संजय राऊत झाले आक्रमक म्हणाले कोणाचा राजीनामा मागणार,पवारांचा की ज्यो बायडनचा?’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचा निशाणा साधला आहे.

दिल्लीत ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन पेटले त्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचंही दिसून आलं होतं.

तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या.

कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी. ममता बॅनर्जी. उद्धव ठाकरे. शरद पवार की ज्यो बायडनचा? इस बात पर त्यागपत्र… राजीनामा तो बनता है साहेब… जय हिंद” असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. —

Leave a Comment