Chanakya Niti : महिला पुरुषांपेक्षा या ४ गोष्टींमध्ये असतात नेहमी पुढे, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये महिला आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये महिला आणि पुरुषांच्या नात्याबद्दल अनेक तत्वे सांगितली आहेत. त्याचा आजही मानवी जीवनात मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे.

आचार्य चाणक्य यांनी महिलांबद्दल अनेक गोष्टींचे वर्णन चाणक्य नीती या ग्रंथामध्ये केले आहे. चाणक्यांची ही धोरणे मानवी जीवनात योग्य मार्ग दाखवण्याचे काम करत आहे. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात करिअर, मैत्री, वैवाहिक जीवन, संपत्ती आणि महिलांशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.

महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक कामुकतेची भावना असते. तसेच महिलांना पुरुषांपेक्षा अधिक भूक लागते आणि महिला या पुरुषांपेक्षा अधिक हुशार असतात. असे चाणक्यांनी सांगितले आहे.

चाणक्य नीतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध तसेच त्यांच्या गुणांचा उल्लेख आहे. चाणक्याने एका श्लोकाद्वारे असे चार गुण सांगितले आहेत ज्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप पुढे आहेत.

भूक

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक भूक लागते याचेही वर्णन केले आहे. नेहमी खाण्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिला पुढे असतात. पुरुषांपेक्षा महिलांना दुप्पट भूक लागते. महिलांना त्यांच्या शरीराच्या रचनेमुळे जास्त कॅलरीज लागतात.

हुशार

चाणक्य नीतीनुसार महिला या पुरुषांपेक्षा अधिक हुशार असतात. स्त्रियांकडे अधिक कुशाग्र बुद्धिमत्ता असते. स्त्रिया बुद्धिमत्तेच्या जोरावर कसल्याही कठीण प्रसंगातून बाहेर बाहेर पडतात.

धाडसी

चाणक्य नितीमध्ये आचार्य चाणक्य यांनी पुरुषांपेक्षा महिला अधिक धाडसी असतात असे सांगितले आहे. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 6 पट अधिक धैर्य असते. तणाव सहन करण्याच्या बाबतीतही महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही ती खंबीरपणे उभी आहे.

कामुकता

चाणक्य नीतीमधील या श्लोकाद्वारे चाणक्याने लैंगिक भावनांवरही आपले मत मांडले आहे आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून सांगितले आहे की स्त्रिया अधिक कामुक असतात. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 8 पट जास्त कामाची भावना असते. म्हणजेच, ही भावना स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये 8 पट कमी असते.