NIIH Mumbai Bharti : आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत.
वरील भरती अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, सायंटिस्ट बी (IT/ प्रोग्रामर)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज पाठवावेत.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी BCA, B.Sc.IT, 12वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
वरील भरतीसाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज पद्धती
वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.niih.org.in/ ला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 48000/- रुपये इतके वेतन मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://niih.org.in/projectappli/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.