Omicron ने वाढवले टेन्शन ! देशात रुग्ण दीडशे पार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्रात आज ओमायक्रॉनचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. यातील ४ रुग्ण मुंबईतील असल्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने आता धाकधूकही वाढली आहे.(Omicron news)

मिळालेल्या माहितीनुसार आज सापडलेल्या चार रुग्णांपैकी 2 रुग्णांनी टांझानियाचा तर 2 जणांनी इंग्लंडचा प्रवास केला आहे. या चारही जणांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

त्यांना पुढील उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची प्रकरण झपाट्याने वाढत आहेत.

रविवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवीन रुग्ण आढळल्यानंतर, ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे.

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे, ब्रिटनसारखी परिस्थिती येऊ नये अशी अशा आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये एका दिवसात 10,000 हून अधिक ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

यूकेमध्ये गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाची ९०,००० हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. जगाच्या इतर भागात संसर्गाची प्रकरणं वाढतात तेव्हा आपण बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार तयारी केली पाहिजे,

असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर डॉ. गुलेरिया यांनी सतर्क केलं होतं.

ओमायक्रॉनमध्ये ३० हून अधिक म्यूटेशन आढळले आहेत. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्याबरोबरच लसीकरण गांभीर्याने करण्याची गरज असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे.