Indian Railways : भारतातील या रेल्वे स्थानकावरून मिळते थेट परदेशात एन्ट्री, प्रवासी चालतही जाऊ शकतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railways : रेल्वेचे आपल्या देशासाठी खूप मोठे योगदान आहे. भारताचे सर्वात मोठे दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेला ओळखले जाते. भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि स्वस्तात मानला जातो.

आज तुम्हाला २ भारतीय रेल्वेस्थानकांबद्दल असे काही सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. भारतात अशी दोन रेल्वे स्थानके आहेत जिथून तुम्ही थेट परदेशात जाऊ शकता.

पहिले रेल्वे स्थानक बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे आणि दुसरे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमध्ये येते. जिथे तुम्ही ट्रेनमधून उतरल्यानंतर पायी चालत नेपाळ आणि बांगलादेशात प्रवेश करू शकता.

जोगबनी रेल्वे स्टेशन

जोगबनी रेल्वे स्टेशन हे बिहारच्या अररिया जिल्ह्यात येते. जे अगदी नेपाळच्या सीमेलगत आहे. जर तुम्ही या रेल्वे स्थानकावर गेला तर तुम्ही सहज चालत नेपाळला जाऊ शकता. भारताचे हे एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.

या रेल्वेस्थानकावरून तुम्ही सहज नेपाळच्या बीरगंज शहरात सहज पोहचू शकता. नेपाळचे बीरगंज शहर जोगबानी रेल्वे स्थानकापासून फक्त 4 किमी आहे. या ठिकाणाहून लोक सहज चालत प्रवास करू शकतात. तसेच या ठिकाणाहून रेल्वे सेवा देखील उपलब्ध आहे.

सिंहाबाद रेल्वे स्टेशन

भारतातील शेवटच्या टोकावरचे आणि बांग्लादेशच्या अगदी जवळ सिंहाबाद हे रेल्वे स्थानक आहे. ज्या ठिकाणाहून बांगलादेश अगदी जवळ आहे. या ठिकाणाहून लोक सहज पायी चालत बांगलादेशला जाऊ शकतात.

रेल्वे स्थानक जेव्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बांधले तेव्हा थांबा म्हणून लिहले होते. हे रेल्वे स्थानक जवळपास १०० वर्षे जुने आहे. 11 वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2011 मध्ये जुन्या करारात सुधारणा करून भारताचा आणखी एक शेजारी देश नेपाळही या मार्गात समाविष्ट करण्यात आला.

सध्या सिंहाबाद रेल्वे स्थानकावर गाड्यांचे आगमन आणि काळजी घेण्यासाठी कोणतीही सिग्नलिंग यंत्रणा नाही. तसेच प्रवाशांना ट्रेनची माहिती मिळू शकेल अशी कोणतीही खिडकी नाही. रेल्वेने अलीकडेच सिंहाबाद स्थानकावर एक व्यवस्थापन केंद्र सुरू केले आहे, ज्यामध्ये प्रवाशांना तिकीट खरेदी करण्याची आणि त्यांच्या समस्यांसह संबंधित कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याची सुविधा मिळते.

भारतीय रेल्वेचा इतिहास

भारतीय रेल्वे सर्वात प्रथम 1853 मध्ये सुरु झाली. तेव्हा मुंबई ते ठाणे असा 34 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग प्रथमच सुरू करण्यात आला होता. 1854 मध्ये कोलकाता येथे एक लहान रेल्वे मार्ग देखील सुरु करण्यात आला.

भारतीय रेल्वेची दुसरी लांब रेल्वे लाईन 1854 मध्ये मुंबई ते कल्याण सुरू झाली होती. त्याच वेळी, भारतीय रेल्वेचा तिसरा लांब रेल्वे मार्ग 1859 मध्ये अलाहाबाद (प्रयागराज, नाव बदललेले) ते कानपूरपर्यंत सुरू झाला.