“मी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, हे मी नाही तर…..” आई तुळजाभवानी दरबारी आमदार निलेश लंके यांचे सूचक वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nilesh Lanke News : अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे सध्या खूपच चर्चेत आहेत. त्यांची चर्चा होण्याचे कारण असे की, ते लवकरच अजितदादा यांच्या गटाला जय महाराष्ट्र म्हणत पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे जाण्याचा तयारीत आहेत. निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा सध्या सुरू आहेत. विशेष म्हणजे त्याच्याकडूनही तसेच संकेत दिले जात आहेत.

त्यांच्या गाडीवरील अजितदादा यांच्या गटाचे चिन्ह गायब झाले आहे आणि शरद पवार यांची तुतारी गाडीवर विराजमान झाली आहे. त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेटही घेतली. लंके यांचे अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे शरद पवार यांनी विमोचन केले आहे.

यावेळी पत्रकार परिषद झाली ज्यात शरद पवार गटाचे सर्व नेते उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांच्या पक्षात निलेश यांचा पक्षप्रवेश होईल असे बोलले जात होते. मात्र पक्षप्रवेशाच्या साऱ्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यातच आहेत. मात्र या गोष्टीची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, निलेश लंके हे आपल्या कार्यकर्त्यांसहित नुकत्याच तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दरबारी दर्शनासाठी गेलेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी निलेश लंके यांनी लोकसभेसाठी उभे राहावे यासाठी साकडे घातले असल्याचे सांगितले जात आहे.

तुळजापुरला दर्शन घेतल्यानंतर निलेश लंके यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी बातचीत केली आहे. त्यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत उभे राहणार की नाही याबाबत मोठ वक्तव्य केल आहे.

आई तुळजाभवानीकडे काय मागीतलं ?

लंके यांना आई तुळजाभवानी मातेकडे काय मागितलं ? असं विचारले असता त्यांनी शेतकऱ्यांना आनंदी ठेव, गोर गरीब जनतेच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दिसावं अशी प्रार्थना तुळजाभवानीकडे केली असल्याचे सांगितले. शेतकरी हा कृषिप्रधान देश आहे, शेतकऱ्यांची प्रगती तर देशाची प्रगती असे म्हटले आहे. 

तुम्ही सुजय विखे यांना आव्हान देणार का?

या प्रश्नावर उत्तर देताना लंके यांनी मी आव्हान देण्या इतका मोठा नेता नाही. मी एक सर्वसामान्य कुटुंबातून येतो. मी माझ्या सवंगड्यांच्या ताकतीवर एका मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहतो. एखाद्याबद्दल आपण आव्हानात्मक बोलणं मला शोभेचे वाटत नाही असे उत्तर दिले आहे.

तुमची भूमिका नेमकी काय आहे ?

यावर उत्तर देताना मी एक खेळाडू आहे. बालवयापासून मला खेळायची सवय आहे. मी लहान असताना मला कुस्तीची सवय होती. त्यावेळी मी बरोबरीच्या पोरासंग कधीच कुस्ती खेळायचो नाही. नेहमी मोठ्या पैलवानासोबत कुस्ती खेळायचो त्यामुळे मोठ्या पैलवानला पाडले की आखाड्यात शिट्ट्या वाजत, असं वक्तव्य निलेश लंके यांनी यावेळी दिले आहे. 

लोकसभेच्या आखाड्यात तुम्ही मोठ्या पैलवाणाला चितपट करणार का ?

यावर उत्तर देताना निलेश लंके यांनी लोकसभा ही देशाची भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. याकडे आखाडा म्हणून पाहू शकत नाही. कारण लोकसभा निवडणूक देशातली सर्वात महत्त्वाची निवडणूक असते. त्या निवडणुकीमुळे देशाचे भवितव्य घडणार आहे. यामुळे त्या निवडणुकीबाबत अद्याप पर्यंत… मी आता फक्त जनतेचा काय सुर आहे, याची चाचपणी करत आहे. पाहू आता पुढ काय होतं ? असं यावेळी म्हटले आहे.

मला निवडणूक लढवायची की नाही हे मी नव्हे तर…

यावेळी लंके यांनी मला निवडणूक लढवायची की नाही हे मी नाही तर जनता ठरवणार आहे. निवडणुकीचे निलेश लंके फक्त एक माध्यम राहणार असे म्हटले आहे.