Ahmednagar News : कार दुभाजकावर आदळली; एक ठार

Ahmednagar News : कार रस्ता दुभाजकावर आदळून एकाचा मृत्यू झाला आहे. दिनेश प्रल्हादराव धोडरे (रा. बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. संजय शाहूराम धस (रा. क्रांतिनगर, तहसीलकार्यालयाजवळ, बीड) हे कार (एमएच 24 बी एल 1703) मधून बीडवरून पुण्याकडे जात होते. त्यांची कार चास शिवारात रस्ता दुभाजकावर … Read more

श्रीगोंदा येथे अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस ऑफिसचे सत्यजीत तांबे यांच्या हस्ते झाले उद्घाटन.

Ahmednagar News : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मा.अध्यक्ष सत्याजीत (दादा) तांबे पाटील, तालुका काँग्रेसचे नेते राजेंद्र (दादा) नागवडे,जिल्हा समन्वयक काँग्रेस कमिटी ज्ञानदेव वाफारे साहेब,विठ्ठलराव वाबळे व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर दादा पोटे यांच्या शुभहस्ते अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पाडले. यावेळी सत्यजीत तांबे यांनी बोलताना सांगितले की काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्व … Read more

जखमी अवस्थेत सापडलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू

Ahmednagar News : शहरातील टिळक रोड येथे आजारी अवस्थेत आढळून आलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.11 मे रोजी टिळक रोड येथे एक 50 वर्षीय पुरूष आजारी अवस्थेत आढळून आला होता. त्याला स्थानिकांनी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केेले. तेथे … Read more

‘एलसीबी’त नियुक्ती आता अवघड, आयजींचे नवे परिपत्रक

Maharashtra news : पोलिसांतील ‘मलाईदार’ शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळणे आता अवघड झाले आहे. यासाठी आता पूर्वीप्रमाणे वशिलेबाजी नव्हे तर गुणवत्तेवर अधारित परीक्षा द्यावी लागणार आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना यासंबंधीचा आदेश दिला आहे.नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, … Read more

Ahmednagar News | हायस्पीड रेल्वे : या तालुक्यातील तब्बल २६ गावे होणार बाधीत

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत पुणे, संगमनेर, नाशिक हा २३५ किलोमीटर लांबीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात पुणे नगर व नाशिक जिल्ह्यातील गावे बाधीत होणार असून, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील २६ गावे बाधीत होणर आहेत. या प्रकल्पासाठी या २६ गावातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि उद्योगाचे केंद्र … Read more

Ahmednagar News | अरे बापरे : कंटेनर आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कन्हेरवळ येथे कंटेनर आणि एका मालवाहतूक ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, नगरकडून दौंडकडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहतूक कंटेनर (क्र. एम.एच.०६ ए क्यू ८४२२) आणि दौंडकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणारी माल वाहतूक ट्रक (क्र. के ए.२८ … Read more

Ahmednagar News | काय सांगता : डोक्यात वार करून युवकाचा केला खून

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील खर्डा येथलि विशाल ईश्वर सुर्वे या युवकाचा अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी डोक्यात कसल्यातरी टणक वस्तुने जबर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्ररणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत फिर्यादी सुशेन सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल सुर्वे हा शुक्रवारी खर्डा येथील एका व्यापाऱ्याचा माल आणण्यासाठी … Read more

वैतागलेल्या पारधी कुटुंबाने घरावर बसविले सीसीटीव्ही कॅमेरे, कारण…

ब्रिटिश काळापासून पारधी समाजावर असलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसायला तयार नाही. पारधी कुटुंबातील शिकलेले तरूण आणि नव्या पिढीने वेगळे व्यवसाय सुरू केले तरीही त्यांच्यावर संशय कमी होत नाही. अशाच संशयापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी, जणू आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी बीड जिल्ह्यातील एका पारधी कुटुंबाने स्वत:च्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. कोणी पोलिस संशय घेऊन आले तर या … Read more

शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ ! बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला…

