Ahmednagar Breaking : बाथरूमला जाते म्हणून बाहेर आली आणि तरुणासोबत बोलत बसली… संशयावरून काकाने कुऱ्हाडीने केला पुतणीचा खून !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात सप्तशृंगी माता मंदिराजवळ संशयावरून काकाने आपल्याच पुतणीचा कुन्हाडीने घाव घालून खून केला. बुधवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा संदीप कांबळे (वय २१) … Read more

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखे पाटलांची जोरदार तयारी ! लाखोंची गर्दी जमवणार..पहा ‘असे’ केलेय नियोजन

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २६ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. ते याआधी साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी शिर्डीत आले होते. साईबाबा दर्शन रांगेचे उदघाटन, निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणसह अनेक कार्यक्रम यावेळी मोदींच्या हस्ते होणार आहेत. आता या संधीचा राजकीय फायदा देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घ्यायचं ठरवलंय. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या ‘बाप’ कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील ‘बाप’ कंपनीला कोणत्याही शैक्षणिक संस्थेची अथवा विद्यापीठाची मान्यता नाही. कंपनी विद्यार्थ्यांना ३ वर्षानंतर संगणक पदवी व नोकरी देण्याचा दावा करते. नोकरीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा घालत असल्याची तक्रार या कंपनीतील व्यवस्थापनाचे काम पाहिलेले माजी कर्मचारी सुधीर ब्रह्मे यांनी पोलिसात केली. पालकांचा सात-बारा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : देवीच्या दर्शनाला गेलेल्या महिलांच्या दागिन्यांची चोरी

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नवरात्रोत्सवानिमित्त बुऱ्हाणनगर येथील देवी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अनेक महिलांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरल्याची घटना मंगळवारी (दि.१७) सकाळी ११.३० ते ११.४५ च्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे या देवी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी हातसफाई करत पोलिसांना आव्हान दिले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापुरला जाणाऱ्या पालखीचे आगमन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात तरुणीचे अपहरण ! ‘तु गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, नाहीतर तुझ्या दाजीला जीवे ठार मारील…

Ahmednagar News

Ahmednagar News : ‘तु गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, अन्यथा तुझ्या दाजीला जीवे ठार मारील,’ अशी धमकी देऊन राहुरी शहरातून एका कॉलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी घडली. याबाबत एका तरुणावर विनयभंगासह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील १६ वर्षे २ महिने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या मंदिरावर आता सौर ऊर्जा प्रकल्प !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील श्री वीरभद्र मंदिर सार्वजनिक देऊळ व उत्सव ट्रस्टला येणाऱ्या वाढत्या वीज बिलांच्या खर्चात कपात व बचत करण्यासाठी राहाता शहरातील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहेत. वीजबिल वाढत असल्याने ट्रस्टवर दिवसेंदिवस आर्थिक बार वाढत चालला होता. बिलांच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने ट्रस्टचे अध्यक्ष … Read more

Soyabean Crop : सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत ! शेतकरी आर्थिक अडचणीत

Soyabean Crop

Soyabean Crop : श्रीरामपूर तालुक्यात सध्या सोंगणी मळणीयंत्रा मार्फत सोयाबीन पिकांची करून सोयाबीन तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र यंदाही मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच सोयाबीन पिकाचे सध्याचे बाजारभावही कमी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालू वर्षी पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाळल्यामुळे अनेकांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काकाने पुतणीचा कुऱ्हाडीने वार करत केला निर्घृण खून

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. काकानेच आपल्या विवाहित पुतणीला कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करत ठार केले आहे. रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग काकाला आल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समजते. ही घटना कोपरगाव शहरातील खडकी भागात बुधवारी रात्री घडली. सौ. नेहा संदीप कांबळे (वय २१, हल्ली रा.सप्तशृंगी मंदीराजवळ … Read more

Ahmednagar Politics : आ. निलेश लंकेंनी केलं भाजप आ. राम शिंदेंचे सारथ्य ! शत्रूचा शत्रू ‘तो’ मित्र ? खा. सुजय विखेंपुढे मोठे आव्हान

Ahmednagar Politics :- अहमदनगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत सुरु असणारी धुसफूस, विखे पाटील घराण्याविरोधातील सूर हे एकीकडे सुरु असतानाच आता एक मोठी घडामोड घडली आहे. आ.निलेश लंके व आ. राम शिंदे हे एकत्रित भेटले आहेत. आमदार निलेश लंके हे महिलांना मोहटा देवीचे दर्शन करण्यास घेऊन जातात. काल (18 ऑक्टोबर) तेथे जात आ.राम शिंदे यांनी लंके यांची … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर मधील भाजप नेत्यांत मतभेद ? ह्या एका कारणामुळे विखेंच्या विरोधात नाराजी !

