महागाई भत्याबाबत कर्मचाऱ्यांची निराशा! काय आहे महागाई भत्याबाबत महत्त्वाचे अपडेट? वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मागील बऱ्याच दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असलेल्या महागाई भत्त्या बाबत बोलले जात होते किंवा एकंदरीत सोशल मीडियावर चर्चा होती की जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा फायदा मिळेल. परंतु जर आपण सध्याची महागाई भत्तावाढीबाबत त्याची एक महत्त्वाची अपडेट पाहिली तर ती महागाई भत्ता वाढीबाबत कर्मचाऱ्यांची निराशा करणारीच आहे. कारण सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती की महागाई भत्यातील वाढ ही चार टक्के होईल. परंतु सध्या याबाबतीत कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे सध्या चित्र आहे.

 कर्मचाऱ्यांची होती चार टक्के डीए वाढीची अपेक्षा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतेच महागाई भत्ता वाढीबाबत एक अपडेट समोर आले असून ते कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरवणारे आहे. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्तामध्ये चार टक्क्यांची वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु ही वाढ चार टक्के न होता त्याऐवजी तीन टक्के करण्यात येणार असल्याचे सध्या समोर आले आहे.

म्हणजेच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही बेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे त्यामध्ये तीन टक्के वाढ पकडली तर तो 42 वरून 45 टक्के इतका होणार आहे व ही वाढ जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची घोषणा देखील चालू महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता देखील अनेक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

तसेच जुलै महिन्यापासून महागाई भत्ता फरकाची जी काही रक्कम असेल ती देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.जर आपण या क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीचा विचार केला तर त्यांच्या मते एआयसीपीआय म्हणजेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे महागाई भत्त्यामध्ये 3.23 टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित होते.

परंतु यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की तीन टक्क्यावरील दशांश अंकाचा विचार हा महागाई भत्तावाढ लागू करताना केला जात नाही किंवा केला जाणार नाहीये. त्यामुळे महागाई भत्ता हा 3.23% न मोजता तो तीन टक्केच निश्चित केला जाणार आहे.

तसेच हा प्रस्ताव येणाऱ्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी करिता ठेवला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. 31 जुलै 2023 रोजी केंद्र सरकारच्या एआयसीपीए- आयडब्ल्यूच्या आकडेवारी समोर आली असून या आकडेवारीनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जुलै महिन्यापासून तीन टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे.