Steel and Cement Price : स्वप्नातील घर उभारण्याची सुवर्णसंधी! सिमेंट आणि स्टीलच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel and Cement Price : स्वप्नातील घर कमी बजेटमध्ये बांधण्याची सुवर्णसंधी आहे. कारण घर बांधण्यासाठी लागणारे स्टील आणि सिमेंटच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना तुमचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचतील.

प्रत्येकजण घर बांधत असताना आयुष्यभर जमा केलेले पैसे खर्च करत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना कमी बजेटमध्ये घर पूर्ण करायचे असते. मात्र घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाले की सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे बजेट कोसळते.

मात्र जर सध्याच्या स्टील आणि सिमेंटच्या दरात तुम्ही घर बांधण्यास सुरुवात केली तर तुम्हाला कमी बजेटमध्ये सर्वकाही मिळू शकते. सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमती सामान्य पातळीवर आहेत.

स्टील आणि सिमेंटच्या मागणीत सध्या घट असल्याने त्यांच्या किमती उतरत आहेत. मात्र उन्हाळ्यामध्ये स्टिल आणि सिमेंटच्या मागणीत वाढ होते आणि किमतीही वाढतात. त्यामुळे घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट खरेदी करणे महाग होते.

स्टील आणि सिमेंटच्या किमतीत बदल

महागाईच्या काळात घर बांधणे तसे बघायला गेले तर महागच आहे. मात्र सध्या स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण होत असल्याने थोडे का होईना तुमचे पैसे वाचतील. स्टील आणि सिमेंटच्या किमतीत सतत बदल होत आहे.

स्टील आणि सिमेंटच्या किमती नेहमीच सारख्या नसतात, त्यांच्या किमती वेळोवेळी वाढत आणि कमी होत राहतात. अगदी अलीकडे, काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटच्या किमती खूप वाढल्या होत्या, पण नंतर काही काळानंतर स्टील आणि सिमेंटचे भाव आपोआप खाली आले.

स्टील आणि सिमेंट नवीन दर

सध्या सिमेंट आणि स्टील स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये देखील तुमचे घर पूर्ण होऊ शकते. सध्या स्टीलचा दर 56600 रुपये प्रति टन इतका आहे. तर सिमेंटचे दर प्रति बॅग ३४० ते ४०० रुपये सुरु आहे.

प्रमुख शहरातील स्टीलचे दर

मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56600 रुपये प्रति टन 20-February-23
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51600 रुपये प्रति टन 20-February-23
दिल्ली दिल्ली TMT 12mm 53400 रुपये प्रति टन 20-February-23
चेन्नई तामिळनाडू TMT 12mm 54500 रुपये प्रति टन 20-February-23