Ahmednagar Politics :- सध्या अहमदनगर भाजपमध्ये सगळंच काही आलबेल आहे असे वाटत असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. भाजपच्या मूळ नेत्यांत सध्या नाराजीचा सूर दिसत आहे. त्याचेही अनेक कारणे आहेत. विखेंच्या विरोधात नाराजीचा सूर का आहे? पंक्षांतर्गत धुसफूस विखेंना जड जाणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोठ्या नेत्यांचे उत्तरेला प्राधान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगरसेवकासह ४ जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : संगमनेर : शहरातील अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन मध्ये दिनांक ९ रोजी घडलेल्या हाणामारीप्रकरणात आपल्यासोबत उद्धट वर्तन करीत अश्लील हावभाव व शेरेबाजी झाल्याचा आरोप एका तरुणीने केल्याने माजी नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की सोमवार दि. ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील … Read more

थोरात कारखान्याकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद ! माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर निळवंडे धरणातून डाव्या – कालव्यात सोडण्यात आलेले पाणी विनाअडथळा व गळती न होता सुरू राहावे, यासाठी थोरात साखर कारखान्याकडून कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी उपाययोजना केल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे. मे महिन्यात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारने निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडून पहिली – चाचणी घेतली. तेव्हा काही ठिकाणी पाण्याची … Read more

PM Narendra Modi At Ahmednagar : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यात येणार !

PM Narendra Modi At Ahmednagar:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात विविध विकास कामांचे उदघाटन 26 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे … Read more

Ahmednagar Crime : शेतकऱ्याचा ऊस पेटवला ! ‘त्या’तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : वांगी बुद्रुक शिवारातील ऊस पेटवून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी शेतकरी कारभारी ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वांगी शिवारात शेती गट नंबर 35 मध्ये 4 एकर शेती आहे. सदरची शेती ही साठेखात करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद !पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : कोपरगाव शहरात गेल्या दोन तीन दिवसापासून दिमाखात दर्शन देणारा बिबट्याला अखेर मंगळवारी (१७) दुपारी पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर वनविभागाने बिबट्या मादीला पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याच्या वावरात दोनजण किरकोळ जखमी झाले होते. कोपरगावात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी जाळ्या व पिंजरा लावण्यात आला होता. परंतु, तो … Read more

अहमदनगर : मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद, महिलांच्या मदतीने करत होते मोठमोठ्या चोऱ्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून थोडा नव्हे तर 22 लाख 82 हजार रुपये किमतीच्या 30 मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत केलाय. महिला साथीदारांच्या मदतीने ही टोळी मोटार सायकल चोरायची. शिर्डीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायक चोरांनी धुमाकूळ घातला असल्याने पोलिसांनी त्या अनुशंघाने कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ व्यावसायिकाची आत्महत्या, शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगर मधील अकोले शहरातून एक मोठी बातमी आली आहे. राजेंद्र रघुनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या व्यापारी गाळ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. राजेंद्र सूर्यवंशी हे सुतारकाम व्यावसायिक होते. दरम्यान या प्रकरणी एका प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यवंशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली … Read more

Newasa News : पन्नास कोटी रुपयांचे बजेट असलेल्या नेवासा महामार्गाचे काम तातडीने सुरू करा

Newasa News

Newasa News : नेवासा फाटा ते नेवासा या महामागांचे बंद पडलेले काम तातडीने सुरू करावे, यासाठी नेवासा काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम विभागास रस्तारोकोसह जलसमाधी आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल पन्नास कोटी रुपयांचे बजेट असलेल्या नेवासा फाटा ते टाकळीभान या महामार्गाचे काम सुरू होवून जवळ जवळ एक वर्ष उलटून गेले. परंतु अद्यापही काम … Read more