जिल्हा बँक निवडणूक : माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचा मोठा गौप्यस्फोट !.

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीस भाजपचे नेते व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व विवेक कोल्हे असे चौघेजण उपस्थित होते. बँकेच्या राजकारणात पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सहमतीचा विचार करण्याचे त्यांचे यावेळी ठरल्याचे सांगितले जाते. या वृत्ताला माजी आमदार कर्डिले … Read more

अहमदनगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे पुन्हा होणार भूमिपूजन,भाजपचे हे मोठे मंत्री येणार !

pune news

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने हा पुल आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या १५ ते ३० फेब्रुवारी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले. यावेळी त्यांची व्हीआरडीई संस्थेला भेट तसेच केके रेंज बाधित … Read more

मोदी सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना देणार ‘हा’ फायदा; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व केसीसी स्कीम लिंक केल्यानंतर देशातील दीड कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत. त्यांच्या खर्चाची मर्यादा 1.35 लाख कोटी रुपये आहे. 24 फेब्रुवारी 2020 पासून किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना केसीसी देण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात होती. मोदी सरकारने दोन लाख कोटी … Read more

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांना ‘काळे झेंडे’ दाखविले

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- नगर शहरातील वाढते अतिक्रमण, खड्डे, नादुरुस्त रस्ते, जड वाहतूक अशा विविध नागरी समस्यांमुळे नगरकरांचे मोठे हाल होते आहे. मात्र या प्रश्नांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिव राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज … Read more

संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचा मोदी सरकारचा डाव देशवासीय हाणून पाडतील

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- सबंध भारतात प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडत असताना दिल्लीमध्ये शेतकरी बांधवांनी आंदोलनाला आज तीव्र स्वरूप दिले. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचा मोदी सरकारचा डाव देशातील शेतकरी आणि देशवासीय एकजुटीने हाणून पाडतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा … Read more

संजय राऊत झाले आक्रमक म्हणाले कोणाचा राजीनामा मागणार,पवारांचा की ज्यो बायडनचा?’

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचा निशाणा साधला आहे. दिल्लीत ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन पेटले त्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचंही दिसून आलं होतं. तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत … Read more

शेतकरी आंदोलनला हिंसक वळण लागलं, त्याला केंद्र सरकार जबाबदार

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या … Read more

शरद पवार यांनी केंद्र सरकारला केल हे आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे शरद पवार यांनी … Read more

‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍था आणि बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्र यांनी शेतक-यांसाठी विकसीत केलेल्‍या ‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण प्रजासत्‍ताक दिनाच्‍या पार्श्‍वभुमीवर भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते प्रजासत्‍ताक दिनी करण्‍यात आले. माहीती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून स्‍मार्ट शेतकरी तयार करण्‍याच्‍या उद्देशाने … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-संविधानाचे सामुहीक वाचन करुन, लोणी ग्रामस्‍थांनी भारताचा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा केला. माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. प्रवरा उद्योग समुहातील विविध संस्‍थामध्‍येही प्रजासत्‍ताक दिन संपन्‍न झाला. करोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर यंदाचा प्रजासत्‍ताक दिन साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला. शाळा, महाविद्यालये सुरु झाले नसल्‍याने दरवर्षी होणारी परेड, … Read more

अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-  नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. २२ कोटीच्या या कर्जवाटपाबाबतचा तो बहुप्रतीक्षेत असलेला गुन्हा अखेर पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे दाखल झाला आहे. यात संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला … Read more

गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी प्रत्येक गावकऱ्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास साधावा. निवडणुका संपल्या की पक्षीय मतभेद बाजूला ठेवावे. डॉ.बबन डोंगरे यांच्यावर नवनागापूरमधील ग्रामस्थांनी विश्वास ठेवून सत्ता दिली. ते सत्तेच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देतील. नवनागापूर भाग हा शहराच्या जवळील … Read more

राज्यात अहमदनगर जिल्हा अव्वल राहील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-जिल्हा विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन अहमदनगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल राहील, ग्रामविकास आणि शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने … Read more

कर्जत तालुक्यातील कोंभळीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात मतदानप्रक्रिया पार पडली तसेच निकाल देखील घोषित झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी दिगज्जनी नेतृत्वाची कमान स्वीकारण्यास हालचाली सुरु केल्या आहेत. नुकतेच कर्जत तालुक्यातील कोंभळी ग्रामपंचायतीवर माजी सरपंच दीपक गांगर्डे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास पॅनलने एक हाती सत्ता घेऊन वर्चस्व मिळविले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोंभळी ग्रामपंचायतीमध्ये माजी … Read more

जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या  दिवशी इतके अर्ज दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु झाली आहे. अखेरच्या मुदती पर्यंत एकूण ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.  काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या  दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तब्बल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. काल उमेदवारी दाखल करणारात मंत्री … Read more

आगामी वर्षांसाठी जिल्ह्याचा ५७१ कोटींचा आराखडा मंजूर 

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- सन२०२०-२१ साठीच्या सुरु असलेल्या वर्षात राज्य सरकारकडून जिल्ह्यासाठी ६७० कोटी ३६ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून निधीच्या १०० टक्के खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तरतूद करण्यात आलेला निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घ्या, असे स्पष्ट निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय … Read more

पालकमंत्री म्हणाले अण्णा हजारेंच्या आंदोलनास राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-कृषी कायदे रद्द व्हावेत तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेती मालाला दुप्पट भाव मिळावा यामागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कोणी चांगलं करत असेल किंवा आंदोलन करत असेल त्यांना आमचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. केंद्र … Read more

जिल्हा बँकेसाठी हे दोन नेते बिनविरोध !

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदाच्या जागासाठी येत्या २० फेब्रुवारीला मतदान होत आहे.दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवट दिवस होता. बँकेच्या सोसायटी मतदारसंघ, शेतीपूरक, बिगरशेती, महिला राखीव दोन राखीव जांगासाठी 312 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूकीत उमेदवारी दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी शेवगाव तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील उमेदवार चंद्रशेखर घुले आणि … Read more