IMD Alert : पुढील 3 दिवस या 10 राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. तसेच येत्या 3 दिवस देशातील १० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

देशाची राजधानी दिल्लीसह हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे.

अवकाळी पावसाचा फक्त देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. रब्बी पिकांच्या काढणी वेळी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांची काढणी अवकात लवकर करून घ्यावी लागणार आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे. तर काही भागात पाऊस अजूनही सुरूच आहे.

दिल्लीतील आजचे तापमान किमान तापमान 15 आणि कमाल तापमान 30 अंश नोंदवले गेले. यासोबतच दिवसभर आकाश ढगाळ राहिले. तथापि, IMD नुसार, उद्या म्हणजेच 27 मार्च रोजी येथे पाऊस पडेल. यासोबतच दिल्लीतही तापमानात घट दिसून येत आहे.

IMD नुसार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये आजपासून म्हणजेच 23 मार्चपासून सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच पश्चिम राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाचा जोर कमी होईल. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानुसार, आज म्हणजेच 27 मार्च आणि 31 मार्च रोजी उत्तर भारतातील राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर काही ठिकाणी गारपीटही होईल. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे हलका पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.