Tanaji Bhau Jadhav : तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाची चर्चा राज्यभर का होते, अल्पावधीत झालेत फेमस, कारण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tanaji Bhau Jadhav : तुम्ही अनेकदा मित्रमंडळींचे वाढदिवस साजरे केले असतील. पण त्यासाठी तुम्ही एक केक आणि थोडे फटाकडे लावून आणि पाच पंचवीस पोर गोळा करून वाढदिवस साजरा केला असेल. पण महाराष्ट्रात असा एक वाढदिवस साजरा केला जातो त्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात होते.

एखाद्या आमदार, मंत्री आणि खासदारचाही वाढदिवस इतक्या जल्लोषात साजरा केला जात नाही. पण महाराष्ट्रातील अशा एका व्यक्तीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो तो म्हणजे टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस. २ नोव्हेंबर रोजी तानाजी जाधव यांचा वाढदिवस साजरा केला जातो.

तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. हा वाढदिवस बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त असे तसे नाही तर तब्बल महागड्या कार आणि बाईक तसेच सोने देखील भेटवस्तू म्हणून दिले जाते.

तानाजी जाधव यांचा वाढदिवस म्हंटल की त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. राज्यभर अनेक ठिकाणी केक कापले जातात. तसेच हजारो कार्यकर्त्ये जमा होऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कामे करत असतात.

तानाजी जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शंभर दीडशे नाही तर तब्ब्ल लाखोंच्या संख्येमध्ये कार्यकर्त्ये जमा होतात. इतके कार्यकर्त्ये तर एखाद्या मंत्री, आमदार किंवा खासदाराच्याही वाढदिवसाला जमा होत नाहीत.

तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्ये रक्तदान शिबीर, नेत्रदान शिबीर तसेच गोगरिबांना मदत आणि शाळकरी मुलांना शाळेचे साहित्य वाटप केले जाते. तसेच घरगुती समस्या सोडवणे आणि एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या दवाखान्याचा सर्व खर्च टायगर ग्रुपमधील कार्यकर्त्यांकडून केला जातो.

तानाजी जाधव यांची राज्यभर सतत चर्चा होत असते. तानाजी जाधव यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे. तसेच नवनवीन मित्र जोडणे आणि ते टिकवून ठेवणे आणि सामाजिक कार्य करत राहणे यामुळे तानाजी जाधव यांची राज्यभर चर्चा होत असते.

अनाथांची माय कै. सिंधुताई सपकाळ यांना देखील तानाजी जाधव यांच्या वाढदिवसाला येऊ वाटायचे. अनेकदा त्या वाढदिवसाला जाण्याची इच्छा देखील त्या बोलून दाखवायच्या. यावरूनच तुम्ही ठरवू शकता तानाजी जाधव यांची राज्यभरात किती क्रेझ आहे.

तानाजी जाधव यांचा मित्र परिवार महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक मध्ये दखल आहे. तानाजी जाधव हे लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील लाखो तरुणांना एकत्र ठेवण्याचे काम केले आहे.

तानाजी जाधव कुटुंबाबद्दल

तानाजी जाधव यांचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे गाव आहे. त्यांचा जन्म याच गावात झाला आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील याचठिकाणी पूर्ण झाले आहे. पैलवागीचा नाद असल्याने त्यांचे शिक्षणात कधीच मन रमले नाही. ते अनेकदा नापास देखील झाले आहेत.

तानाजी जाधव यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील गाढवावरून माती वाहण्याचे काम करत असायचे. या परिस्थितीमध्ये तानाजी जाधव यांच्या कुटुंबाचा संसार त्यांच्या वडिलांनी केला आहे.

तानाजी जाधव यांच्या कुटुंबाला पैलवानगी म्हणून देणगी मिळालेली होती. त्यांच्या पंजोबांपासून तानाजी जाधव यांच्यापर्यंत सर्वांनाच पैलवानगीचा नाद आहे. तानाजी जाधव हे देखील एक पैलवान आहेत. त्यांचे मोठे भाव जालिंदर जाधव हे देखील पैलवानच आहेत.

तानाजी जाधव यांनी मित्र जमा करण्याचे आणि ते टिकवून ठेवण्याचे काम त्यांचे भाव जालिंदर जाधव यांच्याकडून शिकले आहेत. मित्रांपेक्षा मोठे काहीही नाही अशी जालिंदर जाधव यांची धारणा आहे.

टायगर ग्रुपची स्थापना

जालिंदर जाधव आणि तानाजी जाधव यांनी मिळून २००८ मध्ये टायगर ग्रुपची स्थापना केली. हा ग्रुप तयार करण्यामागे त्यांचा एकच उद्देश होता तो म्हणजे गोरगरीब आणि अडल्यानडल्यांची सेवा करणे.

तानाजी जाधव यांना शिक्षणात मन लागत नव्हते तसेच सतत नापास देखील होत होते पण त्यांनी कधी शाळा सोडण्याचा विचार केला नाही. कारण शाळेमध्ये येणार प्रत्येक मित्र जमवणे आणि नटे टिकवून ठेवणे यासाठी तानाजी जाधव शाळा शिकत राहिले.

तानाजी जाधव यांना वाढत्या वयाबरोबर समाजातील वास्तव समजायला सुरुवात झाली. अनेक गरीब कुटुंबाचे हलाखीचे जीवन, उपासमारीने जगत असलेली अनेक कुटुंब, तसेच पैसे नाहीत म्हणून उपचार न घेणारी कुटुंबे त्यांना दिसायला लागली. त्यांनतर त्यांनी त्यांचे मोठे भाव यांच्याजवळ मनातली खदखद व्यक्त केली.

तानाजी जाधव यांनी त्यांच्या मनातील एक कल्पना मोठे भाऊ जालिंदर जाधव यांना सांगितली. त्यांनी मित्रपरिवाराच्या मदतीने अशा लोकांना मदत करायची असे भावाला सांगितले आणि त्यांना देखील ही कल्पना पटली.

सर्वात प्रथम त्यांच्या ग्रुपने शाळा आणि कॉलेजच्या मित्रांच्या मदतीने त्यांनी सोलापूर करमाळा रस्त्यावर घडणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम सुरु केले. तसेच त्यांच्या उपचाराचा खर्च उचलणे अशी कामे सुरु केली.

तानाजी जाधव यांची कल्पना भन्नाट असल्याने आणि माणुसकीच्या नात्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण वर्ग तानाजी जाधव यांच्याबरोबर जोडला गेला. त्यांनतर हळूहळू तानाजी जाधव यांची संघटन अख्या महाराष्ट्रभर काम करू लागली आणि महाराष्ट्राच नाही तर कर्नाटकात देखील त्यांची चर्च होऊ लागली.

तानाजी जाधव यांचा मित्रपरिवार लहान मुलांसापासून, शाळकरी मुले तसेच बेरोगर तरुण आणि पीडित महिलांसाठी तानाजी जाधव हे उभे असतात. तानाजी जाधव यांच्या पाठीमागे कोणतीही राजकीय शक्ती नसताना एवढा मोठा ग्रुप तयार केला आहे.

तानाजी जाधव यांचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेते प्रवीण तरडे आणि अनिकेत घुले देखील तानाजी जाधव यांचे चाहते आहेत. अनिकेत घुले यांच्या मित्राचा सोलापूर रस्त्यावर अपघात झाला होता.

त्यांनतर अनिकेत घुले यांनी तानाजी जाधव यांना फोन केला आणि जाधव यांनी एका शब्दावर मदत पोहोचवली होती. तेव्हापासून अनिकेत घुले हे तानाजी जाधव यांचे चाहते झाले आणि त्यांनी टायगरग्रुपमध्ये प्रवेश केला. अनिकेत घुले हे सध्या टायगर ग्रुपचे मावळ मधील मुख्य चेहरा आहेत.

अनिकेत घुले हे देखील तानाजी जाधव यांच्यासारखी सामाजिक कामे करत आहेत. अनिकेत घुले यांनी तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क २५ लाखांची फॉर्च्युनर कार गिफ्ट म्हणून दिली आहे.

तसेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेता राणा म्हणजेच हार्दिक जोशी हा देखील जाधव यांचा चांगला मित्र आहे. तानाजी जाधव हे हार्दिक जोशीच्या लग्नात देखील दिसले होते.

तानाजी जाधव यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जाते. तसेच तानाजी जाधव यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गोव्यामध्ये नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस या मानाची डॉक्टर पदवी देण्यात आली आहे.

तानाजी जाधव यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक दिवाळीसारखा सणच असतो. प्रत्येकजण जमेल ती भेटवस्तू तानाजी जाधव यांच्यासाठी आणत असतो. पण तानाजी जाधव यांना त्या भेटवस्तू स्वीकारणे आवडत नाही.

ते नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतात की माझ्यावर जो खर्च करत आहेत त्यापेक्षा तुम्ही हाच खर्च गोरगरीब लोकांसाठी करत राहा. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा असे ते नेहमी सांगत असतात. या स्वभावामुळे तानाजी जाधव लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहेत.