विराट कोहलीने केली निवृत्तीची घोषणा ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे, देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गतवर्षी याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने … Read more

पंतप्रधान मोदींची 100 लाख कोटींची योजना !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करीत भाषण केले. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. तसेच देशाच्या विकासासाठी भविष्यातील योजनांचीही माहिती लोकांना दिली. यामध्ये पीएम गती शक्ती योजनेची चर्चा देशात सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या … Read more

चेन्नई सुपरकिंग्ज संघ अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- चेन्नई सुपरकिंग्ज आपला स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसच्या दुखापतीमुळे अडचणीत येऊ शकतो. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर प्लेसिसने कन्कशनमुळे इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेतून माघार घेतली. आता त्याच्या आयपीएलच्या उर्वरित सत्रात खेळण्यावरदेखील शंका आहे. प्लेसिस डोक्याला लागलेल्या जुन्या दुखण्यामुळे त्रस्त आहे. ती दुखापत पुन्हा एकदा उद‌्भवली. वैद्यकीय समितीच्या सल्लानंतर तो काही दिवस … Read more

फक्त १० मिनिटांत मेकअप करू इच्छिता? तर या ५ टिप्सचे अनुसरण करा

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नोकरी करणाऱ्या महिलांना कार्यालयीन काम घरातूनच हाताळावे लागते, त्यामुळे महिलांना स्वतःची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. महिलांना वाटते की मेकअप करण्यात बराच वेळ वाया जातो, पण तसे नाही. जाणून घ्या अशा काही जलद आणि सुलभ मेकअप टिप्स बद्दल , ज्याचा अवलंब करून तुम्ही १० मिनिटात तयार होऊ शकता. … Read more

मी शरद पवार बोलतोय ! शरद पवार यांचा आवाज काढून मागितली ५ कोटींची खंडणी

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून पिंपरी भागातील धीरज धनाजी पठारे या इसमाकडून ५ कोटींची खंडणी मागण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. हॅलो… मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक, असे म्हणून पैशांची … Read more

देशातील ‘हे’ रस्ते थेट नागलोककडे जातात, तेथे कसे जायचे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- साप आणि सापांचे जग जितके भयानक आहे तितकेच ते भीतीदायकही आहे. म्हणूनच लोक त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत. मग ते सापाच्या किंवा नागांच्या दर्शनाबद्दल असो किंवा नागांच्या घराबद्दल, म्हणजे नागलोक बद्दल. धर्म*पुराणात नागलोकाचा तपशीलवार उल्लेख आहे. देशात बऱ्याच ठिकाणी नागलोकला जाण्याचा मार्ग असल्याचा दावा केला जातो. या … Read more

… तर संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन करणार ! जाणून घ्या आजपासून काय सुरु आणि काय आहे बंद !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत.  खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा … Read more

वडील आणि मुलगा कोरोनाने गेले..पाच लाखाच्या कर्जाचा डोंगर कसा फिटणार ? अहमदनगर जिल्ह्यातील भीषण वास्तव !

हेरंब कुलकर्णी :- कोरोनात मृत्यू झालेल्या कुटुंबांना भेट देताना अकोले तालुक्यातील टाहाकरी या गावी दत्तू एखंडे च्या घरी पोहोचलो. वडील आणि मुलगा फक्त तीन दिवसाच्या अंतराने मृत्यू झालेले हे कुटुंब…  जमीन अत्यल्प आहे आणि दोघांच्या दवाखान्याचे बिल पाच लाख रुपये भरूनही दोघेही वाचले नाहीत..वडील रतन २ मे ला आणि दत्तू हा तरुण मुलगा ५ मे … Read more

खुशखबर ! सोन्याचे भाव १० हजारांनी घसरले; खरेदीस गर्दी , जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने खूप स्वस्त झाले आहे. काल नंतर, सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा एकदा घट नोंदवण्यात आली आहे. आजच्या घसरणीमुळे सोन्याचे दर 46,500 रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. सोन्याबरोबरच आज चांदीही स्वस्त झाली आहे. चांदीचा दर 850 रुपयांहून अधिक खाली आला आहे. मागील वर्षी हाच भाव … Read more