Ahmednagar Politics ; हनुमान चालीसा म्हणणार्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार्याच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ असल्याने ते कृती करू शकत नसल्याचा टोला आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधतांना आ. विखे पाटील म्हणाले की, एका बाजुला हिंदूत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदत्व गुंडाळून … Read more

अहमदनगर ब्रेकींग: गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरण; ‘त्या’ मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द

गर्भपाताच्या गोळ्या प्रकरणी श्रीराम एजन्सीचा परवाना आजपासून (शुक्रवार) रद्द करण्यात आला आहे. औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त हेमंत मेतकर यांनी याबाबत आदेश काढले आहे. 5 मे रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी दिल्या जाणार्‍या गोळ्यांची पाकिटे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी सावेडी येथील श्रीराम एजन्सीचे मालक नितीन जगन्नाथ बोठे, याच्यासह हरियाणा येथील … Read more

जिल्ह्यातील ‘ही’ सराईत टोळी २० महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

Ahmednagar News :- जिल्ह्यात टोळी करून संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या नवनाथ विजय पवार ( वय २१, रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर) व त्याच्या टोळीतील इतर चार सदस्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून २० महिन्याकरीता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख पवार याच्यासह टोळीसदस्य सुनील रामनाथ जाधव (वय २१, रा. मानुसवाडी, रणखांब, ता. संगमनेर), अजित … Read more

अहमदनगर लोक अदालतीमध्ये १७ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले….!

Ahmednagar News : विविध कारणांमुळे न्यायाप्रविष्ट असलेल्या तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयामध्ये १७७२० दाखलपूर्व व २६१३ प्रलंबित अशी एकूण २०३३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे १७ जोडप्यांचे विस्कटलेले संसार पुन्हा फुलविण्यात लोक न्यायालयाला यश आले आहे.अशी माहिती जिल्हा विधी सेवा … Read more

अल्पवयीन मुलीची छेड काढणे भोवले; न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या हर्षल दीपक काळभोर (वय 24 रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) याला भादंवि कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम 12 (पोक्सो) अन्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी हा निकाल दिला. … Read more

बनावट सोने घेऊन चौघे लुटण्यास निघाले; पोलिसांनी लगेच पकडले

Ahmednagar News :- बनावट सोने घेऊन स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. एक जण पसार झाला आहे. संजय हातण्या भोसले (वय 40 रा. वाघूंडे ता. पारनेर), कबीर उंबर्‍या काळे (वय 20), अक्षय उंबर्‍या काळे (वय 24 दोघे रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा) व सुरजकुमार ऊर्फ डब्ल्यूकुमार प्रभू ठाकूर (वय 25 … Read more

झेडपीच्या आरोग्य विभागात मोठी भरती, अशी आहेत पदे

Health Department Recruitment :- ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत … Read more

‘नमामि गंगे’साठी राहुरी कृषी विद्यापीठाचा करार

Ahmednagar News: केंद्र सरकारने गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामि गंगे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी तांत्रिक योगदान देण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी कानपूरच्या आयआयटी संस्थेसोबत सांमज्य करार होत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली. संपूर्ण देशातून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची यासाठी निवड झाली आहे. याच्या पूर्व तयासाठी … Read more

Ahmednagar ZP Election 2022 : अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत गट व गण वाढले ! तालुकानिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे …

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीचे १७० गण रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत १२ गट व २४ गण वाढले आहेत.जिल्हा परिषदेची मुदत २० मार्चला संपुष्टात आली व त्यावर सीईओ यांची प्रशासक म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यापूर्वी १४ मार्चला पंचायत समित्यांची मुदत … Read more

गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरण; ‘त्या’ मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द होणार?

Ahmednagar News: वैद्यकीय परवानगीशिवाय वापरण्यास बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडल्याप्रकरणी सावेडीतील मेडिकल एजन्सीचालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. पंकज कॉलनी, टीव्ही सेंटर, सावेडी) याच्यासह हरियाणातील औषध कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन बोठे याच्याकडे श्रीराम मेडिकल या नावे परवाना आहे. दरम्यान या मेडिकल एजन्सीचा पत्ताही बोगस निघाला असून, टीव्ही सेंटर येथील घरातूनच तो हा कारभार … Read more