Chanakya Niti : चाणक्यांच्या मते ज्या महिलांमध्ये असतात या 3 सवयी, त्यांचे कुटुंब सदैव राहते सुखी आणि समृद्ध…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा आजही वैवाहिक जीवनातील स्त्री आणि पुरुषांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.

स्त्री आणि पुरुषांना जीवनात सुखी राहायचे असेल तर त्यांना चाणक्य नीती या ग्रंथाचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. यामध्ये वैवाहिक जीवनात कसे सुखी राहायचे याबद्दलही सांगण्यात आले आहे.

वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांना समजून घेणं आणि प्रेम करणे हा सुखी राहण्याचा सर्वात मोठा उपाय असल्याचे चाणक्य म्हणतात. त्यामुळे स्त्री आणि पुरुष आनंदात राहू शकतात.

आचार्य चाणक्य यांनी विशेषतः महिलांबद्दल अनेक धोरणे चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितली आहेत. कुटुंबात संसार करण्यासाठी महिला महत्वाची भूमिका बजावत असतात. महिलांच्या या सवयीमुळे कुटुंब आनंदात आणि सुखात संसार करत असते.

समाधानी राहणे

कुटुंब चालवत असताना महिलांकडे विशेषतः घराची जबाबदारी असते. ज्या महिला आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी असतील त्या अधिक उत्तमरीत्या संसार चालवत असतात.

समाधानी स्त्रिया कौटुंबिक मान-सन्मान कधीच ओलांडत नाहीत, अशा स्त्रिया कुटुंबाच्या स्थितीनुसार त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. कठीण प्रसंगातही ती कुटुंबासोबत आपुलकीने वाटून घेते. ज्या महिलांना ही सवय असते, त्यांचा परिणाम त्यांच्या भावी पिढ्यांवरही दिसून येतो.

संयम आणि मजबूत इच्छाशक्ती

आचार्य चाणक्य म्हणतात ज्या स्त्रीमध्ये संयम आणि मजबूत इच्छाशक्ती आहे अशी स्त्री कधीही कुटुंबावर संकट येऊ देत नाही. तसेच अशा स्त्रिया संसार व्यवस्थित चालवत असतात. कठीण प्रसंगातही अशा स्त्रिया हसतमुख राहतात.

पैसे व्यवस्थापन

पुरुषांपेक्षा स्त्रियांना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे चांगले माहित असते. सुखी जीवनासाठी, घरातील महिलांनी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबात पैसे साठवण्याची सवय विकसित होते. महिलांच्या या सवयीमुळे संकटकाळातही कुटुंब सुरक्षित राहते, कुटुंबाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.