लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी अधिसूचना जारी केली. याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ जागांवर निवडणूक होणार आहे.

तर, दाक्षिणात्य राज्य तामिळनाडू, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आसाम व बिहारसह केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान व निकोबार, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पद्दुचेरीतही मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला घेण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील एकूण १०२ जागांवर निवडणूक होणार आहे. यात, महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या ५ जागांचा समावेश आहे.

तामिळनाडूतील सर्वच्या सर्व ३९, राजस्थानातील १२, उत्तरप्रदेशातील ८, मध्यप्रदेशातील ६, उत्तराखंडमधील सर्व ५, आसामातील ५, बिहारमधील ४, पश्चिम बंगालमधील ३, अरुणाचल प्रदेशातील २ जागांसाठी मतदान होणार आहे.

याशिवाय मणिपूर व मेघालयातील प्रत्येकी २ जागा, तर छत्तीसगड, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान व निकोबार, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पहुंचेरीतील प्रत्येकी एका जागेवर मतदान घेण्यात येणार आहे.