Ahmednagar Breaking : विखे-लोखंडेंसाठी पंतपधान मोदी अहमदनगरमध्ये ! ‘या’ तारखेला होणार भव्य सभा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीत खा. सदाशिव लोखंडे व अहमदनगर लोकसभेसाठी खा. सुजय विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान सर्वांना उत्सुकता लागलेली होती की अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कधी होणार.

मागील लोकसभेला खा. सुजय विखे यांच्यासाठी मोदी यांनी अहमदनगरमध्ये सभा घेतली होती. आता यंदाच्या निवडणुकांतही नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत.

सहा मे ला सभा
६ मे रोजी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची भव्य सभा होणार आहे. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अहमदनगर शहराजवळील सावेडी येथे ही भव्य सभा होणार आहे. अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ही एकत्रित सभा असेल असे सांगण्यात येत आहे.

६ मे रोजी संध्याकाळी 5 वाजता सावेडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा होणार आहे. वाढती उष्णता पाहता संध्याकाळी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजित करण्यात आले असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

महायुतीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. शिर्डीत शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे (उभाटा) भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात लढणार आहेत.

त्यामुळे ही मोदी यांची सभा महत्वपूर्ण मानली जात आहे. सभेची व्यवस्था अंतिम करण्यासाठी भाजपची केंद्रीय समिती एक दिवसासाठी सावेडी येथे आली होती अशीही माहिती मिळाली आहे.

मागच्या सभेला सर्जिकल स्ट्राईक यंदा कोणते मुद्दे?
मागील पंचवार्षिकला मोदी यांनी घेतलेल्या सभेत अनेक मुद्द्यांना हात घातला होता. यात प्रामुख्याने सर्जिकल स्ट्राईक हा मुद्दा मुख्यत्वेकरून त्यांनी घेतला होता. आता या सभेमध्ये श्रीराम मंदिर हा मुद्दा असेलच परंतु आता आणखी कोणकोणत्या मुद्द्यांना ते हात घालतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.