Sukanya Samrudhi Yojana : वापरा ही पद्धत आणि तपासा तुमच्या मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यातील जमा रक्कम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Samrudhi Yojana :- मुलीच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही खूप महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून वयाच्या दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर तुम्ही या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेचा परिपक्व कालावधी हा 21 वर्षाचा असून यामध्ये तुम्हाला पंधरा वर्षापर्यंत पैसे भरणे गरजेचे असते.

सध्या या योजनेत पैसा जमा केल्यावर सरकारच्या माध्यमातून आठ टक्के दराने व्याज मिळत असून बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट उघडता येते. आणखी या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकतात.

 ही कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या मुलीचे खाते उघडू शकतात

जर तुमच्या लाडलीचे तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून खाते उघडायचे असेल तर त्याकरिता आई आणि वडिलांचे ओळखपत्र आवश्यक असते तसेच मुलीचे आधार कार्ड देखील लागते. मुलीच्या नावाने बँकेत खाते उघडले असेल तर त्याचे पासबुक देखील तुम्हाला या ठिकाणी लागते. मुलीचा पासपोर्ट साईज फोटो लागेल. तसेच मोबाईल नंबर आवश्यक असतो.

या पद्धतीचा वापर करून तपासा सुकन्या समृद्धी खात्यातील जमा रक्कम

मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खात्यामध्ये आपण पैसे जमा करतो. परंतु कालांतराने या खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे देखील चेक करणे खूप महत्त्वाचे असते. यामध्ये तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे चेक करू शकतात. याकरिता तुम्हाला तुमच्या बँकेची नेटबँकिंग सुविधेचा वापर करावा लागेल.

नेटबँकिंगमध्ये तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल व त्यानंतर डॅशबोर्डवर तुमचे सर्व असलेले खात्यांची लिस्ट तुम्हाला दिसते. या ठिकाणी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यावर क्लिक करून डाव्या बाजूस असलेल्या अकाउंट स्टेटमेंट अर्थात खात्याचे विवरण या पर्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्याची शिल्लक तपासता येईल.

 या योजनेत किती मुलींच्या नावाने खाते उघडता येते?

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दोन मुलींसाठी खाते उघडता येणे शक्य आहे. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे जर तुमच्या दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्यांना या सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. परंतु महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला मुलगी झाल्यानंतर दुसरी आणि तिसरी मुलगी जुळी असेल तर त्या मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळतो.