12वी पर्यंतच शिक्षण, हॉटेलचा व्यवसाय; शिवसेनेचे शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरून आमदार, निलेश लंके यांचा राजकीय प्रवास तुम्हाला माहितीये का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nilesh Lanke News : भारतीय निवडणूक आयोग उद्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी तारखा जाहीर करणार असे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे. यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकारणात वेगवेगळे प्रयोग देखील घडत आहेत. असाच एक प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातून समोर येत आहे. महायुतीमध्ये समाविष्ट असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार निलेश लंके हे लवकरच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत.

यामुळे अहमदनगरसहित संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात निलेश लंके हे नाव अचानक चर्चेस आले आहे. खरेतर, लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तीन ते चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होतील अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.

अशातच, अजितदादा यांच्या गटातील हा मोहरा अजित पवार यांना धक्का देत शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असे दिसत आहे. काल, अर्थातच 14 मार्च 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रीमो शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील तसेच पक्षाच्या इतर अन्य नेत्यांच्या उपस्थित लंके यांच पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. यावेळी एका पत्रकार परिषदेचे देखील आयोजन झाले होते.

दरम्यान, याचवेळी लंके शरद पवार यांच्या गटात प्रक्षप्रवेश करणार असं बोललं जात होत, मात्र याला काल मुहूर्त मिळाला नाही. दोन्हीही नेत्यांनी पक्षप्रवेशावर एक शब्दही काढला नाही. शरद पवारांनी निलेश लंके यांचे स्वागत केले आणि लंके यांच्या पाठीशी सदैव आपण उभे राहू असे म्हटले आहे. दुसरीकडे लंके यांनी साहेब जो आदेश देतील तो मान्य असेल असे म्हटले आहे, पण त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. मात्र लंके यांच्या गाडीवरील घड्याळ आता उतरून त्या जागी तुतारी विराजमान झाली आहे. यामुळे पक्षप्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, लंके यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा खरी ठरली तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला आगामी लोकसभा आणि त्यापुढील विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो असा दावा होत आहे. कारण की, अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात लंके यांना लोकांचं मोठं समर्थन आहे. कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल देश पातळीवर घेण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण आमदार निलेश लंके हे नेमके कोण आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण आहेत निलेश लंके ?

निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते आपल्या मतदारसंघात विशेष लोकप्रिय आहेत. त्यांची लोकाभिमुख कामे आणि त्यांची बोलण्याची पद्धत, काम करण्याची शैली यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. युवा वर्ग त्यांना विशेष पसंत करतो असे म्हणतात. विशेष म्हणजे मतदार संघाबाहेरही त्यांची विशेष पकड आहे.

नगर दक्षिण मध्ये त्यांची पकड अधिक असल्याचे म्हटले जाते. निलेश लंके हे 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरून आमदार झाले आहेत. मात्र सध्या स्थितीला ते अजितदादा यांच्या गटात सहभागी आहेत. अजित दादा यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी अजितदादा समवेत जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता मात्र ते लवकरच पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात सहभागी होणार अशा चर्चा आहेत.

लंके यांचे शिक्षण किती ?

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश लंके यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. बारावी नंतरचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटीआय केला. यानंतर त्यांनी काही काळ नोकरी देखील केली. नोकरी केल्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायात देखील आपले नशीब आजमावले. काही काळाने हॉटेलचा व्यवसाय बंद केला आणि नंतर ते सामाजिक कामात गुंतलेत.

राजकारणाची सुरुवात कशी झाली ?

निलेश लंके यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली हे विशेष. वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसेनेने त्यांना शाखाप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. शिवसेनेत असतानाच त्यांनी हंगा या आपल्या गावातून ग्रामपंचायतीचे इलेक्शन जिंकले. मात्र 2018 मध्ये काहीतरी वाद झाला आणि शिवसेनेने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पारनेर या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आणि विधिमंडळात ते सध्या आमदार म्हणून काम पाहत आहेत.

सध्या ते अजितदादा यांच्या गटात आहेत. मात्र लवकरच ते शरद पवार यांच्या गटात जातील अशा चर्चा आहेत. विशेष म्हणजे ते आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून खासदारकीसाठी उभे राहणार असा दावा होत आहे. मात्र याबाबत अद्याप फक्त चर्चा सुरू आहेत. यावर अंतिम निर्णय झाल्यावरच योग्य ती स्पष्टोक्ती येऊ शकणार आहे.