कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने पिके जळाली

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कर्जत तालुक्यात आतापर्यंत कुकडीचे एकच आवर्तन आल्याने तालुक्यातील ऊस, कांदा, कलिंगड तसेच फळबागा व पालेभाज्या जळून गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कुकडीची तीन ते चार आवर्तने सुटायची. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नियोजन केले. मात्र पाण्याअभावी पिके जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कोलमडलेल्या कुकडी आवर्तनाच्या नियोजनामुळे कर्जत … Read more

तुम्हीही मधुमक्षिका पालन करता? मग होऊ शकता मालामाल, सरकाने सुरु केली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- आपल्या शेतकरी बांधवांची भरभराट व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. या दिशेने, सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. त्याचबरोबर गुरुवारी मधमाश्या पाळणाऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले. मधमाशी दिनानिमित्त, भारतीय कृषी संशोधन समिती, पुशा, नवी दिल्ली येथे भारतीय मधमाश्या … Read more

माहिती शेळी पालनाची : जाणून घ्या शेळीपालनाचे फायदे व प्रकार

शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी … Read more

आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विकासाची नवी दिशा दाखवली

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अकोले तालुक्यात उपजावू जमीन यामुळे आदिवासी शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीत असतात. परंतु गेल्या वर्षभरापासून तालुका कृषी विभागाने ‘आत्मा’च्या सहभागातून आदिवासी शेतकरी यांच्या साथीने विकासाची एक नवी दिशा दाखवली आहे. दुर्गम व आदिवासी भाग म्हणून परिचित असलेल्या अकोले तालुक्यात सध्या शेतकरी शेतीच्या साह्याने आपली आर्थिक प्रगती करत आहे. दरम्यान … Read more

नवीन नियमावली अंतर्गत कृषी विषयक दुकानांना सात तास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- महापालिका आयुक्त शंकरराव गोरे यांनी शहरातील किराणा दुकाने आणि भाजी विक्रेते यांना निर्बंध घातले होते. ते पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. 15 मे पर्यंत हे आदेश होते. त्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सुधारित आदेश काढण्यात आला. महापालिकेने शहरातील निर्बंध काहीसे शिथील केले असून, किराणा दुकाने सकाळी अकरापर्यंत … Read more

राहाता बाजार समिती ठरतेय शेतकरी हिताची; फळांची मोठी आवक सुरु

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शेतात पिकवलेला माल विक्रीस अडचण येत असल्याने बळीराजा हतबल झाला होता. मात्र करोनाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील इतर बाजार समित्या बंद असताना राहाता बाजार समिती शेतकरी हितासाठी करोना नियमांचे काटेकोर पालन करत सुरु आहे. यामुळे हि बाजार समिती शेतकऱ्यांसाठी हिताची ठरते असल्याचे चित्र दिसून येत आहे. … Read more

राहाता बाजार समितीत कांद्यासह फळांची आवक वाढली

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-करोना संसर्गाची परिस्थिती भयंकर असतानाही केवळ शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून राहाता बाजार समितीचे मार्गदर्शक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सूचनेनुसार राहाता बाजार समितीमधील सर्व प्रकारच्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार दररोज चालू आहेत. नुकतेच राहाता बाजार समितीत 12 हजार 28 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार … Read more

बाजार समितीत कांदा लिलाव पूर्ववत ! पहिल्या दिवशी कांद्याला मिळाला ‘इतका’ भाव

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- तब्बल पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे बंद असलेले लासलगाव बाजार समितीत कांदा आणि धान्य लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. लिलाव सुरू झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. १५ दिवसानंतर सुरू झालेल्या … Read more

१७ हजार शेतकरी झाले थकबाकीमुक्त !

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली आहे. श्रीरामपूर विभागातील १७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत २१ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा करून ते थकबाकीमुक्त झाले. या भरलेल्या वीज बिलाच्या रकमेतून या ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी रोहित्राची क्षमता वाढ करण्यात येत … Read more

तुळशीची शेती: १५००० रुपयांपासून सुरु केल्यास होईल 3 लाख रुपयांची कमाई

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नोकरी व्यतिरिक्त आपण व्यवसाय करू शकता अशा बर्‍याच व्यवसाय कल्पना आहेत. यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण घरी बसून पैसे कमावू शकता. तुळशीची लागवड करुन मोठ्या प्रमाणात पैसे कमवा :- आज आम्ही आपल्याला शेतीद्वारे पैसे … Read more

कवडीमोल दर मिळाल्याने ‘टरबुज’ फेकले रस्त्यावर!

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सध्या प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून शेती व्यवसायास आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूजासह भाजीपाल्याची लागवड केली होती. निसर्गानेही भरभरून दिल्याने पीकही चांगले आले. परंतु ऐन टरबूज काढणीला आले अन् माशी शिंकली, पुन्हा कोरोनाने थैमान घातले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर … Read more

सुखदवार्ता : नगरमध्ये फळांना मिळतोय उच्चांकी दर!

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फळांचा चांगले दर मिळत आहेत. मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने बाजारात फळांची आवक काहीशी मंदावली आहे. परिणामी आवक कमी होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळेच फळांव भाव वधारले आहेत. सध्या डाळिंब १६०००, संत्रा १०,००० सफरचंद १२०००, मोसंबी ७५०० या फळांना उचांकी दर मिळत आहेत. आज … Read more

माजीमंत्री कर्डीले म्हणाले….राज्य सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे-घेणे नाही

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-राज्यात सध्या वीजबिलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपत आहे. वीजबिल माफीसाठी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. मात्र वीजबिले माफ होणार नाही अशी ठाम भूमिका सरकारने घेतली आहे. यातच माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी या प्रश्नावरून सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले कि, वीजपुरवठा व रोहित्र बंद करण्याचे … Read more

कांदा, लसूण, बटाटा घसरला वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव !

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- सध्या राज्यातील बदलते वातावरण, वादळी वारे, अवकाळी पावसाने लावलेली हजेरी यामुळे भाजीपाला आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. भाजीपाला दरातील वाढ अद्यापही कायम आहे. परंतु स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या असलेल्या कांदा, लसूण आणि बटाटा, शेवग्याच्या दारांत आवक वाढल्याने घसरण झाली आहे. मटारच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. सोमवारी अहमदनगर … Read more

उन्हाचा कडाका वाढताच भाजीपाला महागला वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. उन वाढताच भाजीपाल्याचे दर देखील काहीअंशी वधारले आहेत. भाजीपाला वधारल्याने पालेभाज्या उत्पादकांना दोन पैसे मिळत आहेत. सध्या एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र कांद्याचे दर सपाटून पडत आहेत. मागील महिन्यात ३० ते ३५ रूपये किलो या दराने विकला जाणारा कांदा आत अवघा … Read more

हार्वेस्टरने ग्रामीण भागात निर्माण केला रोजगार

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र, आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. दरम्यान गहू सोंगणीसाठी लागणारे हार्वेस्टर हरियाणा आणि पंजाब या … Read more

अर्बन बँक बोगस कर्ज प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-बोगस कर्ज प्रकरणे करून नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, शनिवारी पहाटे नगर शहरात ही कारवाई केली. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. सध्या … Read more

शेतकरी संकटात : पुन्हा एकदा उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता….

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- खरीपाची पिके ऐन बहरात असताना जानेवारीत झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच सलग तीन चार दिवस पडलेल्या धुक्यामुळे हरबरा व गव्हाच्या पिकासह कांद्याच्या पिकांना फटका बसला. त्यातच पिके शेवटच्या पाण्यावर असताना महावितरणने थकीत विज बील वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला यामुळे शेवटचे पाणी न मिळाल्याने पिकांना त्याचा फटका बसला आहे. यामुळे यंदाच्या … Read more