Central Employee DA Hike Update : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या महिन्यात होणार दुसरी DA वाढ, जाणून घ्या ताजे अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Employee DA Hike Update : केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आली आहे. २०२३ मधील पहिली DA वाढ मार्च महिन्यात करण्यात आली आहे. तसेच आता वर्षातील दुसरी DA वाढ सरकार लवकरच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झाल्याने त्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा मोठा दिलासा मिळाला आहे. आता लवकरच सरकारकडून दुसऱ्या DA वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

AICPI निर्देशांकाची सहामाही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर दुसरी DA वाढ कधी होणार हे समजेल. सध्या जानेवारीचे आकडे जाहीर झाले असून हा आकडा 132.8 वर पोहोचला आहे आणि आज फेब्रुवारीचे आकडे 31 मार्चला संध्याकाळी जाहीर होणार आहेत, जर फेब्रुवारीची संख्या वाढली तर महागाई भत्ता वाढणार आहे.

जुलैमध्ये डीएमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. आता कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवल्याने सध्या कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के झाला आहे. तसेच जुलैमध्ये DA दुसऱ्यांदा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुलै 2023 मध्ये कर्मचारी-पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात किती टक्के वाढ होणार हे AICPI ची आकडेवारी आल्यानंतर समजणार आहे. पण ३ ते ४ टक्क्यांनी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डीए ४५ ते ४६ टक्के असू शकतो

कर्मचाऱ्यांचा मागील DA ३८ टक्के होता. मात्र २०२३ या नवीन वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा DA ४२ टक्के झाला आहे. तसेच जर पुढील DA ४ टक्क्यांनी वाढला तर ४६ टक्के DA होऊ शकतो आणि जर ३ टक्क्यांनी वाढला तर ४५ टक्के कर्मचाऱ्यांचा DA होऊ शकतो.

रक्षाबंधनाच्या आसपास नवीन डीए जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या DA वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ पासून दिला जाणार आहे. याचा फायदा ४८ लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.