Maharashtra Politics :- देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवणार, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ? भाजपात नाराजी की सत्तानाट्य? वाचा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल अन विविध घटना नागरिकांनी पाहिल्या. जे सत्तानाट्य महाराष्ट्रात सुरु आहे त्याने अनेक नागरिक उघड नाराजी व्यक्त करत आहेत. बऱ्याचदा महाराष्ट्रात फडणवीसांना न ठेवता त्यांना केंद्रात पाठवलं जाईल अशा चहरचा अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत.

परंतु आता एका मोठ्या नेत्याच्या याच वक्तव्याने मात्र खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे मुख्यमंत्रीच व्हावं आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, असं वक्तव्य केलंय.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आपली रणनीती आखत आहे. भाजपला लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा भाजपला मिळाव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

या निवडणुकीत भाजप मोठ्या चेहऱ्यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांकडे लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून पाहिले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ही चर्चा सुरु असताना आता संजय शिरसाट यांचं वक्तव्य समोर आलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता लोकसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि जर निवडणूक लढवली तर ते केंद्रात जातील. मग महाराष्ट्राचे नेतृत्व कोण करणार असा सूर उमटत आहे.

दरम्यान या गोष्टींवर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस यांनी छान प्रकारे सांगितलं आहे की, येत्या काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील. मुळात फडणवीस करतात तसं वागत नाहीत. याचा एक अर्थ फडवीसांचा इथला दाणापाणी उठलेला आहे.

आता त्यांची गच्छंती केंद्रामध्ये होत आहे”, असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळे आता भाजप खरोखर फडणवीसांना केंद्रात पाठवणार का? शिरसाठ यांनी जे वक्तव्य केलं त्याने भाजपात नाराजी पसरली आहे का? की हे पुन्हा एकदा सत्तानाट्य आहे? हे सगळं येणारा काळच सांगेल.