Rules Changing From April 1 : इकडे लक्ष द्या! पैशाशी संबंधित ‘हे’ 5 नियम 1 एप्रिलपासून बदलणार ; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rules Changing From April 1 :  येत्या काही दिवसात नवीन महिना सुरु होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात काही नियम बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे . यामुळे हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला पुढील महिन्यात म्हणेजच 1 एप्रिलपासून मोठा आर्थिक फटका बसण्याची देखील शक्यता आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या नियमांमध्ये वाहनांच्या किमती, सोन्याची खरेदी, टोल टॅक्स, नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि इतर अनेक सरकारी नियमांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या बदलांबद्दल आज सांगणार आहोत. जेणेकरून महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करता येतील.

पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर वाढू शकतात

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर ठरवतात. मार्च महिन्यात गॅसच्या दरात वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतेही बदल झाले नव्हते.

आयकर विभागाच्या नियमांमध्ये बदल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील अनेक कर प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत जाहीर केली होती. नवीन कर प्रणालीनुसार, करदात्यांना 50,000 रुपयांच्या मानक वजावटीचा लाभही मिळेल. आता 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.

सोने खरेदीचे नियम

सोने खरेदीशी संबंधित नियमांमध्येही मोठा बदल होणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हॉल मार्क नसलेल्या दागिन्यांना मान्यता दिली जाणार नाही. फक्त 4 अंकी हॉल मार्क स्वीकारले जातील. ग्राहकांना 6 अंकांची विक्री केली जाणार असली तरी दुकानदारांना बंदी घालण्यात येणार आहे.

नॅशनल पेन्शन सिस्टम

नॅशनल पेन्शन सिस्टमच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची सुविधा दिली जाते. आता लाभार्थ्यांना वार्षिक पेन्शन काढण्यासाठी केवायसी कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.

पॅन-आधार लिंक करण्याचे नियम

आयकर विभाग आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या सूचना सातत्याने देत आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर लिंक केल्यास यूजर्सला 1000 रुपये दंड भरावा लागेल.

वाहनांच्या किमती वाढतील

एप्रिल महिना सुरू झाल्याने वाहनांच्या किमतीही वाढू शकतात. नवीन उत्सर्जन नियमांमुळे कंपन्यांचा खर्चही वाढणार आहे. त्यानंतर वाहनांच्या किमतीही वाढू शकतात. Hero MotorCorp ने देखील 2% वाढीची घोषणा केली आहे.

हे पण वाचा :-  Viral News : बाबो .. बेडरूममध्ये प्रवेश करताच महिलेला बसला धक्का ; बेडवर दिसला 6 फूट लांब विषारी साप अन् घडलं असं काही ..