गावठी बंदुकीचा धाक दाखवत महिलेला धमकावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  महिलेला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील देवीमंदिराशेजारी ही घटना घडली.

याप्रकरणी मारहाण झालेल्या आशा सुभाष रोहकले (रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल गंपू घाडगे, कैलास दत्तात्रेय शेलार, सज्ञान पेंटा शेलार, ओंकार कैलास शेलार, हलका सज्ञान शेलार, बंडू भगत (पूर्ण नाव माहिती नाही), पेंटा शेलार (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. बुर्‍हाणनगर ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बुर्‍हाणनगर येथील देवी मंदिराच्या शेजारी असताना आरोपींनी घरगुती वादाच्या कारणातून हत्याराने फिर्यादीला मारहाण केली.

गावठी बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस नाईक बी. पी. गायकवाड हे करीत आहेत.