Parachute Meaning : पॅराशूट म्हणजे काय ? हे हवेत कसे उडते ? हवेत लोकांचे जीव कसे वाचवत ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Parachute Meaning : तुम्ही अनेकदा फिरायला गेल्यानंतर किंवा टीव्हीमध्ये पॅराशूट आणि स्कायराईडिंग करताना पाहिले असेल. पॅराशूट आणि स्कायराईडिंग करताना उंच आकाशात उडण्याचा आनंद मिळतो. तसेच विमानातून उडी मारून आकाशातून पृथ्वीवरील सर्व गोष्टी तुम्ही सहज पाहू शकता.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पॅराशूट म्हणजे काय? आणि ते कसे काम करते? तसेच ते आकाशातून आपल्याला पडण्यापासून कसे वाचवते? चला तर जाणून घेऊया…

पॅराशूट म्हणजे काय?

तुम्ही पॅराशूट म्हणजे काय आणि ते कसे बनवले जाते याचा विचार केला नसेल तर आज जाणून घ्या. पॅराशूट हे वातावरणात घर्षण निर्माण करते. तसेच मजबूत आणि हलके कापड वापरून हे तयार केले जाते. रेशीम किंवा नायलॉनपासून हे बनवले जाते.

उंचावरून उडी मारल्यानंतरही पॅराशूट तुम्हाला सुरक्षितपणे जमिनीवर खाली उतरवते. पॅराशूटचे वेगवेगळे प्रकार आहेत. राउंड पॅराशूट, क्रूसीफॉर्म पॅराशूट आणि रोगालो विंग्स राम-एअर पॅराशूट ही काही प्रमुख पॅराशूटचे प्रकार आहेत.

पॅराशूट कसे कार्य करते आणि ते मृत्यूपासून कसे वाचवते?

तुम्हालाही माहिती असेल की गुरुत्वाकर्षण शक्ती स्वतःकडे कोणतीही वस्तू खेचून घेत असते. जर तुम्ही उंचावरून कोणतीही वस्तू पृथ्वीच्या दिशेने सोडली तर ती खाली येते. हलकी वस्तू हळू खाली तर जाड वस्तू वेगाने खाली येते.

जेव्हा एखादी व्यक्ती विमानातून उडी मारते तेव्हा ती खूप वेगाने खाली येत असते. पण जेव्हा ती व्यक्ती पॅराशूट उघडते तेव्हा खाली येण्याचा वेग कमी होतो आणि हळूहळू खाली सरकत जमिनीवर येते.

पॅराशूट उघडल्यावर आकाशातील हवेच्या दाबाने पंखासारखा आकार तयार होतो. ज्याच्या खाली कॅनोपी पायलट सहज उडतो. पॅराशूट नियंत्रित करण्यासाठी स्टीअरिंग लाइनवर खाली खेचून पंखाचा आकार बदलला जाऊ शकतो आणि तो दुमडला देखील जाऊ शकतो. तसेच, लँडिंगचा दर कमी किंवा वाढविला जाऊ शकतो.

पॅराशूटशिवाय उंचीवरून पडल्यास काय करावे?

जर तुम्ही पॅराशूटशिवाय उंचीवर खाली पडला तर तुम्ही पॅराशूटसारखे छाती बाहेरच्या बाजूला काढावी आणि तसेच हातपाय बाहेर काढावेत असे केल्यानं उंचीवरून पडणाऱ्या व्यक्तीचा पडण्याचा वेग कमी होतो.

पाण्यात उडी मारल्याने स्वत:ला वाचवता येईल असे बहुतेकांना वाटते, परंतु वास्तव हे आहे की मोठ्या उंचीवरून पाण्यात पडल्यानंतर पाण्याचे वर्तन अगदी काँक्रीटसारखे होते. मोठ्या उंचीवरून पाण्यात पडणे खूप धोकादायक आहे आणि ते काँक्रीटच्या रस्त्यावर पडण्यासारखे आहे.

जर तुम्ही उंचीवरून खाली पडत असाल तर जंगलासारखी जागा निवडावी तसेच जर जंगल नसेल तर बर्फाचे मोकळे मैदान निवडावे जेणेकरून तुम्ही खाली पाडल्यानंतर तुम्हाला जास्त लागणार नाही.

पहिला पॅराशूट कधी बनवला गेला आणि तो कोणी बनवला?

1783 मध्ये पहिल्या पॅराशूटचे प्रात्यक्षिक करण्यात आले. फ्रान्सच्या लुई सेबॅस्टियन लेनोर्मन यांनी पहिले पॅराशूट बनवले आहे. पण त्याआधी, पंधराव्या शतकाच्या आसपास, लिओनार्डो दा विंचीने प्रथम पॅराशूटची कल्पना केली आणि त्याची आकृती तयार केली. ‘दा विंची’च्या या रचनेने प्रभावित होऊन, फॉस्ट फ्रान्सिसने 1617 मध्ये मजबूत फ्रेम असलेले पॅराशूट घालून व्हेनिस टॉवरवरून उडी मारली.

फ्रान्सिसने या पॅराशूटचे नाव Homo Volans असे ठेवले. पण आणीबाणीच्या काळात पॅराशूटचा पहिला वापर फ्रेंच नागरिक जीन-पियरे ब्लँचार्ड यांनी सुमारे १७८५ मध्ये केला होता. ज्याने कुत्र्याला पॅराशूट बांधले आणि उंचीवर तरंगणाऱ्या गरम हवेच्या फुग्यातून टोपलीतून खाली टाकले.

ब्लँचार्ड हे रेशीम कापडापासून पॅराशूट बनवणारे पहिले होते, परंतु सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते वापरण्यास अतिशय सोपे होते. 1797 मध्ये फ्रान्सच्या आंद्रे गार्नेरिनने अशाच पॅराशूटमधून प्रथमच यशस्वी उडी मारली. गार्नेरिनने कंपन कमी करण्यासाठी आणखी सुधारणा केल्या आणि अशा प्रकारे पहिले पॅराशूट तयार झाले.