जिल्ह्यातील ‘ही’ सराईत टोळी २० महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News :- जिल्ह्यात टोळी करून संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या नवनाथ विजय पवार ( वय २१, रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर) व त्याच्या टोळीतील इतर चार सदस्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून २० महिन्याकरीता हद्दपार केले आहे.

टोळी प्रमुख पवार याच्यासह टोळीसदस्य सुनील रामनाथ जाधव (वय २१, रा. मानुसवाडी, रणखांब, ता. संगमनेर), अजित रावसाहेब केदार ( वय २२, रा. रणखांब, ता. संगमनेर), रमेश अंबादास दुधवडे (वय १९, रा. खैरदरा, नांदुर, ता. संगमनेर), शिवाजी पोपट कातोरे ( रा. जांबूत बु, ता. संगमनेर) अशी हद्दपार आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी घारगाव, अकोले, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दित व परिसरात मालाविरुद्धचे व शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण केली होती.

या टोळीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपार कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांनी अधीक्षक पाटील यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावावर अधिक्षक पाटील यांनी मंजुरी दिली आहे.