मालेगाव जिल्हा पुन्हा ऐरणीवर, अहमदनगरचे काय होणार?

Ahmednagar News:राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रलंबित धोरणात्मक विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच जिल्हा विभाजनाचा विषयही पुढे आला आहे. ३० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक, मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तेथे नाशिकचे विभाजन करून मालेगाव जिल्हा तयार करण्यचा विषय पुन्हा तापविण्यात आला आहे. माजी कृषी मंत्री आणि शिंदे गटात प्रवेश … Read more

आमदार रोहित पवारांचे हे स्वप्न आणखी लांबणीवर

Ahmednagar News:कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातलगत असलेला करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न आहेत. मात्र, आता ते आणखी लांबणीवर पडले आहे. राज्यात झालेल्या सत्तातंरानंतर घडलेल्या हालचालींमुळे यामध्ये आता कायदेशीर अडचणी उभ्या झाल्या आहेत.आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ला हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला मुंबईच्या डीआरएटी न्यायालयाने २२ … Read more

कुस्तीगीर परिषदेवर पवारांच्या जागी या भाजप खासदाराची वर्णी, अहमदनगरलाही मिळाली संधी

Ahmednagar News:एकएका संस्थेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरही ताबा मिळविता आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नुकतीच काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. त्या जागी आता भाजप खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उपाध्यक्षपदी अहमदनगरचे वैभव लांडगे यांची … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली !

Ahmednagar Mahanagarpalika :- अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली आहे. त्यानुसार पुढील महिनाभर घरपट्टीच्या थकबाकीवर लावण्यात येणारी शास्ती म्हणजेच दंडात्मक रक्कम शंभर टक्के माफ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे थकबाकी असेल, त्यांनी ताबतोब भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यासंबंधीची मागणी केली होती. नवे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी … Read more

भले शाब्बास पोरा…! नगरच्या शेतकरी पुत्रानं बापाच्या कष्टाची जाण ठेवली, आई-वडिलांच्या लग्न वाढदिवशी भेट दिली एमजी हेक्टर

Ahmednagar News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांची (Farmer) संख्या सर्वाधिक आहे. अल्पभूधारक शेतकरी शेतीत राब-राब राबून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करतात. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) कोपरगाव तालुक्याच्या एका अल्पभूधारक … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेचे अर्ज…

Ahmednagar News:प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेंतर्गंत जिल्हयातील शेतकऱ्यांना ३एचपी, ५एचपी व ७.५एचपी क्षमतचे सौर पंप अनुदानावर देण्याची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के व अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध होतील. सदर योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन … Read more

अहमदनगर मध्ये भर पावसात आदित्य ठाकरे यांचे भाषण ! म्हणाले गद्दारी का केली? हे

‘Ahmednagar News:आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच गद्दारी केली. त्यांना आपण काहीही कमी केले नव्हते. मात्र, त्यांच्यावर यासाठी काही दडपण असेल. आता त्यांना जेथे राहायचे असेल तेथे त्यांनी आनंदात रहावे. हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मुख्य म्हणजे आपण गद्दारी का केली? हे लोकांना पटवून द्यावे,’ असे आव्हान शिवसेनेचे युवा नेते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा आठवडे बाजार बंद ! अनावश्यक…

Ahmednagar News : आषाढी वदय कामिका एकादशी व नेवासा आठवडे बाजार‌ रविवार, २४ जूलै २०२२ रोजी आहे. आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेले वारकरी परतीच्या मार्गावर नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात. यामुळे अंदाजे ७ लाख भाविकांची गर्दी शहरात होत असते. म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी नेवासा खुर्द येथील आठवडे … Read more

अहमदनगरचा पाणी पुरवठा विस्कळीत, कोठे? किती दिवस?

Ahmednagar News : आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहीनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावा फुटली. त्यामुळे पुढील काळात पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. जलवाहीनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतलेले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्याला बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे … Read more

अहमदनगरच्या लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कारात डंका

Ahmednagar News: अहमदनगरमधील अनुष्का मोशन पिक्चर्स निर्मित ‘कुंकुमार्चन’ या लघुपटाला ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात स्थान मिळाले आहे. मराठी भाषेतील नॉन-फिचर फिल्म श्रेणीतील ‘कुंकुमार्चन’ला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळाला आहे. आज दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. ‘कुंकुमार्चन’ लघुपटासाठी नाट्य-सिनेमा लेखक अभिजीत दळवी यांचे दिग्दर्शन, कौस्तुभ केळकर यांची कथा आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक ! जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढते आहे. गेल्या चोविस तासांत तब्बल 129 रुग्ण जिल्हाभरात आढळले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

बंडखोरांचे काय करणार? जिल्हा प्रमुख गाडेंनी दिले उत्तर

Ahmednagar News:जिल्ह्यातील काही पदाधिकारी, नगरमधील नगरसेवक आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रमुख म्हणून काय कारवाई करणार? यासंबंधी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ज्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यासंबंधी काय निर्णय घ्यायचा … Read more

Shinde Government: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला ! अहमदनगर मधून विखे पाटील व राज्यातील तब्बल 30 जणांचा शपथविधी..

Shinde Government Time for cabinet expansion

Shinde Government :  राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 26 किंवा 27 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकते. यामध्ये तीस पेक्षा अधिक नेत्यांचा शपथविधी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना … Read more

भाऊ आणि मुलगा शिंदे गटात? शशिकांत गाडे यांचा खळबळजनक दावा

Ahmednagar News : ‘माझे बंधू रमाकांत गाडे यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. अन्नधान्य वितरण निविदा कामाच्या निमित्ताने रमाकांत व मुलगा नगरसेवक योगीराज गाडे मुंबईला गेले होते. तेथे त्यांना नगरसेवक अनिल शिंदे यांनी फसवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नेले व छायाचित्रासाठी उभे केले,’ असा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला आहे. नगरमधील आजीमाजी नगरसेवक … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 79 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

नगरची शिवसेना ठाकरेंसोबत, कोरगावकरांनी आरोप फेटाळले

Ahmednagar News:नगरमधील शिवसेनेचे काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असले तरी त्यांच्यासह सर्वजण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, असा दावा शिवसेनेचे नगरचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केला आहे. काही पदाधिकाऱ्यांनी कोरगावर यांच्यावरच पूर्वी आरोप केले होते. त्यांनी तेही फेटाळून लावले असून याचे पुरावे दिले तर स्वत: पद सोडून देईन, … Read more

सख्खा भाऊ पक्का वैरी, पहा हा भाऊ काय करायला निघालाय?

Ahmednagar News:भावकीचा वाद सर्वत्र असतो. दिवाणी न्यायालयात आणि पोलिसांकडेही येणाऱ्या बहुतांश तक्रारी या भावकीच्या आणि बांधाच्या वादाच्या असतात. जमीन विकून भावाला अद्दल घडविणारेही कमी नाहीत, तर खूपच वैताग झाला तर भावाचे खून केल्याच्या घटनाही घडतात. शेवगाव तालुक्यात अशाच एका वैतागलेल्या भावाने नामी युक्ती केली आहे. त्याने चक्क आपली जमीनच विकायला काढली असून तसे फलक शेतात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अक्षय कर्डीले यांच्या वाहनाचा भीषण अपघात !

मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा नगर – औरंगाबाद महामार्गावरील चेतना लॉन्स समोर भीषण अपघात झाला आहे. अक्षय कर्डिले यांच्या वाहन क्र. MH16 BY 999 या गाडीला स्कोडा गाडीने मागून धडक दिली अपघात हा इतका भीषण दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.