तरूण बळजबरीने घरात घुसला; महिलेचा हात धरून…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  घरात घुसून बळजबरीने महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग करणारा

तरूण शंकर येमूल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. श्रमिकनगर, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरामध्ये असताना शंकर येमूल हा बळजबरीने त्यांच्या घरात घुसला. त्याने फिर्यादीचा उजवा हात धरून त्यांना त्याच्या जवळ ओढले.

त्यांच्यासोबत गैरवर्तन करून शंकर येमूल तेथून निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात येत विनयभंग करणारा शंकर येमूल याच्या विरोधात फिर्याद दिली.

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक संभाजी बडे हे करीत आहेत.