Titanic Actor Passes Away : दुःखद बातमी! ‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्याचं गंभीर आजाराने निधन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Titanic Actor Passes Away: टायटॅनिक या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता डेव्हिड वॉर्नर यांचं निधन झालं आहे. ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि या आजारामुळे त्यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. डेव्हिड वॉर्नरच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

वॉर्नर अनेकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांच्या मृत्यूची माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, गेल्या 18 महिन्यांपासून त्यांच्या आजारावर उपचार सुरू होते. या निवेदनात कुटुंबाने पुढे म्हटले आहे की, ‘आम्हाला, त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांची खूप आठवण येईल. ते एक दयाळू आणि उदार व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या असामान्य कार्याने गेल्या काही वर्षांत अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला.”

या चित्रपटांमध्ये केले काम

डेव्हिड वॉर्नर यांनी 1971 मध्ये रिलीज झालेला सायकोलॉजिकल थ्रिलर स्ट्रॉ डॉग्स, 1976 मधील हॉरर क्लासिक द ओमेन, 1979 मध्ये टाइम ट्रॅव्हल फिल्म टाईम आफ्टर टाइम आणि 1997 चा ब्लॉकबस्टर टायटॅनिक यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. टायटॅनिकमध्ये त्यांनी व्हिलन स्पायसर लव्हजॉयची भूमिका साकारली होती.

2001 मध्ये, वॉर्नर मेजर बार्बरामध्ये अँड्र्यू अंडरशाफ्टची भूमिका करत जवळपास तीन दशकांनंतर थिएटरमध्ये परतला. 2005 मध्ये त्यांनी चिचेस्टर फेस्टिव्हल थिएटरमध्ये शेक्सपियरच्या किंग लिअरमध्ये भूमिका केली आणि 2007 मध्ये शेक्सपियरच्या कॉमिक बफून फाल्स्टाफची भूमिका केली. होती
टीव्हीवरही काम केले

डेव्हिड वॉर्नरने टीव्हीवरही काम केले. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट या चित्रपटासाठी डेव्हिड वॉर्नरला ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 1981 मध्ये, डेव्हिड वॉर्नरने टीव्ही मिनी-सिरीज मसाडासाठी एमी पुरस्कार जिंकला. डेव्हिड वॉर्नर ‘डॉक्टर हू’, ‘पेनी ड्रेडफुल’ आणि ‘रिपर स्ट्रीट’ सारख्या टीव्ही शोमध्येही दिसला.