Mhada News: स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ कालावधीत म्हाडाच्या कोकण मंडळाकडून तब्बल ‘इतक्या’ घरांची काढण्यात येणार सोडत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News:-  म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मुंबईसारख्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरामध्ये घरांची उपलब्धता करून देण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे देखील मुंबईसारख्या शहरांमधील घराचे स्वप्न पूर्ण होते. आपल्याला माहित आहेच की नुकतीच म्हाडाच्या माध्यमातून घरांच्या साठी लॉटरी काढण्यात आलेली होती.

परंतु या लॉटरीमध्ये देखील बरेच जणांना काही कारणास्तव अर्ज करता आले नसतील. परंतु चिंता करण्याची गरज नसून तुम्हाला आता एक पुन्हा म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यात येणार असून लवकरच कोकण मंडळाकडून घरांसाठी सोडत काढण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

 म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4017 घरांसाठी सोडत

याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून तब्बल चार हजार सतरा घरांकरिता सोडत करण्यात येणार असून  येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये ही सोडत काढण्यात येणार असल्याचे समोर आलेले आहे. तसेच या सोडतीसाठी आवश्यक अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती साधारणपणे ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे देखील समोर आलेले आहे.

या सोडती अंतर्गत मुंबईमधील डोंबिवली, खोणी तसेच शिरढोण, गोठेघर, बाळकुम आणि विरार बोळींज या ठिकाणच्या घरांचा यामध्ये समावेश आहे. तसेच मागील झालेल्या सोडतीमध्ये जे काही घरे शिल्लक आहेत त्या घरांचा देखील यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जर साधारणपणे विचार केला तर येथे आठ दिवसांमध्ये या सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल असं देखील सांगण्यात आलं असून घरांच्या किमती साधारणपणे 20 ते 40 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या म्हाडाच्या एकूण 4654 घरांच्या सोडतीमध्ये फक्त 2131 घरे विकली गेलेली असल्यामुळे शिल्लक घरे विकण्यासाठी पुन्हा सोडत काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडाच्या कोकण मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे निश्चितच नागरिकांना आता एक चांगली संधी चालून आलेली आहे.