Health Information: एचआयव्ही आणि एड्स एकच नाही बर का! दोघांमध्ये आहे फरक,वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Information:- एड्स म्हटले म्हणजे नाव ऐकताच अंगावर भीतीने काटा उभा राहतो. जेवढे काही गंभीर आजारांची यादी आहे त्यामध्ये एचआयव्हीचे नाव अव्वल स्थानी घेतले जाते. परंतु या आजाराबद्दल जर एक सामान्य गोष्ट पाहिली तर बहूसंख्य पद्धतीने एचआयव्ही आणि एड्स ही दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने घेतले जातात.

म्हणजेच एड्सलाच एचआयव्ही म्हटले जाते. पण वैद्यकीय दृष्ट्या पाहिले तर यामध्ये काहीही तथ्य नाही. तसे पाहायला गेले तर एचआयव्ही आणि एड्स या दोन्हीचा अर्थ वेगवेगळा होतो. यासंबंधीचीच माहिती या लेखात बघू.

 एड्स आणि एचआयव्हीमध्ये काय आहे फरक?

जर आपण एड्स आणि एचआयव्ही या दोघांमधील महत्त्वाचा फरक पाहिला तर तो बारकाईने समजून घेणे गरजेचे आहे. जर आपण यामध्ये एचआयव्हीचा अर्थ पाहिला तर त्याला प्रामुख्याने ह्युमन इमिनो डिफिशियन्सी वायरस या नावाने ओळखले जाते व हा एक विषाणूचा प्रकार आहे.

एचआयव्ही हा विषाणू शरीरामध्ये एखाद्या आजाराच्या संसर्गाशी लढण्यासाठी ज्या पेशी मदत करतात त्यांच्यावर हल्ला करतो. त्यामुळे साहजिकच एखाद्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता अधिक प्रकारे वाढते.

हा विषाणू व्यक्तीच्या विशिष्ट प्रकारच्या शारीरिक द्रवाच्या संपर्क झाल्यानंतर पसरतो. यामध्ये प्रामुख्याने असुरक्षित प्रकाराचे शारीरिक संबंध किंवा इंजेक्शन  सारखी इतर औषधी उपकरणे त्याच्यामुळे याचा संसर्ग होऊ शकतो. म्हणजेच एचआयव्ही हा एक विषाणू आहे.

 एड्स म्हणजे नेमके काय?

एड्सचा विचार केला तर त्याला एक्वायार्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असे म्हटले जाते. एड्स ही अशी परिस्थिती आहे की एचआयव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ही शेवटची सर्वात गंभीर परिस्थिती किंवा गंभीर टप्पा असतो.

जे अगदी सोप्या शब्दात जर समजून घ्यायचे असेल तर एचआयव्हीचा संसर्ग व्यक्तीला झाला तर दहा वर्षात त्याचे एड्समध्ये रूपांतर होते किंवा तो एड्स मध्ये बदलतो.

ज्या व्यक्तीला एड्स झालेला असतो अशा लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती साठी महत्त्वाचे असलेल्या पांढऱ्या रक्त पेशींची संख्या झपाट्याने कमी होते व यामुळे अनेक प्रकारचे रोग व्यक्तीला जडू शकतात.

 एचआयव्ही विषाणूमुळे एड्स कधी होतो?

शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची जी काही प्रणाली आहेत तिच्या संसर्गाशी लढणाऱ्या CD4 पेशींवर एचआयव्ही प्रामुख्याने हल्ला करतो व त्या पेशींना नष्ट करतो. या पेशी नष्ट झाल्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या संसर्ग,

तसेच काही छोटे-मोठे रोग आणि कर्करोगाशी लढणे कठीण जाते. उपचार नसल्यामुळे एचआयव्ही संपूर्ण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करतो व व्यक्तीच्या आरोग्य मोठ्या प्रमाणावर ढासळते व त्यानंतर एड्सची सुरुवात होते.