‘त्या’ दुकानादारांनी केली महापालिकेकडे तक्रार!

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- दिल्ली गेट ते सिद्धिबाग दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले, परंतु सदरचा रस्ता हा उंच झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे काम झाले नसल्यामुळे पावसाचेपाणी दुकानात शिरते. त्यामुळे दुकानदारांच्या वस्तू खराब होऊन दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. अजून पावसाचे दिवस सुरू झाले नाही परंतु एका पावसामुळेच दुकानदारांचे खूप … Read more

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ही मागणी…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिशानिर्देश जारी केलेले आहेत . अहमदनगर जिल्ह्यातील  कृषी सेवा केंद्र आस्थापनांना अत्यावश्यक सेवेमध्ये  समाविष्ट करून वेळ सकाळी सात ते अकरा या वेळेत सेवा पुरविण्यास सांगितली गेली आहे . मात्र खरीपातील पेरणीची लगबग लक्षात घेता ही वेळ अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांची … Read more

मोठी बातमी ! सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये … Read more

आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा; महसूलमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंदच आहे. दरम्यान जिल्ह्यातील आडते बाजार, डाळ मंडई तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी यासाठी काँग्रेसने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे … Read more

सोने- चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- देशात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम ४९,००० रुपयांच्या जवळ पोहोचले. त्याचबरोबर चांदीची किंमत देखील आज प्रचंड वाढली आहे. सोन्याचा दर ३८० रुपयांनी वाढला तर चांदी तब्बल १२०० रुपयांची महागली आहे. त्यामुळे सोन्यापेक्षा आता चांदीला अच्छे दिन … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला खाकीने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असणा-या आरोपीसह वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून लुटमार करणारे आरोपी गजाआड केले आहे. सुरेश रणजित निकम, सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव या तिघांना पकडण्यात आले आहे. यापूर्वीच विकास बाळू हनवत, करण नवनाथ शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना … Read more

कारवाईअंतर्गत जप्त केलेला ट्रक तहसीलच्या आवारातून गेला आणि परत आला

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यातील वाढती वाळू तस्करी पाहता प्रशासनाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा वाळू तस्कराचे पकडलेले वाहन तस्कर सरकारिया कार्यालयाच्या आवारातून लंपास करतात. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. श्रीगोंदा मध्ये अधिकार्‍यांनी पकडलेला वाळूचा ट्रक श्रीगोंदा तहसील आवारातून गायब झाला होता. दरम्यान असे घडल्या नंतर तर चर्चेला उधाण … Read more

आज १९६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ११५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही – आरोग्य विभागाचा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- pमहाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे … Read more

अबब ! गंजीत लपवून ठेवला दहा पोते गांजा

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- एका कडब्याच्या गंजीत लपवून ठेवलेले तब्बल गांजाची दहा पोती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जप्त केली. या गांजाची किंमत जवळपास सव्वा कोटी रुपये आहे . या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे कि , कळंब तालुक्यातील मस्सा शिवारात कडब्याच्या गंजीत विक्रीसाठी … Read more

डॉक्टरसह कर्मचाऱ्यास मारहाण ; पोलीस नाईकासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- तुम्ही आमचे फोन का उचलत नाही? असे म्हणत डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्याला एका पोलीस नाईकासह त्याच्या भावाने शिवीगाळ केली.तसेच मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात सुरक्षा अधिकाऱ्यालाही मारहाण केली. ही घटना पुण्यातील बाणेर येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड आणि त्याचा भाऊ सागर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आत्महत्या सत्र सुरुच; लॅाकडाऊन मुळे…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील युवक रवींद्र बबन गरुड ,वय -सत्तावीस वर्ष याने काल त्याच्या राहत्या घरावरील पत्र्याच्या रॅाडला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रवींद्र याने लॅाकडाऊन मुळे कामधंदा नसल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. रवींद्र यांच्या पश्चात आई,एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. … Read more

पोलिसांवर दगडफेक करणारा आरोपी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वळण येथे दारू अड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करणा-या आरोपीला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातुन जेरबंद केल आहे. जगन्नाथ जाधव,राहणार प्रिंप्री वळण असे आरोपीचे नाव असुन त्यास ३ जुन पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे. राहुरी तालुक्यामधे दारू विरोधी कारवाया करण्यासंदर्भात पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी मोहीम सुरू … Read more

निमगाव वाघात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पध्दतीने घरातच साजरी करण्यात आली. दरवर्षी संस्थेच्या वतीने जयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जयंती … Read more

आठवड्यातूनच एकच दिवस अल्प प्रमाणात लस उपलब्ध अनेक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आनखी एक कोरोना लसीकरण केंद्र व लसीचा कोटा वाढवून देण्याची मागणी एकता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी व नगर तालुका आरोग्य अधिकारी यांना फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांनी दिले. यावेळी उपाध्यक्ष रामदास पवार, सचिव अरुण अंधारे, रितेश डोंगरे … Read more

‘या’ व्यवसायावर झालेत लॉकडाऊनचे दूरगामी परिणाम ..!

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- दर दहा दिवसाला मिळणारे दुधाचे पेमेंट तसेच इतर वेळेत शेतीची कामे करता येतात, आदी कारणांमुळे दुधाच्या व्यवसायातून अनेकांना स्थैर्य प्राप्त झाले आहे. शेतीचे कोणतेही पीक घेतले तर त्याचे लगेच पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचा आठवडा बाजार, तसेच इतर दैनंदिन खर्च भागविणारा हा दूध धंदा आहे. हा विचार करून … Read more

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या राजवटीत देश देशोधडीला लागला

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- मोदी सरकारला नुकतेच सात वर्ष पूर्ण झाले. ही सात वर्षांची राजवट देशातील सर्वात काळी राजवट असून या कालखंडामध्ये देश आणि देशातील नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे आ. लहू कानडे यांनी केला आहे. मोदी सरकारचा सात वर्षातील काळया राजवटीच्या निषेधार्थ काँग्रेस विधिमंडळ … Read more

‘त्या’ घरात २० दिवसात कोरोनाने घेतला तब्बल ८ जणांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- आता कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. मात्र या लाटेने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. तर अनेकांच्या डोक्यावरील आई अथवा बाबा नावाचे छत्र हरपले आहे. तर काहींचा आधारच गेला आहे. कधी नव्हे तेवढे या लाटेने अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून टाकले आहे. एका कुटुंबावर तर त्याच कुटुंबातील पाच सदस्यांचा … Read more