सुपरहिट ठरलेल्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमा सलमानने नाकारला होता, दिग्दर्शकाने सांगितला सल्लू चा त्यावेळचा भन्नाट किस्सा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो साइड रोल भूमिकेत दिसला होता. १९८९ मध्ये सलमानने सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून पदार्पण केले होते.

हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटानंतर सलमानने पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर तो सुपरस्टार झाला. परंतु या सिनेमात सलमानने काम करण्यास नकार दिला होता. त्याबद्दल इंटरेस्टिंग माहिती सूरज बडजात्या यांनी एका मुलाखतीत दिली आहे.

सलमानला ‘मैंने प्यार किया’ सिनेमा करायचा नव्हता

बडजात्या म्हणाले, ‘बीवी हो तो ऐसी’ या सिनेमात सलमान साइड रोल करत होता. त्यावेळी आम्ही न्यू कमर्स कलाकाराच्या शोधात होतो. जेव्हा मी या चित्रपटासाठी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने खूप आढेवेढे घेतले.

स्वत:ऐवजी चित्रपट करू शकतील अशी इतरांची नावे त्याने यावेळी सांगितली. सलमान म्हणाला की मी या सिनेमासाठी लायक नाही. तुम्ही दुसऱ्याला घ्या. सूरज बडजात्याने असेही सांगितले की यापूर्वी त्याने सलमानची स्क्रीन टेस्ट नाकारली होती पण नंतर त्याला कास्ट करण्यासाठी पाच महिन्यांनी कॉल केला होता.

दीपक तिजोरी यांनीही दिली होती ऑडिशन

अभिनेता दीपक तिजोरीने यापूर्वी खुलासा केला होता की, या चित्रपटात प्रेम च्या भूमिकेसाठी त्याची आणि सलमानची स्पर्धा होती. सलमानला नंतर त्याच्या लूकमुळे ही भूमिका मिळाली. सूरजजींनी मला फोन केला आणि म्हणाले,

‘आम्ही तुमची आणि सलमानची ऑडिशन पाहिली.’ तुम्ही दोघेही उत्तम आहात. प्रेमच्या भूमिकेसाठी सलमानचा लूक परफेक्ट आहे. ही एक लव्हस्टोरी आहे आणि आम्हाला रोमान्स दाखवायचा आहे, म्हणून आम्ही सलमान निवडला आहे. तसेच बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जी यांनाही प्रेमची भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.