Steel and Cement Price : घर बांधणे झाले सोपे! सिमेंट आणि स्टीलच्या किमती घसरल्या; पहा नवीन किमती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel and Cement Price : घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे घर बांधणे सोपे झाले आहे. स्टील आणि सिमेंटच्या किमती घसरल्याने तुम्ही स्वप्नातील घर कमी बजेटमध्ये पूर्ण करू शकता.

गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता त्याच्या किमती कमी झाल्याने कमी खर्चात तुम्ही घर बांधू शकता. घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हे दोन घटक महत्वाचे आहेत.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

घर बांधण्याचे तुमचेही स्वप्न असेल तर ते कमी खर्चात पूर्ण होऊ शकते. कारण घर बांधताना स्टील आणि सिमेंट हे दोन साहित्य खरेदी करताना अधिक पैसे खर्च होत असतात. सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमती कमी झाल्याने हे खरेदी करताना पैशांची बचत होऊ शकते.

स्टील आणि सिमेंटच्या किमतीत चढ-उतार

स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये सतत चढ उतार कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर खूपच वाढले होते. त्यामुळे घर बांधणाऱ्यांचे बजेट कोलमडले होते.

गेल्या वर्षी स्टीलचे दर ७० हजार रुपये प्रति टन च्या पुढे गेले होते. तसेच सिमेंटही प्रति बॅग ४०० रुपये झाले होते. तसेच वाळू आणि विटा देखील महाग झाले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंटचे दर खूप कमी झाले आहेत.

सिमेंटची ब्रँडनिहाय किंमत

अल्ट्राटेक सिमेंट 330 रुपये प्रति बॅग
एसीसी सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
बिर्ला सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
जे के सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
दालमिया सिमेंट 410 रुपये प्रति बॅग
जेपी सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
श्री सिमेंट 350 रुपये प्रति बॅग
प्रिया सिमेंट 330 रुपये प्रति बॅग

स्टीलचे नवीन दर

गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या स्टीलच्या दरात जवळपास १५ हजार रुपये प्रति टन घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्टील खरेदीमध्ये पैशांची बचत होऊ शकते. स्टीलचे नवीन दर तुम्ही खाली पाहू शकता.

मुंबई        महाराष्ट्र    TMT 12mm      56000 रुपये प्रति टन    3-मार्च-23
नागपूर     महाराष्ट्र    TMT 12mm      51500 रुपये प्रति टन    3-मार्च-23
जालना     महाराष्ट्र    TMT 12 mm     55500 रुपये प्रति टन    3-मार्च-23