडीवर तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना दि. १४ मार्च २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील आरोपी रमेश रामदास चव्हाण याने दि. १४ मार्च २०२४ रोजी सकाळी … Read more

Agriculture News : फळबागांचा पीक विमा रखडला ! दुष्काळ जाहीर मग मदत कधी?

Agriculture News

Agriculture News : राहाता तालुक्यातील फळबांगाचा पीक विमा तसेच खरीप पीक विम्याची उर्वरीत रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत चालू वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हिस्सा भरण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गेल्या खरीपात हवामान … Read more

Soybean Market : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत सोयाबीन घरातच ! सोयाबीनचा पेरा कमी होणार

Soybean Market

Soybean Market : सध्या सोयापेंडला चांगला दर मिळत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडून आहे. एकीकडे सोयाबीन तेलाला मागणी आहे. मात्र दुसरीकडे सोयापेंडला उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घटत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवर भर देतात. मागील दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्याप घरात पडून असल्याची माहिती येथील भुसार मालाचे … Read more