अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून काय असेल सुरु आणि बंद ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  नगर शहर व जिल्ह्यातील कोविड निर्बंध कायम ठेवण्यात आले असून, बाजारपेठा,आठवडे बाजार, धार्मिक स्थळे व विवाहांना बंदी असणार आहे. मात्र, दूधसंकलन, वाहतूक व प्रक्रियेवरील निर्बंध हटवण्यात आले असून, दूध विक्री, भाजीपाला-फळे,किराणा, मांस विक्रीला सकाळी 7 ते 11 या दरम्यान परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी … Read more

आमदार लंके यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली कि खंडणीसाठीचं पत्र?

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली मात्र निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. अब्रुनुकसानीची १ कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा … Read more

घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा !

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुक्यातील नेते घनश्याम शेलार यांची कुकडीच्या सल्लागार समितीवरून हकालपट्टी करावी अशी मागणी कुंभेफळ ग्रामपंचायतीचे सरपंच काकासाहेब धांडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कुकडी लाभक्षेत्रातील गावात वाडी वस्तीवर शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. कर्जत तालुक्यातील कुकडीचे विविध प्रश्न सल्लागार समितीत मांडण्यासाठी व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय … Read more

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘जनाची नाही तर मनाची’ तरी बाळगावी..!

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- जळालेली रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक ताबडतोब थांबवा. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून सद्य परिस्थितीचा विचार करून योग्य ती पाऊले उचलावीत. अन्यथा नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत महावितरण कार्यालयात तीव्र आंदोलन करू. असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता कोपणर यांना दिला. कोकाटे म्हणाले की, … Read more

निसर्गाचा कहर..! वादळाने पत्रे उडून भिंतीला गेले ‘तडे’..!

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- दोन दिवसापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र त्याच बरोबर या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वादळी वा-यामुळे कन्या विद्यालयाच्या स्वयंपाकगृह व धान्य कोठीचे ४५ पत्रे उडून पडल्याने ते पुर्णपणे खराब झाले आहेत. … Read more

वर्ल्ड रेकॉर्ड ! या जिल्ह्यात एका दिवसात तयार केला 40 किलोमीटरचा रस्ता

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोणतेही सरकारी काम असो ते लगेच होणार नाही अशी भावनांचा सर्वसामान्यांच्या मनात झालेली असते. त्यातच विकासकामे म्हंटली तर त्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागतात हा आजवरचा इतिहास आहे. मात्र साताऱ्यात एक कौतुकास्पद गोष्ट घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता … Read more

राज्यात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै या कालावधी पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जून व जुलै महिन्यात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनासाठी पोषक … Read more

राज्यात येत्या 3 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- येत्या तीन दिवसांत राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानंतर स्कायमेट वेदरने मान्सून केरळात … Read more

सोन्याच्या भावात तेजी तर चांदीत घसरण; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटात सोन्या – चांदीच्या दरामध्ये चढउतार झालेला पाहायला मिळाला. आज भारतात 31 मे 2021 रोजी सोने दरात तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा भाव 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. आज चांदीचा दर काहीसा कमी झाला आहे. पहिल्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी, दिल्ली … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सलून ची दुकाने खुली करण्यात आली

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच राज्यातील लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध पुढील 15 दिवसांसाठी वाढवण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे . गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली सलूनची दुकाने नाशिक मध्ये खुली करण्यात आली आहे. … Read more

मराठा आरक्षणा संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापायला सुरुवात झाले आहे. यातच नेतेमंडळींकडून या प्रश्नी गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. मात्र अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला पक्षीय … Read more

शेतीच्या वादातून 80 वर्षाच्या वृद्धेला बेदम मारहाण; माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- ऊस तोडू नका म्हटल्याचा राग येवून झालेल्या हाणामार्‍यात एक वृद्ध शेतकरी महिला जखमी झाली. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे घडला. याप्रकरणी खोकर येथील माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोकर गावालगत असलेल्या शेतीवरून दत्तात्रय कचरे कुटंबियांचे किशोर काळे यांचसोबत न्यायालयीन वाद … Read more

कोपरगावचा लाचखोर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाच मागून ती स्वीकारणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील तालाठ्यालानाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सुशीलराजेंद्र शुक्ला (वय 33 वर्षे), असे त्या लाचखोर तालाठ्याचे नाव आहे. विशेषबाब म्हणजे या पूर्वीही कोपरगाव तालुक्यात तीन तलाठी या विभागाने गतवर्षी जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

जिल्ह्यातील या भागामध्ये आढळून आले बिबट्याचे बछडे

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याचा वावर व त्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्याच्या ऐकण्यात नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा त्याने आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील येवले वस्तीवर एका ऊसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे शेतकरी तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले … Read more

पोलिसांनी केवळ 90 दिवसांमध्ये वसूल केला तब्बल 04 कोटींचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यातच जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये पोलीस दलाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी 1 लाख 48 हजार 860 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली असून आतापर्यंत चार कोटी … Read more

शिर्डीच्या साई मंदिरालाही कोरोनाचा आर्थिक फटका

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली होती. यामुळे या बंदचा मोठा फटका मंदिरांना बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साई मंदिराला एका वर्षात तब्बल 286 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 1 … Read more

शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी साकारली ऐतिहासिक ‘ मुलुख मैदान तोफेची’ प्रतिकृती

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- अहमदनगर शहराच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील युवा कलाकार शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी सुमारे 500 वर्षांपूर्वी अहमद निजाम शाह च्या काळात रुमीखान दख्खनी यांनी तयार केलेल्या मुलख मैदानी तोफेची प्रतिकृती तयार केली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सर्व बाजूंचे फोटो लांबी-रुंदी -उंची हे सर्व स्वागत अहमदनगर परिवारातील ठाकूरदास परदेशी व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त 912 रुग्ण आढळले आहेत,अलीकडील काळात ही सर्वात कमी अशी रुग्णवाढ आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्ण संख्या हजारच्या खाली आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर -137 अकोले – 57 राहुरी – 40 श्रीरामपूर -70 नगर शहर मनपा … Read more