Driving License : भारीच .. आता काही मिनिटांत घरी बसून डाऊनलोड करा ड्रायव्हिंग लायसन्स ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Driving License :  आपल्या देशात कोरोना काळानंतर खूप काही गोष्टी बदलल्या आहेत. तुम्हाला हे माहिती असेलच कि कोरोनानंतर आता अनेकजण घरी बसूनच दरमहा लाखो रुपये कमवत आहे तर काहीजण इतर काही कामे घरी बसून ऑनलाईन पद्धतीने करत आहे.

यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता घरी बसून तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करता येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता तुम्हाला 1 आठवडा वाट पाहावी लागणार नाही . तुम्ही काही सोप्या पद्धतीचा वापर करून सहज ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकतात. चला मग जाणून घेऊया या सोप्या पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही सहज तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतोड्रायव्हिंग लायसन्स  डाउनलोड करण्याचे तीन मार्ग आहेत – DigiLocker, डायरेक्ट वेबसाइट आणि परिवहन सेवा. आम्ही तुम्हाला ते कसे डाउनलोड करू शकता त्याची माहिती देत आहोत.

 परिवहन वेबसाइटवरून कसे डाउनलोड करावे

जर तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

गुगलच्या मदतीने तुम्हाला परिवहन महामंडळाची वेबसाइटही मिळेल.

यानंतर, तुम्ही वरच्या डाव्या बाजूला क्लिक करा, त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही परवाना संबंधित सर्व्हिसवर क्लिक करा मग तुमचे राज्य निवडा.

यानंतर तुम्ही प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्सवर टॅप करा.

त्यानंतर अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

तपशील तपासा आणि नंतर PDF डाउनलोड करा.

डायरेक्ट वेबसाइटवरून कसे डाउनलोड करावे

तुम्ही DL च्या DigiLocker वेबसाइटला भेट देऊन देखील डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

येथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून साइन इन करू शकता.

यानंतर search document सेक्शनच्या टॉपला क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स निवडा, त्यानंतर ओके बटण दाबा.

आता तुम्ही ministry of road transport and highway वर क्लिक करा.

परवाना क्रमांक प्रविष्ट करा आणि नंतर ‘Get Document’ वर क्लिक करा.

डाउनलोड बटणावर क्लिक करून तुम्ही ते PDF म्हणून सेव्ह करू शकता.

DigiLocker अॅपवरून ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करावे 

तुम्ही तुमच्या फोनवर DigiLocker अॅप वापरून तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करू शकता.

जेव्हा तुम्ही अॅप उघडता तेव्हा तुम्हाला आवश्यक असलेल्या कागदपत्रांचा पर्याय दिसेल.

होम पेजवर ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय निवडा.

यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका, त्यानंतर ‘Get Document’ निवडा.

यानंतर, शेवटच्या स्टेपमध्ये , तुम्ही पीडीएफ फाइल स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.

हे पण वाचा :-  Budh Gochar 2023: सावधान ! मेष राशीत होणार बुध, शुक्र आणि राहुचा संयोग ; ‘या’ 4 राशींच्या लोकांना बसणार फटका