राहताकरांना रुग्णवाढीत राहत… सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेच्या आत

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाटेस प्रारंभ झाला. आणि बघता बघता कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा प्रभावहा अधिक प्रमाणावर दिसून आला. यामध्ये राहाता मध्ये तर कोरोनाचा खर्च झालेला पाहायला मिळाला होता. मात्र ता परिस्थिती हळूहळू सुधारते आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 73 … Read more

भंडारदरा धरण यंदा लवकर ओव्हरफ्लो होणार !

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे अल्पवधीतच धरणे, तलाव, बंधारे हे ओव्हरफ्लो झाले होते. यातच यंदाच्या वर्षी पर्जन्यमान चांगले असणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी … Read more

बाप रे, नगर जिल्ह्यातील 18 हजार मुलांना कोरोना…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  नगर जिल्ह्यात बाधितांमध्ये व लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. मागील तीन महिन्यांत १८ हजार बालकांना कोरोना झाला, तर मे महिन्यात ०ते १८ वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यस्तरीय … Read more

सर्वांना लस मिळू दे, देवाकडे प्रार्थना करूया…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  कोर्टात पूर्वीसारखे सर्वांच्या उपस्थितीत सुनावणी होऊ शकेल. ऑगस्टपर्यंत शरिरीक उपस्थितीत सुनावणी सुरू व्हावी, यासाठी देवाला प्रार्थना करूया. सर्वांना लस मिळावी, अशी प्रार्थना करूया. यामुळे आपल्याला सर्वांच्या उपस्थितीत सुनावणी करता येईल, असं न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले. देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने लसीकरणावर भर दिला जात आहे. सर्वांना … Read more

करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी सरकार उचलणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट हि अतिशय भयंकर पद्धतीने फैलावत गेली. या लाटेत अनेक कुटुंबची कुतंबे उद्धवस्त झाली. मुलांवरील आई – वडिलांचे छत्र हरपले. मुले निराधार झाली. या संकटाने त्यांचे होत्याचे नव्हते करून टाकले. मात्र अशा निराधारांच्या मदतीसाठी टास्क फोर्स पुढे आले आहे. जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत पालकांचा मृत्यू झालेल्या … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या खुल्या होणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील किराणा दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी किरकोळ विक्रीच्या किराणा दुकानांसह ठोक विक्रेत्यासोबत जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्यांना सोमवार ते शनिवारी यादरम्यान सकाळी 7 ते 11 या कालावधीत विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more

कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठीचे दर जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- राज्यात कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्नांना रुग्णालयांमध्ये योग्य दरात उपचार मिळावे यासाठी शासन प्रयत्न करत आहे. यातच करोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी अवाच्या सव्वा दर आकारणार्‍या खासगी रुग्णालयांना राज्य सरकारने वेसण घातली आहे. याबाबतच्या अधिसूचनेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली … Read more

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला हा उपाय

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात वेगवेगळी आंदोलन करणार्‍या सर्व संघटनांना एका व्यासपीठावर येऊन सरकारवर दबाव आणावा असे आवाहान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. दरम्यान या आवाहनाला आवाहनाला प्रतिसाद म्हणून मंगळवारी लोणी येथे मराठा समाजातील बहुतांशी संघटनांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आला. … Read more

जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र आयसीयू उभारला जाणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोनाची दुसऱ्या लाटेचा महाप्रकोप पाहाता जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या तिसर्या लाटेच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट हि लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरणार असल्याने याबाबत प्रतिबंधामतक उपाययोजना सुरु करण्याच्या दृष्टीने प्रशासन पाऊले टाकत आहे. नुकतेच जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यांत करोना बाधित आढळून आलेल्या … Read more

त्या लाचखोर तलाठ्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (वय-३२) यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यास पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय ?:-  जाणून घ्या कोपरगाव येथील एका बत्तीस वर्षीय इसमाकडून त्याचे वाळूचोरीत सापडलेले वाहन सोडण्यासाठी … Read more

बारावी परीक्षांच्या पाठोपाठ आता ‘या’ परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता सीआयएससीई (CISCE) नेसुद्धा 12 बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. देशातील सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्याता आला. या निर्णयानंतर आता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या … Read more

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले बाजारपेठा सुरू करण्याबाबत लवकरच….

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व *संबंधित … Read more

लॅाकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्याने हताश झालेल्या तरुणाने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. रवींद्र बबन गरुड (वय -27 वर्ष) असे मयत तरुणाचे नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर व तालुक्यात लॅाक डाऊनमुळे काम धंदा गेल्याने हताश झालेल्या रवींद्र ने गळफास घेत आपली … Read more

तलवार बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील जुने मटण मार्केट,बाजार तळ येथील एकास विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसानी ताब्यात घेतले आहे. तंजील गफार खान, (वय 23 वर्षे, रा.हुसेन नगर, श्रीरामपूर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई पंकज गोसावी यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात … Read more

मद्यप्रेमींचा खोळंबा होऊ नये म्हणून देशातील ‘या’ राज्यात घरपोहच मद्यविक्री सेवा सुरु

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान तळीरामांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने देखील थोडी तसदी घेतली आहे. यामुळे अनेक वेबसाईट किंवा ऍप ग्राहकांना घरपोच दारू उपलब्ध करून देत आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षात दारूच्या विक्रीतून देशातील सर्व राज्यांनी मिळवलेला एकूण महसूल जवळपास … Read more

आमदार लंकेच्या नोटीसला मनसेचे प्रत्युत्तर, बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, …

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. अविनाश फवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान लंके यांच्या नोटीसला आता मनसेने देखील उत्तर दिलं आहे. निलेश लंकेंच्या ४ पानांच्या नोटीशीला मनसेने १० … Read more

गोट्या खेळू नका म्हटले ; तिघांना दगडाने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षांपासून बहुतेक शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्याने सर्व मुले घरीच आहेत. त्यामुळे आज अनेक मुले घोळक्याने विविध खेळ खेळतात परिणामी दिवसभर गोंधळ सुरु असतो. असा गोंधळ घालणाऱ्या मुलांना अनेकदा घरातील किंवा आजूबाजूचे नागरिक गोंधळ न करण्याबाबत सांगत … Read more

बिले रखडल्याने ठेकेदार सापडले आर्थिक अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली महानगरपालिकेतील ठेकेदारांचे 50 हजार आतील रक्कमेचे देयके देण्याची मागणी ठेकेदार संघटनेच्यावतीने करण्यात होती. या बाबीकडे कोणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याने 25 जानेवारीला महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय गेट जवळ उपोषणाला ठेकेदार संघटनेच्या वतीने बसले होते जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे महापालिकेचे प्रभारीआयुक्त पद असल्याने त्यांनी आश्वासन दिल्यानंतर … Read more