परदेशात शिक्षण घ्यायचय ? ‘अशा’ सोप्या पद्धतीने उभा करा पैसा

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-  परदेशात शिक्षण घेणे हे आता फक्त स्वप्न राहिलेले नाही. आता मध्यमवर्गीय कुटुंबातील कोणतेही मूल हे स्वप्न सहज पूर्ण करू शकते. याचे कारण मध्यमवर्गाची सतत वाढत जाणारी खर्च शक्ती आहे. दुसरीकडे, साथीच्या काळातही, परदेशी संस्थांकडे भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ कमी झालेला नाही. अर्जदारांच्या संख्येत 28% वाढ झाली आहे. आता प्रश्न … Read more

सोन्याच्या दरांत घसरण; ही आहेत कारणे….

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- १८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९ च्या रुग्णांत वाढ, डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण, निर्बंध कमी करण्याबाबत यूएस फेडची निराशाजनक भूमिका, अमेरिकेतील घटलेले बाँड उत्पन्न, गैरकृषी नोकऱ्यांमधील चांगली आकडेवारी आणि यासारख्या इतर … Read more

तुम्हाला गर्दी टाळायची असेल अन सुंदर ठिकाणांना पिकनिकला जायचं असेल तर ‘ह्या’ 6 मनमोहक ठिकाणांना भेट द्या

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे अद्भुत दृश्ये अतिशय आकर्षक आहेत. आता या ठिकाणी जाणे कोणाला आवडणार नाही, पण काही वेळा काही ठिकाणी खूप गर्दीही असते. अशा परिस्थितीत, आपण कुठे जावे हे निवडणे थोडे कठीण होते. चला तर मग जाणून … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ ठिकाणचा आठवडा बाजार राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सद्यपरिस्थितीत करोना विषाणूचा संसर्ग राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले आहे. तसेच कर्जत तालुक्यातील खेड व आसपासच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खेड … Read more

एक नंबर मूगाला प्रती क्विंटल मिळाला 7 हजार रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सोमवारी नगरच्या बाजार समितीत 500 ते 600 डाग मूगाची आवक झाली असून एकनंबर मूगाला प्रती क्विंटल 7 हजार 150 रुपये भाव मिळाला आहे. नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग पिकाची आवक सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानूसार या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत भूसार … Read more

गडचिरोली जिल्ह्यात प्रेमप्रकरणामुळे जन्माला आलेले बाळ विहिरीत ! कुमारी मातेला …

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- 16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा यांच्या प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या बाळाला कुमारी मातेने विहिरीच्या पाण्यात फेकले. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या वाकडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसपासच्या परिसरात खेळणाऱ्या मुलांना विहिरीत काहीतरी तरंगताना आढळले. ग्रामस्थांनी ती वस्तू बाहेर काढल्यानेतर तो नवजात बाळाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट … Read more

नीरज चोप्रा म्हणाला ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून …

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत … Read more

नगर शहरातील बाजारपेठा खुल्या करा; संग्राम जगताप यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊनचा वापर करुन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली. मात्र, व्यापारीकरण आर्थिक संकटात सापडले आहे. व्यापाऱ्यांना धीर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तरी मुंबई-पुणे येथे रविवारी सरकारने घोषणा करून बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे नगर शहरातील बाजारपेठ … Read more

देशाला हादरवारी घटना : दहशतवाद्यांकडून हल्ला, गोळीबारात भाजप नेते आणि पत्नीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग इथून एक देशाला हादरवारी बातमी समोर आलीय,इथे दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्थानिक भाजप नेते गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी देखील दहशतवाद्यांनी भाजपला टार्गेट … Read more