Maruti Suzuki Alto 800 : छोटा पॅकेट बडा धमाका! मारुती अल्टो 800 नवीन अवतार लॉन्च, जबरदस्त मायलेज आणि किंमतही खूपच कमी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Alto 800 : मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तसेच कंपनीकडून ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनेक नवीन कार सादर करण्यात आली आहेत. मात्र ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी अल्टो 800 कार नवीन रूपात लॉन्च करण्यात आली आहे.

भारतीय बाजारपेठेत नवीन रूपात अल्टो 800 जबरदस्त मायलेजसह लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीकडून अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच जुन्या अल्टो 800 मध्ये आणि नवीन अल्टो 800 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

कमी किमतीमध्ये अनेक धम्माल फीचर्स या नवीन अल्टो 800 मध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद या कारला मिळेल अशी अपेक्षा कंपनीला आहे.

नवीन अल्टो 800 ची वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी कंपनीकडून नवीन अल्टो 800 कारचा आकार वाढवण्यात आला आहे. जुन्या अल्टो केबिनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा देण्यात आली आहे. तसेच नवीन कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

नवीन अल्टो कारमध्ये तुम्हाला डॅशबोर्ड आणि सेंट्रल कन्सोल डिझाइन देण्यात आले आहे. या नवीन मारुती सुझुकी अल्टोमध्ये तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कीलेस एंट्री, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण यासारखी एकापेक्षा जास्त वैशिष्ट्ये मिळतात.

मारुती सुझुकी नवीन अल्टो 800 इंजिन

नवीन मारुती अल्टोचे इंजिन आणखी मजबूत करण्यात आले आहे. नवीन अल्टो 796 cc F8D 3 सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे जे 69 Nm टॉर्कसह 47 Bhp पॉवर जनरेट करते.

कारला 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार 22.05 किमी प्रति लीटर मायलेज देते. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर स्तरावर कारच्या BS6 इंजिनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

किंमत

नवीन मारुती सुझुकी अल्टो 800 च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून वेगवेगळ्या वेरिएंटसाठी वेगवेगळ्या किमती ठेवण्यात आल्या आहेत. बेस व्हेरिएंट 2.94 लाख, LXI मॉडेल 3.5 लाख आणि VXI प्रकार 3.72 लाखांमध्ये उपलब्ध असेल.