Car VIP Number : काय सांगता! हा व्हीआयपी नंबर विकला तब्बल इतक्या लाखांना, बोली लावणारेही झाले आश्चर्यचकित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car VIP Number : आजकाल तरुणांमध्ये व्हीआयपी कार नंबर आणि व्हीआयपी मोबाईल नंबरची खूपच क्रेझ वाढली आहे. आजकाल व्हीआयपी नंबर घेण्यासाठी हजारो नाही तर लाखो रुपये देण्यासाठी लोक तयार आहेत. लाखो खर्च करून व्हीआयपी नंबर मिळवला जात आहे.

हरियाणातल्या एका तरुणाने लाखो रुपये खर्च करून एक व्हीआयपी नंबर ख्खारेदी केला आहे. त्याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. आवडीचा वाहन नंबर मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करू शकतात हे यावरून दिसत आहे.

हरियाणातील कैथल येथील एसडीएम कार्यालयात व्हीआयपी क्रमांक मिळविण्याची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून आली. नव्याने सुरू झालेल्या मालिकेतील 33 क्रमांक बोलीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी अनेक क्रमांकांची बेस किंमत 50,000 रुपये तर काहींसाठी 20,000 रुपये ठेवण्यात आली होती.

या कारच्या नंबर लिलावामध्ये HR 08F च्या मालिकेतील सर्वाधिक बोली ७७७७ या क्रमांकावर लावण्यात आली आहे. या नंबरसाठी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची बोली संदीप मौदगीलने लावली आहे.

तरुणाने ७७७७ या वाहन क्रमांकासाठी तब्बल 4 लाख 50 हजार रुपये बोली लावल्याने बोली लावणारे देखील आश्चर्यचकित झाले आहेत. संदीप मौदगीलने हा नंबर फॉर्च्युनर कारसाठी घेतला आहे.

तसेच 8888 या क्रमांकाची एक लाख 5 हजार रुपयांना बोली लावण्यात आली हा क्रमांक देखील लाखोंच्या घरात विकला गेला आहे. 1111 या क्रमांकाला 95 हजार रुपये बोली लावण्यात आली.

1000 या क्रमांकाला 80 हजार रुपये बोली लावण्यात आली, 9999 क्रमांकाला 60 हजार रुपये बोली लावण्यात आली. या सर्व क्रमांकांची मूळ किंमत 50,000 रुपये ठेवण्यात आली होती. तसेच 20000 च्या आधारभूत किमतीवर 1100 हा क्रमांक 36 हजार रुपयांना विकण्यात आला आहे.

0405 क्रमांकासाठी 20 हजार रुपये घेण्यात आले, 3535 क्रमांकासाठी 20 हजार बोली लावण्यात आली, 3800 हा क्रमांक २० हजार रुपयांमध्ये विकण्यात आला. 50 हजाराच्या किमतीत 2222 हा क्रमांक विकण्यात आला,

तसेच 5555 हा क्रमांक देखील 50 हजारात विकण्यात आला, 0777, 0888, 3000, 2000, 8000 हे क्रमांक देखील ५० हजार रुपयांच्या किमतीमध्ये विकण्यात आले आहेत. तसेच 33 क्रमांकांसाठी लोकांनी तब्बल 16 लाख 36 हजारांची बोली लावली.