संगमनेरमध्ये क्रिडा स्पर्धेत २५०० महिलांचा सहभाग, ६५ वर्षीय आजींनी केली फलंदाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून येथील एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तालुक्यातील २५०० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील वडगाव लांडगा येथील ६५ वर्षीय सुमन बाळासाहेब लांडगे यांनी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात सहभाग घेऊन या स्पर्धेचा आनंद घेतला. येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल … Read more

Ahmednagar News : तरुणाचा निर्घृण खून, बापानेच चाकूने वार करून संपवले, अहमदनगरमधील ‘या’ गावातील थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात अंगावर काटा आणणारा थरार घडला आहे. वडिलांनीच पोटच्या मुलावर चाकूने सपासप वार करत मुलाचा निर्घृण खून केला. केवळ शिवीगाळ करू नका असे म्हटल्याने वडिलांना राग आला व त्यांनी हे कृत्य केले. ही घटना नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. बापाने आपल्या पोटच्या मुलाचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील सागर शामराव रनमाळे यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी अर्थात सीइए पदावर निवड झाली आहे. बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे भाजी विक्रेते शामराव रनमाळे यांचा तो मुलगा आहे. सागर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले असून आपल्या आई-वडिलांचे अधिकारी होण्याबद्दलचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून विवाहित तरुणाची आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे, स्वतःच्या पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाने त्याची जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शहरातील संजयनगर परिसरात घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. संजय लक्ष्मण अल्हाट (राहणार संजयनगर, कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डंपरच्या धडकेत बैल ठार; तीन मजूर जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यु झाला असल्याची घटना दि. ८ रोजी पहाटेच्या वेळी घडली आहे. या घटनेत तीन ऊसतोड मजूर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहाता चितळी रोडलगत एकरुखे गावात कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात डंपरने पहाटेच्या वेळेस … Read more

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला आणि ठाकरेंसह काँग्रेसलाही फसवले त्यांना उमेदवारी मतदारसंघाचे दुर्दैव !

Shirdi Politics

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला फसवले, सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवले, काँग्रेसलाही फसवले, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली, तर ते मतदारसंघाचे दुर्दैव ठरेल. त्यांना जर उमेदवारी दिली, तर आपण त्यांचे विरोधात बंड करू असे म्हणत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी विरोध केला आहे. शिवसेनेचे … Read more

आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश ! पुणे – नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात होणार घट

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार सत्यजीत तांबेंच्या पुन्हा एकदा प्रयत्नांना यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी मिळाली आहे. २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान डोळासणे / बोटा (संगमनेर) व वावी (सिन्नर) येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली होती. आता … Read more

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप ! भाजप नेत्याचा पक्षास रामराम

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे नेवासा तालुक्यात सोनई भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य दत्तत्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदाचा त्याग करत भेंडा बुद्रुक येथे आमदार शंकरराव गडाख गटात जाहीर प्रवेश केला. नेवासे तालुक्यात भाजपची तोफ समजणाऱ्या काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजप … Read more

गावठी दारू भट्टीवर कारवाई,दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी पोलीस पथकाने तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रातील गावठी दारू भट्टीवर काल बुधवारी (दि.६) छापा टाकून दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली या टीमने अचानक छापा टाकून गावठी दारू बनविणारी भट्टी … Read more

‘त्यांनी’ ५० वर्षात काय विकास केला…?शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचा आमदार बबनराव पाचपुते यांना सवाल

आ.पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला. मात्र या ५० वर्षात त्यांनी काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होते. नव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन मतदान होणार नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. … Read more

आ. थोरातांच्या प्रयत्नातून पाच कोटींचा निधी ! कामाचे श्रेय कुणी घेवू नये…

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीबिरोबा महाराज देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय कुणी घेवू नये, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी … Read more

बाळासाहेब थोरातांची पुढची पिढी राजकारणात ! संगमनेर तालुका…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांची नुकतीच निवड करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत, महाराष्ट्राचे युवक काँग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून त्या मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील परिवारावरील आरोप किती खरे किती खोटे ? ‘त्यांनी’ स्पष्टच सांगितले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. मात्र काही लोकांना हे सहन होत नाही. वास्तविक ज्यांना स्वतःचा तालुका सांभाळता आला नाही, त्यांनी निधी देत नसल्याचा केलेला आरोप अत्यंत हस्यास्पद आहे, अशी टीका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय धनवटे यांनी केली आहे. या … Read more

राज्यमंत्री रामदास आठवले स्पष्टच बोलले ! मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर…

Ahmednagar News

Ahmednagar News : जागा वाटपावरुन जास्त ओढतान करून चालणार नाही. बीजेपी कोणाचा पक्ष संपवायला चाललाय, असे अजिबात नाही. संपवण्याचा प्रयत्न केला तरी पक्ष संपत नसतो. माझ्या पक्षाचे लोकं निवडून नसले आले तरी माझा पक्ष काही संपला नाही. मला शिर्डीमध्ये संधी मिळाली, तर या भागाचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा उपचाराअभावी झाला मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नेवासा मार्गालगत एका शेतात मंगळवारी सकाळी मृत बिबट्या आढळून आला. मात्र बिबट्या आजारी होता तसेच तो उपचाराविना मृत पावला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही उपचारात दिरंगाई झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. श्रीरामपूर-नेवासा मार्गालगत शेतकरी प्रशांत वाघ यांच्या शेताजवळ हा बिबट्या सापडला. माजी सरपंच सचिन पवार, दादासाहेब झिंज आदींनी वनविभाग, तलाठी … Read more

Ahmednagar Politics : स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा खा.कोल्हेंचे आ. लंकेंना साकडे !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजावी, अशी अपेक्षा करीत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आ. नीलेश लंके यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या शेवटच्या प्रयोगानंतर खा. कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मा. आ. राहुल जगताप, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब … Read more

Ahmednagar News : सोयाबीन दराचा निच्चांक, साधा हमीभावही मिळेना ! शेतकरी हवालदिल

Ahmednagar News

Ahmednagar News : सोयाबीन दराने यंदाची निच्चांकी पातळी गाठली आहे. नगरसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गत दोन महिन्यांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल अगदी चार हजार रुपये इतकाच दर मिळत आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ६०० रुपये आहे. आता त्याच्याही खाली हे दर पोहोचले आहेत. जवळपास मागील दोन महिन्यांपासून सोयाबीन दरात सुधारणा झाली नसून पीक विम्याचाही लाभ मिळत नसल्याने … Read more

नदीकाठचा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर ! शासकीय वाळू लिलाव बंद करण्यासाठी उपोषण…

Ahmednagar News

Ahmednagar News : दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असून बारमाही वाहणाऱ्या नद्या आता हंगामी झाल्या आहे. नदीकाठचा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळाचा धोका टाळण्यासाठी शासकीय वाळू लिलाव बंद करण्यासाठी गोदावरी संघर्ष व बचाव कृती समितीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी बचाव संघर्ष कृती समितीचे सुरेगाव, सांगवी भुसार, कोळगाव थडी … Read more